उत्तमलक्षण स्पष्टीकरण भावार्थ सार| Uttamlakshan Spashtikaran Bhavarth Sar

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.आजच्या लेखामध्ये आपण उत्तम लक्षण कवितेचा भावार्थ म्हणजेच या कवितेचे सार पाहणार आहोत. उत्तम लक्षण कवितेचे खाली दिलेले प्रश्न उत्तरे म्हणजेच स्वाध्याय आपण नंतरच्या लेखात अभ्यासणार आहोत. चला तर मग उत्तम लक्षण कविता भावार्थ पाहायला सुरुवात करुया. सर्वप्रथम उत्तम लक्षण कविता नजरेखालून घालू या.म्हणजे या उत्तमलक्षण कवितेचे स्पष्टीकरण ध्यानात राहील.

 

उत्तमलक्षण स्पष्टीकरण भावार्थ सार
उत्तमलक्षण स्पष्टीकरण भावार्थ सार

उत्तमलक्षण कविता भावार्थ

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र मध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ असे अनेक थोर संत होऊन गेले या संतान पैकीच एक संत म्हणजे संत रामदास होय संत रामदासांची उत्तम लक्षण ही कविता आज आपल्याला अभ्यास जायचे आहे चला तर मग  उत्तम लक्षण कवितेचा भावार्थ म्हणजेच उत्तम लक्षण कवितेचे स्पष्टीकरण ओवी निहाय पाहूया म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सरळ अर्थ सांगा हा प्रश्न सोपा जाईल.

उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ स्पष्टीकरण

 

श्रोतिं व्हावे सावधान I आता सांगतो उत्तम गुण I

 जेणे करिता बाने I खुण सर्वज्ञपणाची II1 II

 

संत रामदास म्हणतात, श्रोत्यांनो म्हणजेच माझे हे विचार ऐकणाऱ्या लोकांनो ! आज मी तुम्हाला उत्तम माणूस किंवा गुणवान माणूस कोणाला म्हणायचे ? या विषयी माहिती सांगणार आहे . अशा उत्तम माणसाचे गुण सांगणार आहे. ही माहिती सांगत असताना गुणवान किंवा उत्तम ज्याला म्हणायचे त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आणि जर ते गुण त्या व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती गुणवान आहे. असे म्हणता येईल.गुणवान व्यक्तिची संत रामदास यांनी सांगितलेली ही लक्षणे ऐकून नक्कीच यातून तुम्हाला काहीतरी चांगले ज्ञान मिळेल. अशी आशा संत रामदास या पहिल्या ओवीतून व्यक्त करतात.

 

 

 वाट  पुसल्याविण  जाऊ नये I फळ ओळखल्याविण  खाऊ नये I

 पडली वस्तू घेऊ नये I येकायेकी II 2 II

 

 उत्तम माणसाची लक्षणे सांगत असताना किंवा उत्तमलक्षण भावार्थ पाहत असताना संत रामदास, उत्तम माणसाचे पहिले लक्षण सांगतात की अशी व्यक्ती की तिच्च्यविषयी पहिला गुण सांगतात उत्तम माणसाने कुठेही जात असताना आपण ज्या रस्त्याने किंवा मार्गावरती जात आहोत तो मार्ग कुठे जात आहे ? त्या मार्गामध्ये काही संभाव्य अडचणी तर नाहीत ना ? याची चौकशी करणे गरजेचे आहे. आपल्या हातामध्ये जर एखादे अनोळखी फळ म्हणजे या आधी आपण ते कधी खाले नाही का तर ते ओळखीचे नाही. फळ खण्या अगोदर त्या फळाची माहिती जाणून घ्यावी.

 

संत रामदास या दुसऱ्या ओवीत म्हणतात,

ज्यांनी आर्जव  तोडू नये  पाप द्रव्य जोडू नये I

पुण्य मार्ग सोडू नये कादाकाळी II3 II

 

आपल्याला जर कोणी आर्जव म्हणजे विनंती केली किंवा मदत मागितली तर त्या विनंतीचा मान राखावा. त्या  विनंतीची अवहेलना होणार नाही.याची दक्षता घ्यावी.आपल्यावरती जीवन जगत असताना कितीही वाईट प्रसंग आले तरी पापद्रव्य म्हणजे वाईट मार्गाने पैसा कमवू नये. पैसा हा नेहमी विधायक मार्गाने आणि घाम गाळूनच मिळालेला असावा.असे संत रामदास सांगतात.आपण जर एकादा चांगला मार्ग पकडला असेल.म्हणजेच पुण्याचा मार्ग पकडला असेल म्हणजेच सदमार्ग पकडला असेल .तर तो सदमार्ग कदापी सोडू नये म्हणजे कधी सोडू नये.खरोखर उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ आजही आपल्याला उपयोगी पडणारा आहे.

 

 

तोंडाळासी  भांडो नये I वाचाळाशी  तंडो नये I

संतसंग  खंडू नये Iअंतर्यामी II४ II

 

 संत रामदास उत्तम माणसाचे गुण सांगत असताना एका गुणा विषयी ते म्हणतात, जी व्यक्ती तोंडाळ म्हणजे भांडखोर असते ती सतत कोणाशी ना कोणाशी भांडत असते.अशा व्यक्तीच्या नादाला कदापि लागू नये. आणि त्याच बरोबर हे नुसती बडबड करणारे वाचाळ वीर असतात अशा वाचाळ बडबड्या लोकांशी देखील वाद करत बसू नये. कारण असे केल्याने त्यांच्याबरोबर आपली देखील किंमत कमी होत असते. खरोखर उत्तमलक्षण कवितेचे स्पष्टीकरण खूप जीवणोपयोगी आहे.

 

 आळसे सुख मानू नये I चाहाडी मनास आणू नये I

 शोधल्यावीणकरू नये I कार्य काही II५ II

 

 आळसामध्ये कधीही सुख मानू नये.आळस हा माणसाचा नेहमी घातच करत असतो,त्यामुळे त्या आळसामध्ये जरी आनंद वाटत असला तरी तो आनंद हा विघातक आहे. म्हणूनच आळसात सुख मानू नका.असा सल्ला संत रामदास देतात. काही लोकांना चुगली करणे म्हणजे चहाडी करणे एखाद्या च्या पाठीमागे बोलणे ही घाणेरडी सवय असते ही सवय तात्काळ सोडावी. आणि कायम संतसंघ किंवा संतांची संगत म्हणजे चांगल्या लोकांची संगत कधीच सोडू नये.

 

 

 सभेमध्ये लाजू नयेI बाष्कळपणे बोलू नये I

पैज होड  घालू नये I काही केल्या II६ II

 

संत रामदास उत्तमलक्षण कवितेत उत्तम माणसाची लक्षणे  सांगताना एका ओवीत म्हणतात,जर एखाद्या सभेमध्ये तुम्ही उपस्थित असाल तर त्या वेळी आपले विचार मांडायला हवेत. कारण त्यांच्या मते सभा हे बोलण्याचे ठिकाण आहे. हेच उत्तम माणसाचे लक्षण आहे. काही लोक सभेमध्ये म्हणजे ज्याठिकाणी बोलण्याची संधी आहे. अशा ठिकाणी बोलत नाहीत आणि नको त्या ठिकाणी बाष्कळ पणे म्हणजेच गैरलागू बोलत असतात. अशा लोकांना संत रामदास उत्तम माणसाची लक्षणे सांगताना कानपिचक्या देताना दिसतात. अनेक व्यक्तींना पैजा लावण्याची किंवा शर्यती लावण्याची सवय असते.संत रामदास म्हणतात काही झाली तरी कोणाशी पैज किंवा होड लावू नये.कारण का तर ही पैज एखाद्याच्या जीवावर तीदेखील बेतू शकते.

 

 

 कोणाचा उपकार घेऊ नयेI घेतला तरी राखो नये I

 परपीडा करू नयेI विश्वास घातII७ II

 

 जीवन जगत असताना कधीकधी आपल्याला कोणाची ना कोणाची मदत ही घ्यावीच लागते. ही घेतलेली मदत म्हणजे एक प्रकारचा उपकारच असतो.आपण जर कधी कुणाचा उपकार घेतला तर त्या व्यक्तीने आपल्यावरती केलेले उपकार विसरू नका.त्या उपकारांची परतफेड करा. त्यांनी आपल्याला मदत केली असेल तर आपण देखील त्यांना मदत करा. परपीडा म्हणजे कधीही जीवनामध्ये दुसऱ्याला त्रास देऊ नका.सर्वात महत्वाचे म्हणजे कधी कोणाचा विश्वास तोडू नका.म्हणजेच विश्वासघात करू नका खरोखरच संत रामदासांचे त्याकाळचे विचार आजच्या काळात देखील तंतोतंत लागू होतात.

 

 

 व्यापक पण सांडू नये I पराधेरन होऊ नये I

आपलेवो वोझे घालू नये I कोणी एकासी II८II

 

  उत्तम माणसाची लक्षणे सांगताना संत रामदास सांगतात, व्यापकपण म्हणजेच आपल्या मनाकडे असलेला मोठेपणा होय. तो कधीच कमी होऊ द्यायचा नाही. तो मनाचा मोठेपणा कायम वाढायलाच हवा. जीवन जगत असताना स्वावलंबी बना कधीही पराधेन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आपण दुसऱ्याचा भार बनेल असे राहू नका. थोडक्यात काय तर जीवनात यशस्वी व्हा.असे संत रामदास यांना म्हणायचे आहे.

 

 

 सत्यमार्ग सांडू नये Iअसत्य पंथे जाऊ नयेI

 कदा अभिमान घेऊ नये I असत्याचा II९ II

 

संत रामदास म्हणतात, सत्याचा मार्ग म्हणजे जीवन जगत असताना सापडलेला सुयोग्य मार्ग. काहीही झाले तरी देखील आपला सत्याचा मार्ग सोडू नये.आपण जगत असताना खोटेपणाचा आधार घेत असू तर त्या खोटेपणाचा राग यायला हवा. पण अनेकांना तो खोटेपणा स्वाभिमानाची बाब वाटते. अशा लोकांना संत रामदास म्हणतात, असत्याचा म्हणजेच खोटेपणाचा कधीही अभिमान करू नका. कारण खोटेपणा हा सर्वात मोठा दुर्गुण आहे.

 

 

अपकीर्ती ते सांडावी I सकीर्ती वाढवावी I

 विवेके दृढ धरावी I वाट सत्याची II १० II

 

काही लोक समाजामध्ये वागत असताना त्यांचे चुकीचे वागणे पाहून लोक त्यांच्यावर टीका करत असतात. एक प्रकारे समाजामध्ये त्यांची अपकीर्ती झालेली असते. परंतु त्या अपकीर्तीला देखील काही लोक गौरवाची बाब मानत असतात.परंतु ही उत्तम माणसाचे लक्षण नाही. तर माणसाने नेहमी आपली सत्किर्ती वाढेल.असेच वागायला हवे आणि कायम विवेकाची म्हणजेच सारासार विचार यांची कास धरून चांगला मार्ग स्वीकारावा.

 

 अशाप्रकारे संत रामदास उत्तमलक्षण या कवितेच्या माध्यमातून जर तुम्हाला कुणी गुणी किंवा चांगला माणूस व्हायचं असेल तर वर सांगितलेले सगळे गुण तुमच्या मध्ये येण्यासाठी सदैव दक्ष रहा. संत रामदासांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितलेले विचार उत्तम लक्षण कवितेचा भावार्थ उत्तम लक्षण कवितेचे स्पष्टीकरण पाहिल्यानंतर आपल्या असे जाणवते की खरोखरच आजच्या या कलियुगामध्ये ही कविता किंवा उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ जसाच्या तसा लागू होतो. उत्तमलक्षण कविता इतकी आशय संपन्न आहे की उत्तमलक्षण कवितेचे स्पष्टीकरण पाहिल्यानंतर दृष्टिकोनात बदल करावा व उत्तम गुण येण्यासाठी धडपड करावी असे वाटत राहते. आपण त्या कवितेकडे पाहून त्या दृष्टिकोनातून उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ केवळ वाच्यार्थ न राहता अजून बरेच काही सुचवू पाहत आहे. Uttamlakshan Spashtikaran Bhavarth Sar आपल्याला आवडले असेल याची खात्री आहे.पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद !

 

 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment