विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध | Vidnyan Shap Ki Vardan Marathi Esaay

आज आपण दहावी बोर्डाच्या परीक्षेत तसेच वैचारिक निबंधात कायम विचारला जाणारा निबंध मराठी निबंध म्हणजे विज्ञान शाप की वरदान चला तर मग निबंधाला सुरुवात करूया.
vidnyan-shap-ki-vardan-marathi-essay हा निबंध लिहिण्या अगोदर तो कोणत्या प्रकारचा निबंध आहे.हे जर आपण समजून घ्यायला हवे तरच आपण विज्ञान शाप की वरदान हा निबंध  छान पद्धतीने लिहू शकतो. हा निबंधाचा प्रकार वैचारिक निबंध प्रकार आहे. मग आपण ज्यावेळेस वैचारिक निबंध लिहितो त्यावेळेस आपल्याला वेगळ्या भूमिकेतून विचार करावा लागतो. वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला मांडावी लागते. 
विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
विज्ञान शाप की वरदान  मराठी निबंध

 

 
जर आपण आत्मकथनात्मक निबंध लिहीत असू, तर त्यावेळी मात्र लिहिण्याची शैली ही वेगळी ठेवावी लागते. कारण आत्मकथनात्मक निबंधामध्ये निर्जीव वस्तू सजीव आहे ती आपल्याशी बोलत आहे. अशी कल्पना आपल्याला वर्णन करावी लागते. हा वरील  बदल जरी तुम्ही लक्षात घेतला तर निबंधाचे गुण तुमचे जाणार नाहीत.
विज्ञान शाप की वरदान ! हा मराठी निबंध बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. म्हणूनच दहावी महत्त्वाचे निबंध अभ्यास करत असताना विज्ञान शाप की वरदान! हा निबंध तुम्ही तयार करून ठेवा.मी हा निबंध लिहीत असताना विज्ञान शाप कसा? आणि विज्ञान वरदान कसे? याविषयी दोन्ही बाजूने चर्चा केलेली आहे.
आपण देखील हा निबंध लिहीत असताना असाच विचार करायचा आहे. विज्ञान शाप आहे की वरदान आहे तर ?  म्हटलं तर शाप आहे.म्हटलं तर वरदान आहे. कारण आपण त्याचा उपयोग कसा करणार ? यावर तिथे अवलंबून आहे म्हणून विज्ञान शाप की वरदान हा मराठी निबंध लिहीत असताना दोन्ही बाजू मांडा आणि शेवटी conclusion म्हणून आपले मत देखील मांडायला विसरू नका.कारण परीक्षकाला आपण दिलेली मते,विचार आवडत असते.चला तर विज्ञान शाप की वरदान निबंधाचा नमुना पाहूया.

विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

उपयोग कराल माझा विचारांती नीट तर,
 
मीच आहे तुमचा उध्दार करता,
 

नाहीतर मीच बनेल तुमच्यासाठी,

जीवघेणा शाप.


   

     वरील कवितेच्या ओळी किती बोलक्या आहेत. विज्ञानाला शाप ठरवायचे की वरदान यासाठी  !
 
 हे फक्त मनुष्याच्या हातात आहे.विज्ञानाने मनुष्याच्या आयुष्यात खुप अभूतपूर्व क्रांती केली. आपले पूर्वज आणि आज आपल्या राहणीमानात जो फरक पडलेला आहे. तो केवळ विज्ञानामुळे. ते साध्या मातीच्या घरात राहत, पायी चालत जात, एखादा आजारा झाला तर घरीच उपचार करत, एखादया भंयकर आजारात लोंकाना आपले प्राण गमावयला लागत असे. कारण त्यावर उपचार त्यांना मिळत नसतं. त्यावेळेस मनुष्याचे जीवन खुप कष्टाचे आहे. हाल अपेष्टांचे होते. कारण त्यावेळी विज्ञानाने म्हणवी तशी प्रगती केली नव्हती.

 

विज्ञानाने प्रगती जरी केली नव्हती, तरी मनुष्य आनंदी जीवन जगत होता. माणसाच्या जीवनात सुख ,समाधान व शांती नांदत होती.माणसाचे मन मोठे होते लोक एकमेकाना समजून घेत होते. आजार होते पण मर्दित प्रमाणात. आपले पूर्वज जसे हट्टे कट्टे होते तसे आपण नाही. आता सगळेच प्रदूषण यूक्त झाले आहे. आता कश्या मध्ये ही कस उरलेला नाही.मनुष्याने विज्ञानाचा शोध माणसांचे कष्ट दूर व्हावे यासाठीच लावला खरा,पण झाले ही तसेच विज्ञानाच्या शोधामुळे माणसांच्या हाल अपष्टा दूर झाल्या. मनुष्याचे जीवन सुखमय झाले, जे काम करायला मनुष्याला फार वेळ लागत होता. ते तो क्षाणात करायला लागला. विविध आजारांवर औषधे शोधली गेली आहेत, त्यामुळे मृत्युदर कमी झाला. एका ठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी मोबाईल व्दारे क्षाणात संपर्क करु लागला. मनूष्याचे राहणीमान विज्ञानामुळ सुधारले आहे. एक प्रकारे विज्ञान मनुष्यासाठी वरदान ठरले आहे. विज्ञानाच्या सहाय्याने मनुष्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.
मनुष्य चंद्रावर गेला, त्याने लाखो किलोमिटर दूर राहणाऱ्या ताऱ्यांचा शोध लावला. मनुष्याने जरी कितीही प्रगती केली तरी तो निसर्गापूढे खूप खुजा आहे हे निसर्ग ही दाखवूण देतो. म्हणून मनुष्याने निसर्गाच्या नियमांचे पालन करायला हवे आपल्यामुळे निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ होणार नाही याची काळजी घेयला हवी. निसर्ग खूप दयाळूआहे, तो भरभरून सर्व काही देतो. यासाठीच विज्ञानाचा वापर करताना तो काळजी पूर्वक केला तर विज्ञान माणसासाठी वरदान ठरेल नाहीतर तो भयंकर असा शाप ठरेल.
ज्या पद्धतीने नाण्याला दोन बाजू असतात एक छापा आणि एक काटा त्याच पद्धतीने कोणताही विचार मांडत असताना त्याला दोन बाजू असतात एक सकारात्मक अनेक नकारात्मक अगदी त्याच पद्धतीने विज्ञान शाप की वरदान याविषयी काय सांगायचे म्हटले तर विज्ञानाने शोध लावले मानवाचे जीवन आरामदायी बनवले साहजिकच विज्ञान हे वरदान आहे असे म्हणावे लागेल.
दुसऱ्या बाजूला विज्ञान आणि अणुबॉम्ब सारखा शोध लावला मोबाईल टीव्ही यासारखा शोध लावला आणि त्याच्या साह्याने आज अनेक देशा देशांमध्ये वाद सुरू आहेत ते केवळ अणुबॉम्ब मुळे त्याचबरोबर टीव्ही आणि मोबाईल मुळे लहान मुलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत म्हणजेच काय एकीकडे विज्ञानाचे अनेक फायदे आहेत तर वापर कसा करायचा हे मुलांना कळत नसल्यामुळे त्याचे अनेक तोटे देखील आहेत म्हणजेच विज्ञान शाप देखील आहे.
शेवटी कोणत्याही बाबींमध्ये शाप की वरदान असे आपल्याला म्हणतात येत नाही तर ती व्यक्ती त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहते यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात म्हणून विज्ञानाचा चांगला वापर केला तर ते एक वरदान आहे मानवाला मिळालेली जादूची छडी आहे परंतु त्याचा गैरवापर केला तर विज्ञान हे एक शाप सारखे आहे की ज्यामुळे माणसाचे जीवन उध्वस्त होऊ शकते माणसाच्या जीवनात अस्थिरता निर्माण होऊ शकते.
अशा पद्धतीने आपण विज्ञान शाप की वरदान हा वैचारिक निबंध दोन्ही बाजू अगोदर मांडून त्यानंतर त्यातला मधला मार्ग कसा योग्य आहे या पद्धतीने विवेचन करावे कारण कोणती गोष्ट संपूर्णपणे वाईट आणि संपूर्णपणे चांगली नसते असा जर तुम्ही विज्ञान शाप की वरदान हा निबंध लिहिला तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील.
असेच वैचारिक निबंध लिहिण्यासाठी खालील मुद्दे समजावून घ्या नि छान निबंध लिहा.

 

वैचारिक निबंध लेखनाची तयारी 

१. वाचन वाढवा 

जर आपण वैचारिक निबंध परीक्षेमध्ये लिहिणार असाल?तर आपले वाचन हे असले पाहिजे. कारण ते चालू घडामोडी वरती विषय असतात. त्यामध्ये आपल्याला साधक-बाधक चर्चा ही मांडायचे असते म्हणून वाचनाची सोय आपल्याला असली पाहिजे. 

२. चालू घडामोडींचे ज्ञान   

वैचारिक निबंध हे चालू घडामोडींवर आधारित असतात.विज्ञानाने लावलेल्या नवनवीन शोध याविषयी तुम्हाला माहीत असतील तर विज्ञान शाप की वरदान ! हा निबंध लिहिताना माहिती असायला हवी तरच तुम्ही छान पद्धतीने हा निबंध लिहू शकता. 

३. सुसंगत मांडणी 

वैचारिक निबंध लिहीत असताना आपली मांडणी सुसंगत हवी जर आपल्याला दूरदर्शन शाप की वरदान,विज्ञान शाप की वरदान यासारखे विषय आले तर विषयाला धरून आपण मांडणी केली पाहिजे. समर्थनार्थ निवेदाने असतील उदाहरणे असतील ती उदाहरणे दिली पाहिजे. 

4.दोन्ही बाजू मांडणे.

वैचारिक निबंधामध्ये शाप की वरदान यासारखे निबंध आल्यानंतर आपल्याला विज्ञान वरदान कसे आहे ? तेवढेच मांडून चालणार नाही. तर ते शाप कसे आणि वरदान कसे याविषयीची माहिती द्यावी लागेल. 

5. आकर्षक भाषा शैली 

निबंध लिहीत असताना त्यामध्ये चांगले वाक्प्रचार,सुभाषित, म्हणी संतांची वचने टाकण्याचा प्रयत्न करा. त्याने आपला निबंध अजून दर्जेदार आहे. याची परीक्षकाला कल्पना येईल. आणि आपल्याला आठ गुणांपैकी आठ गुण मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे वैचारिक निबंधाचा अभ्यास करत असताना यावरील सर्व बाबी आपण लक्षात घ्या
मला जे काय वैचारिक निबंधाच्या बाबतीत मानायचे आहे ते जर आपण आज एका उदाहरणाच्या माध्यमातून एक निबंधाचा नमुना म्हणून विज्ञान शाप की वरदान मी हा निबंध आपणास नमुना म्हणून देत आहे तुम्ही सेल स्टडी करत असताना अशाच प्रकारे वेगवेगळे निबंध लिहू शकता.

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment