About us

मराठी सेल्फ स्टडी डॉट कॉम विषयी: 

https://marathiselfstudy.com/ कॉमच्या माध्यमातून सेल्फ स्टडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावणे.आज आपण पाहतो की मुले केवळ पाठांतराच्या माध्यमातून गुण मिळवत असतात,परंतु ज्यावेळी कॉलेज किंवा स्पर्धा परीक्षा अभ्यासाची वेळ येते काही application base प्रश्न येतात त्यावेळी अनेक विद्यार्थी मागे पडतात.यावर उपाय म्हणून निबंध लेखन यासारखा भाग की ज्यात केवळ पाठांतर न करता तो निबंध कसा छान लिहावा याविषयी मार्गदर्शन करणार आहे.थोडक्यात लेखन विभागाची तयारी यातून होणार आहे.

जीवनात आपल्यापुढे उत्तम आदर्श असतील तर आपण देखील त्या आदर्श व्यक्तीनी दाखवलेल्या मार्गावर चालत असतो. म्हणूनच काही प्रेरणादायी जीवनचरित्रे (marathi biography)यांना देखील आपण घेणार आहोत. पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील घडामोडी यांचा देखील आपण यात समावेश करणार आहोत.

जर विद्यार्थी आवडीने व स्वतःहून अभ्यास करतील तर शिक्षणाची गोडी वाढेल.विद्यार्थी मन लावून ज्ञान ग्रहण करतील .नव्या शैक्षणिक धोरणात देखील मुले कृतीशील बनायला हवीत असे सांगितले आहे.या व्यासपीठावरून हेच मार्गदर्शन केले जाईल.

आमच्याविषयी

मी प्रशांत शिपकुले ,मुंबई महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे.अध्यापन क्षेत्रात 1 तप म्हणजे 12 वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे.विद्यापीठीय शिक्षण घेत असताना सेट ,नेट परीक्षांचा अभ्यास करताना इतका मोठा अभ्यासक्रम मग अभ्यास करण्याची ,नोट्स काढण्याची ,अभ्यास लक्षात ठेवण्याची हतोटी येऊन गेली.आजच्या मुलांना शालेय शिक्षण घेत असताना ही सर्व कौशल्य आत्मसाद व्हावीत.विद्यार्थ्यांना पोपटपंची न करता स्मार्ट स्टडी करण्याची सवय लागावी.यासाठी मी काम करणार आहे.

माझ्या जोडीला मराठी विषयाची आवड असलेल्या एम. ए. मराठी तसेच बी. एड.असलेल्या श्रीम. पूनम सोरटे यांना देखील लेखनाची आवड असल्याने या व्यासपीठावर त्या देखील लेखांच्या माध्यमातून आपले योगदान देणार आहेत.

थोडक्यात काय तर आम्ही दोघे या संकेत स्थळावर मराठी निबंध,आत्मचरित्रे आणि चालू घडामोडी यावर लिखाण करणार आहोत.हे आमचे संकेत स्थळ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थी,शिक्षक व पालक या सर्वांना उपयुक्त ठरणार आहे.