9 वी संपूर्ण वाक्प्रचार मराठी | Navavi Sampurn Vakprchar Marathi

आजच्या व्याकरण घटकातील 9 वी संपूर्ण वाक्प्रचार मराठी हा घटक आज अभ्यासणार आहोत.यातून आपल्याला नक्कीच व्याकरणातील वाक्प्रचार हा घटक समजायला मदत होईल. 

मराठी विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर आपल्याला व्याकरण घटकातील पैकीच्या पैकी गुण मिळायला हवेत. नवीन मराठी अभ्यासक्रमात समानार्थी शब्द ,विरुद्धार्थी शब्द,शब्द समूहाबद्दल एक शब्द,एका शब्दाचे अनेक अर्थ,अर्थपूर्ण शब्द तयार करा,अचूक शब्द निवडा.पारिभाषिक शब्द व वाक्प्रचार असे प्रश्न विचारले जातात.तर आज आपण 9 वी संपूर्ण वाक्प्रचार अभ्यासणार आहोत. भाग 1 मध्ये प्रथम सत्र परीक्षेसाठी व द्वितीय सत्र परीक्षेसाठी असे दोन भाग दिलेले आहे.

9 वी संपूर्ण वाक्प्रचार मराठी
9 वी संपूर्ण वाक्प्रचार मराठी


इयत्ता 9 वी 
वाक्प्रचार मराठी 

गुण वाक्प्रचार 

इयत्ता 9 वी च्या परीक्षेत वाक्प्रचार येतात. विद्यार्थ्यानी 5 पैकी कोणतेही 2 वाक्प्रचार व त्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो.नववी असो  की दहावी बोर्डाच्या परीक्षेत 4 गुणांसाठी वाक्प्रचार विचारले जातात. 

वाक्प्रचार प्रश्नाची गुण विभागणी 

वाक्प्रचार प्रश्नत वाक्प्रचाराचा  अर्थ सांगणे याला 1 गुण व वाक्प्रचाराचा जर वाक्यात उपयोग केला तर 1 गुण असे 2गुण विभाजन वाक्प्रचार या प्रश्नचे केलेले आहे. 

 

वाक्प्रचार हा प्रश्न सोडवताना या चुका करू नका

 1.वाक्प्रचाराचा अर्थ 

 

वाक्प्रचाराचा अर्थ नीट लिहा, बरेच विद्यार्थी शब्दश अर्थ लिहितात व त्यावरच अर्थ लिहितात ही चूक करू नका.

उदा. कंठ स्नान घालणे – स्नान म्हणजे अंघोळ आणि कंठ म्हणजे गळा याचा आपण जर गळ्याखालून आंघोळ घालणे असा अर्थ घेऊ नये. 

तर याचा अर्थ ठार मारणे असा आहे म्हणजेच वाक्प्रचाराचे अर्थ शब्दाचे समान अर्थ शब्द पाहून अर्थ लिहू नका. नीट अभ्यास करा. 

2. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग  

 

बरेच विद्यार्थी वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग न करता त्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा उपयोग करतात. असे न करता वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. Navavi Sampurn Vakprchar चा नीट अभ्यास करा. तरच पैकीच्या पैकी गुण मिळतील

उदा. 

धूम ठोकणे – पळून जाणे 

या वाक्प्रचारात पोलिसांना पाहताच चोर पळून गेले.

असे जर आपण उत्तर लिहिले तर आपल्याला गुण मिळणार नाही. तर 

पोलिसांना पाहताच चोरांनी धूम ठोकली. 

अशा पद्धतीने आपल्याला वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करावा व अर्थ शब्दश  अर्थ न काढता वाक्प्रचार यांचे अर्थ पाठ करून ठेवावते. 

 

9 वी प्रथम सत्र परीक्षा वाक्प्रचार  

1.प्रशंसा करणे- कौतुक करणे 

 मिथिलाचा परीक्षेत पहिला नंबर आल्याने तिच्या आईने तिची प्रशंसा केली.

2.पिकले पान गळणे- मृत्यू होणे

 एक ना एक दिवस पिकले पान गळते.

3.पाठीशी उभे राहणे- आधार देणे. 

माझ्या पाठीशी कोणी नसले तरी माझी आई माझ्या पाठीशी नेहमी असते.

4.डोळ्यातले अश्रू पुसणे- दुःख दूर करण्यास मदत करणे 

 सचिन रडायला लागल्यास त्याच्या बाबांनी त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले.

5.आश्रय देणे -निवारा देणे

आम्ही एका आश्रिताला आश्रय दिले .

6.कोलमडून पडणे- मनाने ढासाळणे 

 सीमाला परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यामुळे ती कोलमडून पडली .

7.आयुष्य गमावणे – जीवन संपवणे 

आपल्या दुःखांशी लढायला येत नसेल तर आयुष्य गमावणे हा एकच पर्याय नाही .

8.घाम गाळणे – खूप कष्ट करणे.

 आई आपल्या मुलांसाठी खूप घाम गाळते .

9.चार पैसे गाठीला बांधणे- पैशांची बचत करणे 

आई वडील नेहमी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चार पैसे गाठीला बांधतात .

10ताव मारणे – पोटभर खाणे

 समोर मसालेभात बघून समीरने तर त्याच्यावर भरपूर ताव मारला.

11.धूम ठोकणे – पळून जाणे 

समोर वाघाला बघून माझ्या मित्राने तर धूम ठोकली.

12.आव्हान स्वीकारणे – एखादे कारण पार पाडण्यास तयार होणे

 पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले .

13.कृतज्ञ  असणे – उपकाराची जाणीव ठेवणे  

सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ राहिले पाहिजे .

14.कृतघ्न होणे  – केलेले उपकार विसरणे 

 आपल्याला मदत करणाऱ्यांशी आपण कृतघ्न होऊ नये.

15.आभार मानणे – धन्यवाद देणे

 स्नेहसंमेलनाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे प्राचार्यांनी आभार मानले.

16.विनंती करणे – विनवणी करणे 

कार्यक्रमात निवेदकाने अध्यक्षांना स्थानापन्न होण्याची विनंती केली

17.तक्रार करणे-  गाराने मांडणे

 सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

18.दंग असणे – मग्न असणे 

समीरा सहलीतून आल्यापासून दंग असते.

19.विरून जाणे-  नाहीसे होणे

 पाण्यात मीठ टाकल्याबरोबर ते विरून गेले.

9वी द्वितीय सत्र वाक्प्रचार

20.खोडा घालणे – संकटे निर्माण करणे 

संजयने मिथिलाच्या परीक्षेच्या वेळी खोडा घातला.

 

 21.नजर लागणे – काहीतरी वाईट घडणे

 चालताना मुलाच्या पायाला दगड लागली की आई बोलते कुणाची तरी नजर लागली.

 22.पापांचा घडा भरणे – सर्वनाशाचा क्षण येणे 

कधी ना कधी आपल्या पापांचा घडा भरतोच.

 23.मातीला मिळणे – उध्वस्त होणे

दरडी कोसळल्या की चांगली घर सुद्धा मातीला मिळतात.

24.नाळ तुटणे – संबंध न राहणे

 दोन नात्यांमध्ये वाद विवाद झाले की त्यांची नाळ तुटते.

25.डोळे भरून येणे – डोळ्यात पाणी येणे

 आपण रडायला लागलो की आपल्या आईचे सुद्धा डोळे भरून येतात.

26.कावरा बावराहोणे – गोंधळून जाणे 

गर्दीत मी चुकलो त्यावेळी माझा जीव कावरा बावरा झाला. 

27.कटाक्ष असणे –  लक्ष असणे 

 मी अभ्यासाला बसले नाही तर माझी आई माझ्याकडे कटाक्ष नजरेने बघत होती.

28.जप करणे – एकच बाब पुन्हा पुन्हा बोलणे

 मला विठ्ठलाचा जप करायला खूप आवडते.

29.गुणगान गाणे – स्तुती करणे 

दहावीला मला 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाल्याने माझे शिक्षक माझे गुणगान गात होते.

30.तोंड उघडणे – थोडे तरी बोलणे 

कधीही न बोलणाऱ्या माझ्या मैत्रिणीने आज तोंड उघडले.

31. तोंड बंद करणे – गप्प बसणे

 मी शिक्षकांना माझ्या मैत्रिणीने अभ्यास केला नाही हे सांगत होती तेवढ्यात तिने माझे तोंड बंद केले. 

32.औक्षण करणे – पंचारतीने ओवाळणे 

माननीय श्री एकनाथ  शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिकांनी त्यांचे औक्षण केले.

 33.वंदन करणे – आदरभाव व्यक्त करणे 

मी देवाला वंदन केले. 

३४ .कावरा बावरा होणे – भीतीने बावरलेला 

समोर सापाला बघतात माझा जीव कावराबावरा झाला.

35.जीवाचा कान करणे – मन लावून ऐकणे 

दुसऱ्याच्या घरी काय चाललंय हे स्त्रिया जिवाचा कान करून ऐकतात. 

36.भान हरपणे – जाणीव न उरणे

 सुंदर दृश्य बघून माझे भान हरपले.

 37 .टाकून बोलणे – अपमान कारक बोलणे 

मुलगा  स्वतःच्याच आईला टाकून बोलत होता,ही पाहून मला तर वाईट वाटले. 

38.तंबी देणे  – धमकी देणे

 पैसे फेडले नाहीत म्हणून काही माणसे काकांना धमकावत होते.

अशा पद्धतीने आपण नववीच्या वाक्प्रचारांची छान तयारी करून या घटकाचे पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता.

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment