शरद पवार साहेब मराठी निबंध | sharad pawar essay in marathi 2023

शरद पवार  साहेब मराठी निबंध 2023 sharad pawar essay in marathi

आपल्या भारत देशाच्या राजकारणात,समाजकारणात तसेच आपल्या संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील विकास प्रक्रियेत शरद पवार साहेब यांच्या नावाला जे वलय आहे ते क्वचितच नेत्यांंना अनुभवायला मिळते.गेल्या कित्येक दशकांपासून शरद पवार ह्या नावाभोवती आपल्या महाराष्ट्रातील तसेच भारत देशातील राजकारण फिरताना आपणास दिसून येत आहे.आज आपण शरद पवार मराठी निबंध (sharad pawar essay in marathi ) या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू अभ्यासणार आहोत.

शरद पवार यांचे नाव महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील व्यक्तीला आज ठाऊक आहे.
शेतकरी तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार साहेब.शरद पवार हे सामान्यांबददल तळमळ असलेले बहुश्रुत नेते आहेत.

Sharad pawar image

शरद पवार यांचा राजकीय प्रवास | sharad pawar political entry information  marathi 2023 sharad pawar eassy in marathi

शरद पवार यांचे पुर्ण नाव शरद गोविंदराव पवार असे आहे.शरद पवार साहेब हे भारतातील थोर राजकारणी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री कृषीमंत्री इत्यादी पद देखील भुषवले आहे.मुख्यमंत्री हे पद त्यांनी सलग चार वेळा भुषविले.पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

sharad pawar eassy in marathi

राजकारणासोबत शरद पवार यांनी २००५ पासुन २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद तसेच २०१० पासुन २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

२०१३ ते २०१७ दरम्यान शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील राहीले आहेत.

२०१७ मध्ये शरद पवार साहेब यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.पदमविभुषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.

शरद पवार यांनी लोक माझे सांगाती ह्या नावाचे स्वताचे एक आत्मचरित्र देखील लिहिले आहे.

शरद पवार बर्थ इन्फॉर्मेशन  मराठी 2023

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे बारामती ह्या ठिकाणी झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार असे होते ते बारामती मधील शेतकऱी सहकार संघात नोकरी करायचे अणि आईचे नाव शारदाबाई.

शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार ह्या पुणे जिल्ह्यातील लोकल बोर्डात शिक्षण समितीच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

शरद पवार यांच्या पत्नीचे नाव प्रतिभा पवार अणि मुलीचे नाव सुप्रियाताई सुळे असे आहे.शरद पवार यांचे बृहन महाराष्ट्र काॅलेज ऑफ  काॅमर्स मधून झाले.

read more

मी फळा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध

शरद पवार यांचा विवाह १ ऑगस्ट  १९६७ मध्ये प्रतिभा शिंदे यांच्या समवेत झाला होता.

शरद पवार हे एक विचारशीलांचे,विचारनिष्ठेच एक सकारात्मक कार्यनिपुणता असलेले नेतृत्व आहे.महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांनी १९५६ मध्ये प्रवेश केला होता.

जेव्हापासुन शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून शरद पवार साहेबांनी भारतीय राजकारणामध्ये त्यांचे नाव अस्तित्व अणि त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात विशेष यश प्राप्त केले आहे.

शरद पवार यांची कृषिमंत्री म्हणून कामगिरी

शरद पवार साहेब यांना शेतकऱ्यांची  काळजी घेणारा जाणता राजा ह्या नावाने देखील संबोधिले जाते.कारण शरद पवार यांनी आतापर्यंत शेतकरयांचे अनेक प्रश्न हाती घेत ते सोडविले आहेत.

राजकारणासोबत शरद पवार साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात देखील भरपुर काम केले आहे.भारत देशातील कृषी क्षेत्राची तसेच कृषी शिक्षणाची जाण असलेला अणि ह्या दोन्ही क्षेत्रात विपुल प्रमाणात काम केलेला एकमेव नेता म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते.

शरद पवार यांच्या स्वाभावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीट ऐकून व्यवस्थितरीत्या समजुन घेणे.प्रत्येकाची आपुलकीच्या भावनेने विचारपूस करणे, वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना समजुन घेणे

अणि कोणत्याही समस्येला समजुन घेण्यासाठी तिच्या मुळापर्यंत जाणे हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रमुख घटक आहे.

राजकीय,वैचारिक व्याख्यानमालेत,युनोच्या व्यासपीठावर त्यांनी आपली वैचारिक भूमिका कायम पार पाडली आहे.म्हणून शरद पवार यांना लोकनेता म्हणून देखील ओळखले जाते.

समाजकारणाची कास धरून विधायक समाज उन्नती करीता झटणारा प्रयोगशील धोरणांचा पुरस्कार करणारा नेता म्हणजे शरद पवार.

शरद पवार यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेले अनमोल कार्य आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी अणि मार्गदर्शक ठरते.

सांस्कृतिक विचार अणि कला क्षेत्रा विषयी अभिजात जाण असल्याने शरद पवार साहेब साहित्यिक लेखक कलावंत यांना नेहमी राजाश्रय देतात.एक साहित्य प्रेमी तसेच वाचक रसिक म्हणून ते अग्रणी वाटतात.

शरद पवार यांच्यामत्ते कुठल्याही समाजाची उंची ही कला संगीत नाटय यासारख्या विविध क्षेत्रात असलेल्या त्यांच्या स्थानावरून ठरविण्यात येत असते.शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच कला विश्वाला प्रतिसाद देण्याचे काम केले.

आज सुसंस्कृत पद्धतीने राजकारण समाजकारण करीत शरद पवार साहेब यांनी आपली नाममुद्रा गेल्या पन्नास वर्षांतील कालखंडात कोरून ठेवली आहे.

शिक्षणाचा प्रयोग नाशिक पासुन सर्वप्रथम शरद पवार साहेब यांनी सुरू केला होता.आज मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्य व देशभरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात साहेबांनी केलेल्या अशा अनेक प्रयोगांची अणि बारामती मधील विद्या प्रतिष्ठानची नेहमीच चर्चा होत असते.

शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरिता सहेतुक प्रयत्न करत सर्व समाजघटकांना आपलेसे केले.अणि एक विशिष्ट सामाजिक न्यायाची भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

आज राजकारणच नव्हे तर क्रिडा विश्व,शेती अशा सर्वच क्षेत्रात शरद पवार यांचे ज्ञान वाखाणण्याजोगे आहे.आपल्या मधुर वाणीतुन सर्वसामान्य जनतेला तसेच कार्यकत्यांना आज शरद पवार यांनी आपलेस केले आहे.

शरद पवार साहेब यांनी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील गरीब मुलांना आमदार तसेच मंत्री बनवले ज्यामुळे ते खरया अर्थाने समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांचे नेते ठरतात.

शरद पवार यांनी आतापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात देखील मोलाचे कार्य पार पाडले आहे.जे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व गाजवण्याची महत्वाकांक्षा बाळगतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी शरद पवार हे एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतात.

दरवर्षी १२ डिसेंबर ह्या तारखेला शरद पवार साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

यशवंतराव चव्हाण यांनी बारामती मधील खाणीतुन शोधून काढलेल्या ह्या हिरयाला कोणी साहेब म्हणत तर कोणी विकासपुरुष राजकारणातील ध्रूवतारा म्हणते.यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.

माणुस समजुन घेण्याच्या आपल्या वृत्तीमुळेच आज शरद पवार साहेब एवढे मोठे व्यक्तीमत्त्व बनले आहे.

शेतकरी कामगार पक्षाची परंपरा असलेल्या परिवारात जन्म घेतलेल्या अणि बारामती मध्ये कार्य केलेल्या शरद पवार साहेब यांनी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.यापुर्वी शर्ट पॅन्ट सफारी कुठल्याही नेत्याने घातली नव्हती ही सुरूवात शरद पवार साहेब यांनी केली.

शेतकरी वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तळमळीने कार्य करण्याचे प्रचंड मोठे कार्य ह्या नेत्याने केले.

कृषी मंत्री झाल्यानंतर शरद पवार साहेब यांनी पायलेट प्रोजेक्ट मधून कृषी विद्यापीठ,पुरक दुध व्यवसाय,अधिक उत्पादनांची ऊस केळी शेती,या सर्वांना जोड व्यवसाय देत आर्थिक बळ त्यांनी उभे केले.

शरद पवार यांनी कधीही मनोरंजनासाठी भाषण देण्याचे काम केले नाही.त्यांनी आपल्या भाषणात कधी शिविगाळ देखील वापरली नाही.मुददेसुद योग्य ते अणि परिणाम कारक रीत्या बोलणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण आहे.

शरद पवार साहेब हे राजकारण तसेच खेळ साहित्य विज्ञान तंत्रज्ञान कृषी इत्यादी क्षेत्रातील कलावंताना देखील आज आपलेसे वाटतात.

आमचे इतर अप्रतिम लेख

मी मुख्यमंत्री झालो तर ……

मी लोकशाही बोलते ……..

माझा आवडता ऋतु पावसाळा

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment