मी एक पूरग्रस्त बोलत आहे मराठी निबंध 2023

mi ek purgrast bolat aahe marathi nibandh 2023 : आजच्या लेखात आपण एका पुरग्रस्ताचे मनोगत पाहणार आहोत.

पूरग्रस्ता बोलत आहे मी छोट्याशा गावात राहत आहे . घरचे परिस्थिती खूप बेताची होती. आमचा सगळा व्यवहार शेतीवरच चालत असे आम्ही जेमतेम या शेतीवर गुजराण करत असल्याने सगळे लक्ष शेतीवरच केंद्रित करत होतो. माझे वडील शिक्षण चांगले असले तरी शेतीवरच आपला उदरनिर्वाह करत होते ,म्हणून मलाही शेतीच करावी लागली .

माझे ज्यावेळेस लग्न झाले त्यावेळेस कर्जाचा बोजा डोक्यावर येऊन पडला .कधी शेतीवर उत्पन्न जास्त तर कधी कमी असते हे माहित आहे, पण कर्ज वाढत गेले लहान-लहान मुलं शाळेत जाऊ लागली. घरसंसार शेतीवरच असल्याने सगळे लक्ष शेतावरच होते . आम्ही नवरा -बायको दिवसरात्र शेतात राबत होतो.,तरीही कर्ज सावकारी कर्ज बोकांडी असल्यामुळे मानसिक त्रास होत होता .

मी एक पूरग्रस्ता बोलत आहे मराठी निबंध2023

शेताच्याच बाजूला नदी आहे त्या शेतीला पाणी नदीचेच मिळत होते म्हणून शेती चांगली येत होती. सावकारी कर्ज असल्याने चांगली शेती, येणाऱ्या पिकातून उत्पन्नातून सावकाराचे पैसे द्यावेत असा विचार होता.

जुलै महिना चालू होता, एका महिन्यात सोयाबीन आणि कोथिंबीर लावली होती,त्यातून भरपूर कमाई होणार हे चित्र दिसत होते .

पावसाळ्याचे दिवस असल्याने मनात भीतीचे काहूर माजले, पण ‘भित्यापोटी ब्रह्मराक्षस ‘ म्हणतात ते चुकीचे नाही .अशाच वेळी आभाळ भरून यायला लागले तसे तसे मनात वेगवेगळे विचार येऊ लागले.

संध्याकाळ झाली होती, सगळीकडे शांतता पसरली होती त्यातच डोक्यात नको ते विचारांनी मनात धास्ती भरली होती .

संध्यााकाळी चालू झालेला पाऊस हा जोराचा होता ,कोणी कोणाकडे विचारपूस करण्यासाठी घराबाहेर जायला घाबरत होते , पण मी मात्र निपचित पडलो होतो , मला काही सुचेना डोळ्यासमोर कोथंबिर दिसत होती आणि मानगुटीवर बसलेला सावकार. बाहेर जसजसा पावसाच्या धारा येऊ लागल्या तस तशा माझ्या डोळ्यातून त्याच वेगाने अश्र गळगळा वाहू लागले .

मुलांना आजूबाजूला मजा करताना पाहून त्यांचे भविव्याबाबत काळजी वाटू लागली , आपली आहे ती जमीन पोरांच्या हातातून जाणार म्हणून, अधिकच डोळ्यातील पाण्याचा ओघ वाढतच होता .

घरात पत्नी हीच माझी मनस्थिती जाणत होती; पण तिचे जवळ येऊन काही बोलण्याचे धाडस होत नव्हते , तिचेही डोळे पाणावले होते , तिच्या चेहऱ्यावर उदासी भरली होती पण कोणी कोणाला काही न बोलण्याची जणू शपथ घेतली काय असेच वाटत होते .

आलेल्या परिस्थितीनुसार रहावे लागणार होते , हे जे संकट आले होते ते उघड्या डोळ्यांनी पहावे लागत होते . याच्यापलिकडे काहीही करत नव्हतो .

मी पार खचून गेलो होतो ,हे फक्त बायकोच जाणत होती , तिलाही जवळ येऊन ढसाढसा रडावे वाटत असावे , पण मुलं कळती झाली असल्याने लहान मुलांप्रमाणे रडणं योग्य नव्हते .

सकाळ उठून शेतावर जावे तर सगळे कडे पाणीच पाणी होते जणू समुद्रच असल्याने जाणवत होते .आपली शेती कुठे आहे हेच दिसत नव्हते ,सगळा परिसर जलमय झाला होता .

दोन दिवसांनी पाणी ओसरले आणि जी कोथंबीर होती त्याचा मागमूसही काहीच शिल्लक राहिला नाही,तसतसे सावकार मोठमोठ्या आवाजातील,निर्दयी आपली शेती गिळंकृत करणार म्हणून हे निश्चित होते .

मला तेव्हापासून भूक लागू न राहिली त्यातच मुलांच्या शाळेचे ओझे हे चालूच होते ,घरात होते तेवढे पैसे संपले होते ,नातेवाईक कोणीच विचारपूस करायला सुद्धा तयार नाहीत ,मित्रांनी तर कधीच पाठ फिरवली होती.

पुराचा फटका हा अनेकांना बसला असला तरी प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी होती,माझी परिस्थिती ही लग्नात झालेला अमाप खर्च हा मला स्वस्थ बसू देत नव्हता .मला कुठेतरी रोजगार पहावा म्हणून शोध चालू झाला .

एका कंपनीत काम पाहिले 10 तास ड्युटी त्यातच कमी पगार यामुळे खूप मानसिक स्थिती खालावली .सावकाराचे कर्ज हे ह्यातून फिटणारनाही तरीही करत होतो .बायकोने सुद्धा कधी कोणाच्या शेतात काम केले नाही पण दुसऱ्याच्या शेतात काम करायला जाताना डोळ्यात पाणी आणून तशाच अवस्थेत पदराने डोळे पुसत पुसत घाम गाळत कष्ट करावे लागत होते .गावातील लोक कुचेष्टेने पाहू लागले,मिश्कीलपणे हसू लागले .

माझी ड्युटी चालूच होती,सगळा प्रपंच पाण्यातून वाहून गेला होता ,कोणाचा आधार म्हणून काहीच उरला नव्हता .त्यातच एक दिवस या सगळ्या काळजीपोटी आजारी पडू लागलो.ताप वाढू लागला ,मोठ्या दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून साध्याच गावातील दवाखान्यात गेलो ,घरात खायची पंचाईत होती म्हणून तशाच अवस्थेत कामाला जावे लागले,आणि तापाची तीव्रता वाढत होती ,कंपनीत कोण कोणाला विचारत नव्हते,आपलं म्हणणे कोणाला सांगणार म्हणून तसाच काम करत होतो,अचानक खाली कोसळलो .

दोन दिवसांनी मी दवाखान्यात होतो माझा एक हात निकामी झाला होता ,त्यातच सावकारने जमिनीचा कागद ठेवून गेला,हे पाहून सगळे अंगच थंड पडले .कसाबसा त्यातून वाचलो पण शेती गेली .गाव सोडून सासरवाडीला येऊन स्थायिक झालो आहे .त्यातच तुमची भेट झाली मन हलके झाले.

आमचे इतर लेख

मी मुख्यमंत्री झालो तर 

मी लोकशाही बोलतेय 

माझा आवडता ऋतू पावसाळा 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment