माझा आवडता छंद निबंध 2023| mazza avdtaa chandh nibandh

माझा आवडता छंद निबंध

mazza avdtaa chandh nibandh एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे करायला आवडणे ती गोष्ट करत असताना अत्यंत आनंदी अणि उत्साही वाटणे म्हणजे छंद होय.

आपल्याला प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो.कोणाला गाण्याचा छंद असतो तर कोणाला नाचण्याचा, लिहिण्याचा तसेच वाचण्याचा छंद असतो.

आज प्रत्येक जण आपापल्या आवडीचा छंद जोपासत असतो.कारण आपल्या आवडती गोष्ट करण्यात आपण इतके रमुन जातो की दिवस मावळुन रात्र कधी होऊन जाते हे देखील आपणास लक्षात राहत नसते.

लहानपणी आपण अनेक गोष्टी करत असतो अनेक प्रकारचे खेळ खेळायला क्रीडा करायला आपणास आवडत असते.पण एक गोष्ट अशी असते जी आपल्या हृदयाच्या एकदम जवळ असते.

mazza avdtaa chandh nibandh.

कोणासाठी ही गोष्ट लेखन किंवा वाचन असु शकते, कोणासाठी ही गोष्ट पेंटिंग चित्रकला असु शकते तर कोणासाठी ही गोष्ट नृत्य,गायन देखील असु शकते.

mazza avdtaa chandh nibandh

म्हणजेच आपल्या प्रत्येकाला विभिन्न प्रकारचा छंद असतो.माझा आवडता छंद आहे वाचन अणि लेखन.

मला वाचणाची अणि लिहिण्याची खुप आवड आहे.वाचन अणि लेखन हा माझा अत्यंत आवडता छंद आहे.

शाळेत असताना लहानपणापासुनच मला नवनवीन विषयावर वाचन करायची अणि लेखन करायची अत्यंत आवड होती.शाळेत असताना मला निबंध लिहायला खुप आवडायचे.

ज्ञान ही जगातील सर्वात मोठी शक्ती मानली जाते कारण ज्ञानाचे वाचनाचे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात खुप अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वाचन केल्याने आपल्या वैचारिक बौद्धिक क्षमतेमध्ये विकासामध्ये वाढ होते.आपल्या ज्ञानात अधिक भर पडते.नियमित वाचन केल्याने आपण विचार संपन्न बनतो आणि हळूहळू आपणास आपल्या विचारांना इतरांसमोर मांडण्यासाठी लेखणाची देखील सवय लागते.

माझ्या सोबत देखील असेच झाले वाचता वाचता मलाही माझे विचार व्यक्त करण्याची इच्छा तसेच आवड निर्माण झाली अणि मग माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी लेखन हे माध्यम निवडले.

दहावी बारावी मध्ये शिकत असताना लेखनातुन मी माझ्या सर्व भावना विचार राग चिंता मनाची तळमळ निबंधाच्या माध्यमातून व्यक्त करू लागलो.हळुहळु माझ्या ह्या छंदाला अधिक तीव्ररूप प्राप्त झाले ते महाविद्यालयीन जीवनात.

महाविद्यालयात मराठी साहित्य बीए एम ए मध्ये शिक्षण घेत असताना मला महाविद्यालयातील ग्रंथालयात वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचायला मिळाली.

महाविद्यालयात शिकत असताना मी वाचलेले पहिले साहित्य नटसम्राट हे नाटक होते.

अणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आजूबाजूला असलेल्या सर्व साहित्यिक वातावरणामुळे देखील माझी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून लेखक म्हणून जडणघडण होण्यास सुरुवात झाली.

मला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अशा अनेक व्यक्तींचा सहवास लाभला ज्यांचा वाचनाशी लेखणाशी अत्यंत घनिष्ठ संबंध होता.

त्यात माझा स्पेशल विषय मराठी साहित्य असल्याने सर्व साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक वर्गाचे उत्तम मार्गदर्शन मला लाभले.

रोज सकाळी मी महाविद्यालयातील ग्रंथालयात जाऊन कवितासंग्रह कथा लेख वाचत बसायचो.अणि रिकाम्या वेळात स्वता देखील मोडके तोडके का होईना लिहिण्याचा प्रयत्न करायचो.

शालेय जीवनापासून निबंध लिहिण्याची आवड तर मला होतीच पण महाविद्यालयीन जीवनात निबंधाच्या पलीकडे वेगवेगळे साहित्य लेख मला वाचायला मिळाले.ज्यामुळे मी देखील छोटेछोटे लेख लिहायला सुरुवात केली.

माझ्या महाविद्यालयात शिकवत असलेल्या सर्व प्राध्यापकांची साहित्य ह्या विषयावर उत्तम पकड होती.त्यामुळे वाचन अणि लेखन या दोघे बाबतीत मला माझ्या सर्व प्राध्यापकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.

माझ्या प्राध्यापकांमध्ये काही प्राध्यापक दिग्दज साहित्यिक देखील होते त्यांनी मला लेखण कसे करायचे लेख कसे लिहायचे ह्या सर्व बाबतीत उत्तम मार्गदर्शन केले.

महाविद्यालयीन जीवनात पुस्तकांच्या केलेल्या विपुल वाचनाने माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास तसेच धाडस निर्माण झाले.अणि मी देखील छोटेछोटे लेख लिहायला सुरुवात केली.

गोपाळ गणेश आगरकर म्हणतात की वाचनाने माणुस जुना राहत नाही तो नवा बनत जातो.हे एकदमच बरोबरच आहे वाचनाने मला विचारसंपन्न बनवले.अणि मग व्यक्त होण्यासाठी मी लेखनाकडे वळालो.

अणि मी धाडस करुन इतरांचे लेख वाचण्यासोबत आत्मविश्वासाने स्वताही लेख लिहायला आरंभ केला.

मला लहानपणापासुन शाळेत असल्या पासुन वाचणाची आवड होती.त्या आवड अणि छंदाला एक योग्य दिशा महाविद्यालयीन जीवनात मिळाली अणि मी वाचता वाचता लेखन करू लागलो.

पुढे मी माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेखनाचे काम शोधु लागलो पण लेखकांना मानधन खुप कमी असल्याने मला अनेक जणांनी लेखनाला छंदापुरता सीमीत ठेवून दुसरी एखादी नोकरी करण्याचा सल्ला दिला.

पण माझे मन ही गोष्ट मान्य करायला अजिबात तयार नव्ह्ते एकेदिवशी मी युटयुब वर सर्च केले लेखकांसाठी कोणकोणते जाॅब आहेत कोणकोणते करीअर आॅप्शन आहेत या विषयी सर्च केले.

तेव्हा खुप सर्च केल्यावर मला एक नाव ऐकायला मिळाले ते म्हणजे फ्रिलान्स कंटेट रायटिंग.

यात आपणास मोबाईल,लॅपटॉप इत्यादी माध्यमातून आपल्या क्लाईंट करीता लेख लिहायचे असते आणि त्याबदल्यात क्लाईंट आपल्याला पैसे देत असतो.

पण मी लिहायचो त्या लेखांमध्ये अणि यात खुप फरक होता त्यामुळे मला सुरूवातीला हे काम शिकण्यासाठी किमान एक वर्ष इतका कालावधी द्यावा लागला.

ह्या कालावधी दरम्यान मला कामाचा कुठलाही अनुभव नसल्याने मला सुरूवातीला खुप कमी पैशात इतरांसाठी कंटेट रायटिंगचे काम करावे लागले.

हळुहळु मला किवर्ड रिसर्च एस ईओ ह्या गोष्टींविषयी समजु लागले मग मी वेबसाईटच्या स्वरुपाचे लेख लिहायला लागलो.

अणि मग माझ्या ह्या लहानपणापासूनच्या लेखणाच्या छंदाला मोठेपणी एक योग्य प्लॅटफॉर्म प्राप्त झाले.अणि मी लेखनाच्या माध्यमातून पैसे कमवायला सुरूवात केली.

प्रत्येक क्षेत्रात सुरूवातीला आपणास काही अडचणींना सामोरे जावे लागत असते मला देखील कंटेट रायटिंगचे काम करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

कामाचा अनुभव नसल्याने सुरूवातीला मला खुप कमी रेटमध्ये जास्त काम करण्यास सुरुवात करावी लागली.

आपण लिहिलेला लेख युनिक आहे किंवा नाही तपासण्यासाठी वेगवेगळ्या टुलसचा वापर करावा लागतो हे देखील मला सुरूवातीला माहीत नव्हते.पण हळूहळू सर्व गोष्टी शिकत गेलो.

आज कंटेट रायटिंग हे वाचणाची लेखनाची आवड असलेल्या तरूण पिढी करीता एक उत्तम करीअरचे आॅप्शन आहे.

यात आपल्याला आपल्या लेखनाच्या माध्यमातून पैसे कमवायला मिळते.अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपले लिहिलेले लेख इंटरनेटवर लाखो लोक वाचतात.त्यावर प्रतिसाद देखील देतात.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर वाचनाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला योग्य ती दिशा प्राप्त होत असते आपण विचार संपन्न बनतो.

विविध कथा लेख कविता कादंबरी वैचारिक लेख यांच्या वाचनाने आपल्या बौद्धिक अणि वैचारिक क्षमते मध्ये देखील खुप चांगली वाढ होते.आपला सर्वांचा मानसिक विकास होतो.

वाचनामुळे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.अनेक महापुरुष संत यांच्या जीवणाचा त्यांच्या जीवनसंघर्षाचा परिचय होतो.

वाचन केल्याने आपणास ज्ञात प्राप्त होते आपण सज्ञान होतो अणि ह्या प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे आपण आपल्या जीवनातील मोठयात मोठ्या संकटांवर मात करू शकतो.

आपण रिकाम्या वेळात पुस्तकांचे वाचन करायला हवे. आपल्या आवडीच्या विषयावर आपल्या मनात येईल त्या विषयावर लेखन करायला हवे.

कारण हा तो क्षण असतो जेव्हा आपण खुप आनंदी अणि उत्साही असतो.

असा होता माझा आवडता छंद ज्याची सुरूवात शालेय जीवनापासून वाचनापासुन झाली अणि पुढे जाऊन याला लेखनाची दिशा मिळाली.

आपल्या आवडीचा छंद जोपासत आपले करीअर करण्यामध्ये आज प्रत्येक विद्यार्थ्याला विशेष रूची असते.

पण आपल्या छंदाला योग्य ते व्यासपीठ तसेच दिशा प्राप्त न झाल्याने अनेक व्यक्तींना आपल्या आवडीच्या छंदाला कमाईचे माध्यम करीअरचे साधन बनवता येत नसते.

आज आपण प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या छंदाला जोपासायला हवे.आपल्या छंदाला योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा.

आमचे इतर निबंध

संत एकनाथ यांचे जीवनचरित्र

अधिक मास म्हणजे काय माहिती

मी पूरग्रस्त बोलतोय /आत्मकथन

माझी आई मराठी निबंध

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment