स्वमत प्रश्नांची तयारी कशी करावी | Swamat Prashnanchi Tayari Kashi Karavi

विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढावी यासाठी अभ्यासक्रमात अनेक नवनवीन बदल केले जातात यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्वमत प्रश्न होय.बोर्ड परीक्षेत सहा गुणांसाठी हा प्रश्न विचारलं जातो. म्हणूनच आज आपण स्वमत प्रश्नाची तयारी कशी करावी हे पाहणार आहोत.

स्वमत प्रश्नांची तयारी कशी करावी

मराठी सेल्फ स्टडी या ब्लॉगच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करायचा?परीक्षेमध्ये नुसते यश नाही तर सर्वोत्तम यश कसे मिळवायचे ? एकीकडे बोर्ड परीक्षेत काही मुले 100% गुण मिळवून उत्तीर्ण होत आहेत आणि अनेक विद्यार्थी कमी गुणांनी पास होताना दिसत आहेत तर काही नापास होताना देखील दिसत आहेत.अशी तफावत का दिसते? ते विद्यार्थी अभ्यास करत नाहीत म्हणून का ? तर असे नाही. त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करा !अभ्यास करा!असा दबाव घरातून शाळेतून आणला जातो .परंतु तो अभ्यास कसा करायचा ? किती करायचा ?नोट्स कशा काढायच्या ? मुद्दे कसे नोंदवून ठेवायचे ? याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही.मराठी सेल्फ स्टडी डॉट कॉमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच काही क्लुप्त्या देण्याच्या उद्देशाने विशेष असे लेख लिहिले जात आहेत.आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कुमारभारती असो की अक्षरभारती असो या विषयांच्या बाबतीमध्ये स्वमत प्रश्न कशा पद्धतीने सोडवावेत ? याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

स्वमत प्रश्नांची तयारी कशी करावी
स्वमत प्रश्नांची तयारी कशी करावी

 

स्वमत प्रश्न तयारी

चला तर यावर सविस्तर माहिती पाहूया व स्वमत प्रश्नात पैकीच्या पैकी गुण स्वमत प्रश्नाला मिळवूया.
 

 स्वमत प्रश्न परीक्षेमध्ये का समाविष्ट केले आहेत

या अगोदरच्या परीक्षा पद्धती पाहिल्या तर त्या परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न उत्तरे विचारली जात होती .त्या प्रश्नाची मुले उत्तरे पाठ करायची.या घोकमपट्टीचा किंवा पाठांतरचा व्यवहारात कुठेच उपयोग होताना दिसत नाही. परीक्षेमध्ये 90 % गुण असलेली मुले देखील एखाद्या व्यासपीठावर मनोगतासाठी समोर बोलावल्या नंतर त्यांना दोन वाक्यही बोलता येत नसतील आणि हेच विद्यार्थी जर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन नेतृत्व करणार असतील ? तर ते निर्णय कसे घेणार ? निर्णय घेण्याची, स्वतःचे मत मांडण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली पाहिजे. म्हणूनच स्वमत प्रश्न इयत्ता नववी दहावी परीक्षेमध्ये जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

 

स्वमत प्रश्न भारांश &गुण

 

        साधारणपणे बोर्ड परीक्षेचा जर आपण विचार केला तर प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये उतारा आणि आ उतारा. म्हणजेच प्रश्नपत्रिकेतील पहिला उतारा आणि दुसरा उतारा या प्रश्नांमध्ये प्रत्येकी तीन गुणांसाठी या पद्धतीने सहा गुणांसाठी स्वमत प्रश्न विचारले जातात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची तयारी सुरुवातीपासूनच करायची आहे.जेणेकरून सहा पैकी सहा गुण आपल्याला मिळतीलच.आता शाळा भरलेल्या आहेत शिक्षकांनी नुकतीच शिकवायला सुरुवात केली असेल. बरोबर ना ! जर तुम्ही घरी जास्तीत जास्त सराव केला म्हणजे सेल्फ स्टडी किंवा स्वयं अध्ययन केले तर हा प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडू शकता.

 

स्वमत प्रश्नाचे मूल्यमापन & तपासणी व गुणदान

 

 बरेच विद्यार्थी स्वमत प्रश्न पाठ करतात.परंतु अशी करू नका ज्या उद्देशाने स्वमत प्रश्न अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहे.यामागील हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना बोलतं करणे. विद्यार्थ्यांची काहीएक मते बनवणे. जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना निर्णय घेताना अडचण येणार नाही. थोडक्यात मुलांची निर्णय क्षमता प्रचंड वाढली पाहिजे.

 

या प्रश्नाचे मूल्यमापन करत असताना बोर्डाच्या सक्त सूचना आहेत की, विद्यार्थ्यांनी जे मत मांडले आहे त्या मताचा आदर व्हावा. म्हणजेच काय तर त्याचे ते उत्तर चूक बरोबर असे न बघता त्या विद्यार्थ्यांना आपले मत किती प्रभावीपणे मांडले आहे. किंवा विद्यार्थी आपले मत मांडू शकत आहे की नाही. याची चाचपणी केली जाते. सांगण्याचा मुद्दा हा की, हा असा प्रश्न आहे की यामध्ये आपल्याला शून्य गुण मिळू शकत नाहीत. बरेचसे विद्यार्थी एकादा नवीन स्वमत प्रश्न आला की तो सोडून देतात. असे न करता हा स्वमत प्रश्न सोडवायचाच आहे.

 

स्वमत प्रश्नाच्या उत्तराची मांडणी / स्वमत प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे / आदर्श उत्तर

 

 सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वमत प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. तो समजून घेतल्यानंतर त्याचे उत्तर आपल्याला कसे लिहिता येईल याविषयी विचार करायचा आहे. स्वमत प्रश्नाचे उत्तर हे साधारणपणे तीन परिच्छेदामध्ये देण्याचा प्रयत्न करावा. ते तीन परिषद म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघू या

 

1 पहिला परिच्छेद

 

स्वमत प्रश्नाचे उत्तर देत असताना पहिल्या परीचेदात तो प्रश्न कशासंदर्भात आहे? याबाबत थोडक्यात माहिती द्यावी म्हणजेच प्रस्तावना करावी परंतु ती पूर्वी सारकही न करता प्रश्नाच्या अनुषंगाने असावी 2 ते 3 ओळींची असावी.

 

2 दुसरा परिच्छेद

दुसऱ्या परिच्छेदामध्ये जो प्रश्न किंवा स्वमत आपल्याला विचारले आहे. त्या प्रश्नाबद्दल तुमची मते काय आहेत किंवा जर तो पाठावर आधारित प्रश्न असेल तर त्या पाठातील त्यासंदर्भात माहिती द्यावी. हा दुसरा उतारा हा थोडा सविस्तर असावा. भाषा शैली आकर्षक असावी.कारण उत्तरपत्रिकेमध्ये स्वमत प्रश्न हा पहिल्या उतरत असल्यामुळे फस्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे लक्षात ठेवावे।

 

3. तिसरा परिच्छेद

 

तिसऱ्या प्यारा मध्ये समारोप वजा परंतु आपले मत जे वास्तवावर आधारित आहे ते सांगण्याचा प्रयत्न करावा. व ते थोडक्यात असावे.

स्वमत प्रश्नांचा तयारी

 

स्वमत प्रश्नांचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणते पाठ आहेत त्या पाठातील आशय म्हणजे पाठाचा विषय कोणता आहे ? या अनुषंगाने अगोदरच विचार करून ठेवावा.स्वमत प्रश्नांची तयारी करून ठेवावी.

उदा.

आजी कुटुंबाचे आगळ स्वमत प्रश्न

हा पाठ ज्यावेळी आपण विचारात घेतो. त्यावेळी हा पाठ एकत्र कुटुंब पद्धती, खेडेगावातील जीवन, आणि घरातील आजी किंवा वयस्कर लोकांचे स्थान यावर असल्यामुळे स्वमत प्रश्न देखील अशाच प्रकारचे विचारले जातील. एक उदाहरण स्वमत प्रश्न घेऊ या यातून आपल्याला उत्तर कसे लिहिता येईल म्हणजे वरील विवेचन नीट समजेल.यातूनच पुढचे काही प्रश्न तुम्ही सेल्फ स्टडी च्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने देऊ शकता.आणि याच उद्देशाने मराठी सेल्फ स्टडी डॉट कॉम हा ब्लॉग मी सुरु केलेला आहे. विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत जे क्लासेसला जाऊ शकत नाहीत पण त्यांना चांगले गुण मिळवायचे आहेत. यांच्यासाठीचा हा माझा एक प्रयत्न आहे. चला तर मग एक उदाहरण पाहूया आणि इतर उदाहरणे तुम्ही सेल्फ स्टडी च्या माध्यमातून सोडवायची आहेत.

 

बोर्ड परीक्षेसाठी महत्वाचे स्वमतप्रश्न 2023

 

नमुना प्रश्न .आपल्या जीवनामध्ये आजीचे महत्त्व लिहा.

 

उत्तर : आपल्या जीवनामध्ये आई – वडील, गुरुजन ,मित्र-मैत्रिणी,नातेवाईक हे सगळेच गरजेचे असतात याच बरोबर अजून एक व्यक्ती आहे ती म्हणजे आजी होय.

 

प्रत्येक घरांमध्ये आजही आजी अतिशय महत्त्वाची आहे कारण, का तर घरातील लहान मुलांवर संस्कार करण्याचे काम,त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम ती करत असते.एकत्र कुटुंब पद्धती असेल तर घरात अनेक व्यक्ती असतात आपापसात मतभेद होण्याची शक्यता असते. अशावेळी आजी संपूर्ण घरावरती लक्ष ठेवण्याचे काम करते.जर घरात मतभेद झाले तर ते मिटवण्याचे देखील काम करते. संध्याकाळच्या वेळी लहान लहान मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगते.या गोष्टी मधूनच मुलांचा विकास होत जातो.आजी आपल्या नातवंडांचा खूप लाड करते वेळप्रसंगी आजी रागवायला देखील कमी करत नाही.एक प्रकारे एकत्र कुटुंब पद्धतीत सर्वांवर अंकुश ठेवण्याचे काम आजी करत असते.घरातील सर्वांनाच शिस्तीत ठेवण्याचे काम आणि एकत्र बांधून ठेवण्याचे काम आजी करत असते म्हणून आजी किंवा आजोबा एकंदरीतच वयोवृद्ध लोक गरजेचे आहेत.

 

थोडक्यात काय तर घरामध्ये आजीचे स्थाने अढळ आहे म्हणजेच खूप महत्त्वाचे आहे. परंतु असे असले तरी आज काल विभक्त कुटुंब पद्धती बोकाळत चालली आहे. हम दो हमारे दो अशी संकुचित प्रवृत्ती समाजामध्ये येत असल्याने आज काल आजी घरातून नामशेष होताना दिसत आहे. या पाठाच्या निमित्ताने मी एक संकल्प करते/करते की मी कधीही माझ्या आई-वडिलांना माझ्या आजी आजोबांना माझ्यापासून विभक्त करणार नाही.

 

वरील उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आले असेल कि, स्वमत प्रश्न देत असताना आपल्याला स्वतःची मते मांडायची आहेत.पण ती मांडत असताना एका विधायक भूमिकेतून आणि सकारात्मकतेने मांडायचे आहेत नकारात्मकता त्यामध्ये नसावी.

 
 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment