Nelson Mandela biography marathi |नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस निबंध 2023

Nelson Mandela biography marathi दिवस हा आंतरराष्ट्रीय दरवर्षी १८ जुलै रोजी साजरा केला जातो.दरवर्षी हा दिवस नेल्सन मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जात असतो.

नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्सन मंडेला दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने २००९ मध्ये केली होती.

नेल्सन मंडेला यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये साजरा केला जातो.

Nelson Mandela biography marathi

नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आणि वर्णभेद विरोधी कार्यकर्ते होते.आपल्या भारत देशामध्ये महात्मा गांधी यांना जे स्थान प्राप्त आहे एकदम तसेच स्थान नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिका ह्या देशात दिले जाते.

Nelson Mandela biography marathi

नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिका देशातील पहिले वहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात.

गांधीजींनी भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध जे काही शस्त्र न उचलता लढा देण्याचे कार्य केले तसेच कार्य दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदा विरूद्ध लढा देण्यासाठी नेल्सन मंडेला यांनी केले.

नेल्सन मंडेला यांनी शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने दक्षिण आफ्रिका देशातील वर्णभेदा विरूद्ध लढा दिला.

जगातील कुठल्याही समस्येचे निवारण बोलण्याने चर्चा केल्याने होऊ शकते असे नेल्सन मंडेला यांचे मत होते.

नेल्सन मंडेला यांच्या ह्याच अहिंसावादी प्रवृत्ती मुळे त्यांना भारतात जसे गांधीजींना अहिसेंचा पुजारी म्हणून ओळखले जाते एकदम त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिका मध्ये नेल्सन मंडेला यांना अहिंसेचा पुजारी म्हणून ओळखले जाते.

म्हणुनच नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिका देशातील महात्मा गांधी म्हणुन देखील ओळखले जाते.

नेल्सन मंडेला यांनी केलेले त्याग बलिदान अणि दाखवलेले धाडस संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरते.

नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे असे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती होते,जे त्यांच्या वर्णभेद विरोधी कार्यासाठी तुरुंगात राहिल्यानंतर निवडले गेले होते.

नेल्सन मंडेला यांचा जन्म १८ जुलै १९१८ रोजी दक्षिण आफ्रिका देशातील माडीवा ह्या आदिवासी जमाती मध्ये झाला होता.

त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिका मधील बासा नदीच्या किनारी असलेल्या मवेजो नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात झाला होता.

नेल्सन मंडेला यांनी आपले प्राथमिक शिक्षण
दक्षिण आफ्रिका देशातील क्लार्कबेरी मिशनरी स्कूलमध्ये पुर्ण केले आणि हेल्ड टाउन महाविद्यालया मधून पदवी देखील प्राप्त केली.

हेल्ड टाऊन हे कृष्णवर्णीय काळया लोकांसाठी बनवण्यात आलेले खास महाविद्यालय होते.हयाच महाविद्यालयात नेल्सन मंडेला यांची भेट त्यांचे मित्र सहयोगी ओलिवर टांबो यांच्याशी झाली.

नेल्सन मंडेला यांच्या काळात ब्रिटिश सरकारचे दक्षिण आफ्रिका ह्या देशावर अधिराज्य होते.

नेल्सन मंडेला यांना ब्रिटीश सरकारकडुन दक्षिण आफ्रिका देशातील जनतेवर करण्यात येत असलेला अन्याय अत्याचार पाहीला जात नव्हता म्हणून त्यांनी याविरूदध आवाज उठवत आपल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या इतर तरूण वर्गातील विद्यार्थ्यांना ब्रिटिशांकडुन केल्या जात असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी ब्रिटीश सरकार विरूद्ध भाषणे तसेच घोषणाबाजी देखील केली.पण त्याकाळी दक्षिण आफ्रिका मध्ये ब्रिटीशांचे अधिराज्य असल्याने नेल्सन मंडेला यांना ब्रिटीश सरकार विरूद्ध भाषण केल्यामुळे महाविद्यालयातुन काढुन टाकण्यात आले.

ब्रिटिशांकडुन कृष्णवर्णीय लोकांवर जो अन्याय अत्याचार केला जातो त्याविरोधात लढा देण्यासाठी आवाज उठवण्यासाठी नेल्सन मंडेला यांनी एका युथ लीगची स्थापणा केली.

दक्षिण आफ्रिका मध्ये कृष्णवर्णीय लोकांना मतदान करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता नेहमी दक्षिण आफ्रिका देशात इलेक्शन दरम्यान ब्रिटीश सरकार सत्तेवर येत असल्याने तेथील कृष्णवर्णीय लोकांवर ब्रिटिश सरकारकडुन कठोर कायदे लादले जायचे त्यांना हीनतेची वागणुक दिली जायची.

आपल्या देशामध्ये सुरू असलेला हा भेदभाव अन्याय नेल्सन मंडेला यांना सहन झाल्याने त्यांनी ह्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे ठरवले.अणि ब्रिटिशांच्या ह्या अन्याय कारक वागणुकीविरूदध त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली.

नेल्सन मंडेला यांच्या वडिलांचे नाव गेडला हेनरी अणि आईचे नाव नोमजामो विनी मेडिकिलाजा असे होते.नेल्सन मंडेला यांचे वडील त्यांच्या गावातील प्रमुख होते अणि नेल्सन मंडेला यांची आई एक मेथोडिस्ट होती.

नेल्सन मंडेला राहत असलेल्या मवेजो ह्या गावातील प्रमुखाच्या मुलाला मंडेला असे म्हटले जात असल्याने नेल्सन मंडेला यांचे नाव मंडेला असे पडले.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर मंडेला हे नाव त्यांना वारशामध्ये मिळाले होते.नेल्सन मंडेला यांच्या आईवडीलांनी त्यांचे नाव जन्मतःच रोहीलहाला असे ठेवले होते.

प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना नेल्सन मंडेला यांचे नाव त्यांच्या एका शिक्षकाने नेल्सन असे ठेवले होते तेव्हा पासून त्यांचे नाव नेल्सन मंडेला असे पडले.

दक्षिण आफ्रिका मध्ये नेल्सन मंडेला यांना विविध नावांनी ओळखले जाते लोकांकडुन त्यांना टाटा खुलू मदिबा अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधिले जाते.याचा अर्थ वडील किंवा दादा असा होतो.

किशोरवयीन वयात असताना नेल्सन मंडेला यांना डालीभुंगा ह्या नावाने संबोधित केले जायचे.

लहानपणीच नेल्सन मंडेला यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले.नेल्सन मंडेला हे फक्त बारा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर घरातील सर्व जबाबदारी नेल्सन मंडेला यांच्या खांद्यावर आली.

नेल्सन मंडेला यांनी एका लाॅ फर्म मध्ये क्लार्क म्हणून नोकरी केली आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले.

नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या जीवनातील अधिकतम कालावधी म्हणजे २७ वर्ष इतका प्रदीर्घ कालावधी त्यांनी केलेल्या वर्णभेद विरोधी कार्यासाठी तुरुंगात व्यतीत केला होता.

हया २७ वर्षाच्या कालावधीत तुरूंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी मजदुर म्हणून कोळशाच्या खाणी मध्ये देखील काम केले.

नेल्सन मंडेला यांच्या पत्नीचे नाव एवलिन नटोका मेस असे आहे.

नेल्सन मंडेला यांच्या मुलांची नावे मेडिका थेमबेकल मंडेला,मेकजैव मंडेला,मेकनाथो लेवानिका मंडेला जेनानी मंडेला,जेन जिसवा मंडेला असे आहे.

मानवी सभ्यतेच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने त्वचेचा रंग आणि वंशाच्या आधारावर मानवाकडून मानवांवर अत्याचार केले जाणारे कायदे तयार करून ठेवले होते.

वांशिक पृथक्करण आणि वर्णभेदावर लिखित कायदा करणारे हे जगातील एकमेव असे सरकार होते.

नेल्सन मंडेला हे अब्राहम लिंकन अणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या विचारांना मानणारे अणि त्यावर चालणारे व्यक्ती होते.

नेल्सन मंडेला हे एक असे परदेशी व्यक्ती आहेत ज्यांना भारत सरकारच्या वतीने १९९० मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.नेल्सन मंडेला हे एक सामाजिक हक्क कार्यकर्ते, राजकारणी आणि परोपकारी व्यक्ती होते.

नेल्सन मंडेला यांनी 67 वर्षे सामाजिक न्यायासाठी लढा देण्याचे कार्य केले.नेल्सन मंडेला दिवस लोकांना चांगल्या समाजासाठी योगदान देण्यासाठी 67 मिनिटे समर्पित करण्यास प्रोत्साहित करतो.

आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतु हा सेवा अणि स्वयंसेवा संस्कृतीस प्रोत्साहन देणे हा आहे.

आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला हा दिवस समाजातील वर्णद्वेष आणि असमानता नष्ट करण्यासाठी लोकांना जागरुक करतो.

नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिका तसेच संपूर्ण जगभरात वर्णभेद विरोधी लढा देण्याचे प्रतिक मानले जातात.नेल्सन मंडेला यांचे महान विचार आजही समाजातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात.

नेल्सन मंडेला यांचे निधन ५ डिसेंबर २०१३ रोजी दक्षिण आफ्रिका देशातील हाॅगटाॅन इस्टेट जोहान्सबर्ग येथे झाले होते.

आमचे इतर लेख

मी पूरग्रस्त बोलतोय /आत्मकथन

स्वामी विवेकानंद चरित्र

माझी आई मराठी निबंध

डॉक्टर तात्याराव लहाणे यांची माहिती

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment