मी मुख्यमंत्री झालो तर निबंध मराठी 2023 | mi mukhyamantri zalo tar marathi nibandh 2023

मी मुख्यमंत्री झालो तर निबंध मराठी 2023 | mi mukhyamantri zalo tar marathi nibandh 2023 

नमस्कार! विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे निबंध विचारले जातात.त्यामध्ये कल्पनाप्रधान निबंध विद्यार्थ्यांना खूपच आवडतो. या कल्पनाप्रधान निबंधापैकीच एक निबंध आज आपण पाहणार आहोत, की जो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तो निबंध म्हणजे मी मुख्यमंत्री झालो तर ….

मी मुख्यमंत्री झालो तर… निबंध मराठी 2023 |  If I become Chief Minister… Essay Marathi/mi mukhyamantri zalo tar marathi nibandh 2023 

आज आपण देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललेल्या घडामोडी पाहिल्या तर खरोखरच भविष्यामध्ये लोकशाही जिवंत राहील की नाही असा प्रश्न मनामध्ये येऊन जातो. पूर्वीच्या काळी राजकारणात येणारी व्यक्ती मला काहीतरी समाजाची सेवा करायला मिळावी. या हेतूने व्यक्ती राजकारणात येत होत्या, परंतु अलीकडे राजकारण म्हणजे बिजनेस किंवा एखादा व्यवसाय असे स्वरूप त्याला प्राप्त झाल्यामुळे लोकशाही धोक्यात येताना दिसत आहे… असो आपण आपल्या विषयाकडे मूळ वळूया “मी मुख्यमंत्री झालो तर….” अर्थात मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालो तर अशा अर्थाने आपण निबंधाची मांडणी करूया.

 

मी मुख्यमंत्री झालो तर मराठी निबंधाची सुरुवात | If I become Chief Minister… Essay Marathi starting | mi mukhyamantri zalo tar marathi nibandh

 

कोणत्याही व्यक्तीला प्रतिष्ठित व्यक्ती बनायला आवडते. मुख्यमंत्री हे देखील एखाद्या राज्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे पद आहे. मुख्यमंत्री यांची निवड देखील लोकशाही मार्गाने केली जाते, पण यदा कदाचित जर मला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर मी काय करेल…..

सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये या पक्षातून त्या पक्षामध्ये जाणे. आपल्या पक्षाशी बांधिलकी नसणे. सत्तेसाठी काहीही करणे… अशा मानसिकतेच्या लोकांना चांगला धडा शिकवेल आणि आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी पक्ष बंदी कायदा व त्याची अंमलबजावणी जातीने लक्ष घालून करेल. आजच्या राजकारणात चाललेला घोडेबाजार हा कायमचा संपवेल. राजकारणाकडे लोकांची दृष्टी बदलण्याचा मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा राजकारण म्हणजे समाजकारण या ध्येयाने प्रेरित होऊन मी काम करेल माझ्या मंत्रिमंडळामध्ये तशी जाणीव जागृती निर्माण करेल.

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला सहकार्य करण्यासाठी मंत्रिमंडळ असेल, त्या मंत्रिमंडळामध्ये घराणेशाहीला वाव देणार नाही. आज ज्या तरुण पिढीला राजकारणामध्ये येऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा आहे. अशा नेतृत्वांना मी संधी देईन.आपल्या महाराष्ट्राचा विकास करता करता देशाचा देखील विकास करेल.

 

मी मुख्यमंत्री झालो तर मराठी निबंधाची मध्य | mi mukhyamantri zalo tar marathi nibandh middle 

 

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज जो शेतकरी हवालदील झाला आहे. त्याच्या शेतीमालाला योग्य भाव नाही तर दुसरीकडे निसर्ग देखील त्याला साथ देत नाही.अशावेळी भारतामध्ये वस्तू हमीभाव कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल परंतु शेतीमालासाठी महाराष्ट्र राज्यापुरता का होईना मी हमीभाव कायदा लागू करेन जेणेकरून इथल्या बळीराजावरती आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्मसन्मानाने जगता यावे ते वयोवृध्द झाल्यानंतर त्यांना शेतीतील कामे होत नाहीत. त्यांच्यासाठी किमान उदरनिर्वाह करता येईल एवढी तरी पेन्शन योजना लागू करेल. यामुळे शेतकऱ्याचे उतारवयातील जगणे आनंददायी बनेल.

अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर सारखे आजार वाढत आहेत. आरोग्याच्या अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. यामागे एकच कारण आहे की लोकांना सेंद्रिय स्वरूपाचे अन्नधान्य मिळत नाही.शेतकरी तसेच व्यापारी वर्ग अलीकडे मोठ्या प्रमाणात कीटकनाशके यांचा वापर करतात शेतातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अनेक गैरप्रकार केले जातात भेसळ केली जाते हे सर्व मी बंद करेन. जेणेकरून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल. सेंद्रिय शेती करण्यासाठी बळीराजाला खूप मोठी मोठी अनुदाने देईन. थोडक्यात आपल्या बळीराजाला आत्मसन्मानाने वागवण्यासाठी मी कटिबद्ध राहील.

 

मी मुख्यमंत्री झालो तर बऱ्याच गोष्टी करणार आहे.त्यापैकी एक गोष्ट म्हणजे आज आपल्या राज्यामध्ये महिला ,भगिनी सुरक्षित नाहीत त्यांच्यावरती विनयभंग, बलात्कार,कौटुंबिक जाच,मारहाण,मानसिक छळ, कामाच्या ठिकाणी दुय्यम वागणूक यांना आळा घालेन.ज्या पाशवी वृत्तीच्या लोकांची प्रकरणे न्यायालयात तात्काळ निकाली निघून त्या आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी.यासाठी नवा कायदा आणेन आणि माझ्या महाराष्ट्र राज्यातील महिलांना एका सुरक्षित वातावरणाची हमी देईन. कारण ती आज काळाची गरज आहे.

मी मुख्यमंत्री झालो तर आज शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनवले जात आहे. ‘घोका आणि ओका’ हे जे प्रकार शिक्षण प्रक्रियेमध्ये चाललेले आहेत. हे प्रकार बंद करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याच बरोबर उत्तम खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करेन. शाळेत ज्या पद्धतीने मराठी, हिंदी इंग्रजी यासारखे विषय शिकवले जातात त्याच पद्धतीने खेळाच्या तासाला देखील महत्व दिले पाहिजे. यासाठी एक नवा कायदा करेन जेणेकरून पुढची पिढी ही सुदृढ पिढी निर्माण होईल. राष्ट्रकुल सारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याचे नाव अग्रस्थानावर आणण्याचे काम करीन.

आज महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य, दवाखाने,इतर पायाभूत सुविधा व सुखसोईंबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली जाते. अगदी गरीब घरातील व्यक्ती देखील सरकारी दवाखान्यामध्ये जायला तयार नसतात, कारण त्यांचा तेथील उपचार व्यवस्थेवर विश्वास नाही. अशावेळी ही यंत्रणा पुन्हा एकदा सुव्यवस्थित करण्यासाठी मी मुख्यमंत्री या नात्याने प्रयत्न करेन. खाजगी दवाखान्यापेक्षाही सुंदर सरकारी दवाखाने असतील यासाठी विशेष मेहनत घेईन.

कोरोना काळामध्ये आपण पाहिले असेल अनेक लोकांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला.भविष्य काळामध्ये देखील प्रदूषणाचे अनेक प्रश्न आपल्यापुढे आ वासून असून उभे राहणार आहेत. म्हणूनच जर आपल्याला आपल्या राज्यामध्ये औद्योगिक विकास करण्यासाठी, घरे बांधण्यासाठी, रस्ते तयार करण्यासाठी तसेच इतर कोणत्याही कारणस्तव झाडे तोडावी लागली तर एक झाड तोडण्याच्या बदल्यात दहा झाडांचे वृक्षारोपण असा एक कायदाच मी आणेन. जेणेकरून लोकांना मिळणारा प्राणवायू सहज मिळू शकेल.

मी मुख्यमंत्री झालो तर मराठी निबंध शेवट | If I become Chief Minister… Essay Marathi end 

मी मुख्यमंत्री झालो तर……आजची तरुण पिढी जी व्यसनाधीन बनताना दिसत आहे. या तरुण पिढीला व्यसनांपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळ्या जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करेल. त्याचबरोबर या मुलांना व्यसनासाठी प्रोत्साहित करणारे दुकानदार,व्यावसायिक, अवैध धंदे करणाऱ्या टोळ्या यांच्या वरती कडक कारवाई करेल.

खरोखरच महाराष्ट्र हे भारतातील अतिशय पुढारलेले राज्य आहे. ते अजूनच प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि आपल्या भारताच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलेल हे अगदी शंभर टक्के खरे आहे पण हे सर्व कधी होईल तर मी मुख्यमंत्री झालो तर……

आज मी मुख्यमंत्री झालो तर… काय करेल याविषयी अगदी मनमोकळेपणाने माझे विचार मांडले. भविष्यात मुख्यमंत्री बनण्याची इच्छा तर आहे पण बनेन की नाही हे मला माहित नाही. परंतु ज्या क्षेत्रामध्ये मी जाईन त्या क्षेत्रामध्ये मात्र अतिशय मन लावून काम करेल हे मात्र नक्की खरे आहे. मला वाटते प्रत्येकानेच आपण ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये कोणतेही काम, पद लहान मोठे न मानता त्या पदाला न्याय देण्याचे काम केले तर कोणतेही पद प्रतिष्ठा पावल्याशिवाय राहत नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र मुख्यमंत्री हे एवढे मानाचे पद पण त्यावरून चाललेली लढाई आणि कुरघोडीचे राजकारण खरोखरच विचार करायला लावणारे आहे.

मी मुख्यमंत्री झालो तर पहा

मी मुख्यमंत्री झालो तर या निबंधाचे सार

आजच्या या निबंधाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री झालो तर काय करेन याविषयी विचार मांडले .आपल्या राष्ट्राचा अधिकाधिक विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी कोणते पावले उचलावी लागतील याविषयी मी माझे मत अगदी मुक्तपणे मांडले.

आमचे इतर निबंध

गुरुपौर्णिमा मराठी निबंध 

मी लोकशाही बोलतेय………

आमचा आजचा मी मुख्यमंत्री झालो तर हा  मराठी निबंध आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन निबंधासह तोपर्यंत धन्यवाद!

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment