माझा आवडता ऋतु पावसाळा निबंध मराठी | Maza Aavdta Rutu Pavsala Marathi Essay

आजच्या मराठी सेल्फ स्टडी मध्ये आपण माझा आवडता ऋतु पावसाळा हा मराठी निबंध पाहणार आहोत. निबंध लेखन हे एक लेखन कौशल्य आहे. सेल्फ स्टडीच्या माध्यमातून मी आज आपणास निबंध कसे करावे? याविषयी माहिती सांगणार आहे त्यासाठी सध्या पावसाळा सुरू असल्याने maza-avadata-rutu-pavsala-marathi-essay हा विषय आपण निवडलेला आहे.कारण का तर निसर्गाचे निरीक्षण करून तुम्ही हा निबंध तुम्ही छानपणे लिहू शकता.

मराठी निबंध माझा आवडता ऋतु पावसाळा
मराठी निबंध माझा आवडता ऋतु पावसाळा

 

माझा आवडता ऋतु हा निबंध हा इयत्ता 5 वी पासून 10 वी किंवा 12 वी बोर्ड परीक्षेला देखील या आधी विचारला गेला आहे. तर आज आपण या निबंधाला सुरुवात करूया माझा आवडता ऋतु हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल नि यानंतर तुम्ही असाच एक निबंध सेल्फ स्टडी करायचा आहे. maza avdta rutu pavsala in marathi हा निबंध अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यासाठी देत आहे. तो आपल्या वहीत नोंदवून ठेवा मात्र परीक्षेत तो पाठ न करता आपल्या भाषेत लिहा. 

माझा आवडता ऋतू- पावसाळा

   भारतातील ऋतुंची संख्या ही तीन आहे.काही काही देशात ती दोनच पाहायला मिळते, परंतु भारतात ती तीन पाहायला मिळते.भारत देशात प्रत्येक बाबतीत विविधता दिसते तसेच ती ऋतुंच्या बाबतीत देखील पहायला मिळते. उन्हाळा, पावसाळा,हिवाळा असे भारतात तीन ऋतु आहेत. जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळयाचे असतात. काही लोकांना उन्हाळा आवडतो, काही लोकांना हिवाळा आवडतो पण, मला आवडणारा ऋतु आहे तो पावसाळा.

       भारतात उन्हाळया नंतर येणारा पावासाळा हो वेगळा सुखानुभव दुऊन जातो.मला पावसाळा हा ऋतु आवडतो कारण, मला पावसात जायला खुप आवडते. पहिल्या पावसात  जण्याची मजा काही औरच असते. उन्हाळयातील उन्हाच्या चटक्याने जी अंगाची लाही लाही झालेली असते. त्याला थंडावा हा पावसाच्या पाण्यामुळे मिळतो. तसे पाहिले तर सर्व सजिवांना पाऊस आवडतो. मोर पावसाची वाट पाहत असतो. आकाशात ढग जमलेले दिसले की मोर थुई ‍थुई नाचू लागतो. पावसाच्या पाण्यामुळे एक वेगळीच टवटवी ही झांडामध्ये पाहायला मिळते जी कुठल्याही पाण्याने येणार नाही.

       पावसाच्या दिवसात आम्ही खूप मजा करतो. पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मी आणि माझो भावंडे खूप खूप भिजतो. कधी कधी गारा सुध्दा पडतात, मग आम्ही गारा ही खातो. पण आम्ही आजारी पडू नये म्हणून आई व बाबा ओरडतात. कधी कधी इतका पाऊस पडतो की, आमच्या शाळा सुध्दा बंद कराव्या लागतात. मग आम्हाला खुप मजा वाटते. शाळा बंद असल्यामूळे आम्ही घरीच असतो, मग घरी बसुन आम्ही कॅरम खेळतो ,कधी चारे पोलीस खेळतो. मग आई आमच्यासाठी गरम गरम भजी करते. पावसाळयात गरम गरम भजी खाण्याची मजा काही औरच असते. पाऊस पडून गेल्यावर जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा एक वेगळेच रूप सृष्टीचे पाहायला मिळते. सर्व सृष्टी जणू स्वच्छ न्हाऊन निघाली आहे असे दिसते जागो जागी पाणी साचलेले पाहायला मिळते झाडे स्वच्छ आण टवटवीत दिसतात. शेतामध्ये, रस्त्यांवर पाणी साचलले दिसते. आम्ही त्या साचलेल्या पाण्यात सुध्द उडया मारतो, त्या वेळेस कपडे खराब होतील, आई ओरडेल याची पर्वा आम्हाला नसते. माझा आवडता ऋतु पावसाळा हा अतिशय सोपा निबंध आहे. 

       जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो, परंतु श्रावणातील पावसाची मजा या पेक्षा वेगळी असते. श्रावणात येणारा पाऊस म्हणजे उन आण पावसाचा खेळ असतो. कधी उन पडते, कधी पाऊस पडतो तर, कधी उनात पाऊस पडतो. या उन पावसाच्या खेळात मग आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळते. मग तो जो नजारा असतो त्याच वर्णन काय करावे. म्हणून किती तरी कवीं या श्रावणात येणाऱ्या पावसावर  कविता रचल्या आहेत.

 

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,

   क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे,

 वरती बघता इंद्रधनूचा, गोफ दुहेरी विणलासे,

 मंगल तोरण काय बांधले, नभोमंडपी कुण भासे,

 झालासा सूर्यास्त वाटतो, सांज आहाहा, तो उघडे

  सर शखरावर उंच घरांवर, पिवळे पिवळे ऊन पडे.

           

       ही बालकवींची कवीता श्रावणातील वर्णन अगदी हुबेहुब करते. पाऊस येतो म्हणून सर्व सजिंवाना  पिण्यासाठी पाणी मिळते, शेतीला पाणी मिळते. शेतकरी तर या पाऊसाची वाट अगदी चकोर पक्ष्या सारखी पाहत असतो. उन्हाळयानंतर येणारा पावसाळा हा सर्व सृष्टीला एक प्रकारचा सुखद गारवा देऊन जातो. मन तृप्त करुन जातो. गणरायाचे आगमन हे पावसाळयातच होते. गणपती बसवताना पावसामुळे येणाऱ्या अडचणी आण त्या अडचणींतुन मार्ग काढताना खूप मजा येते, गणपती विसर्जन करताना पाऊस आला तर मग आमची मजाच होते. तसे तर जास्त वेळ कुणी पाऊसात भजू देत नाही मग विसर्जनाच्या निम्मीत्ताने तरी आम्हाला जास्त वेळ भजण्याची संधी मिळते. मग पूर्ण विसर्जन हे पावसातच होते.कधी सोसाटयाच्या वाऱ्यासह, कधी गारांसह, कधी रिम-झिम, कधी संथ हळूवार असा येणारा मन आनंदाने भरुन टाकणारा पाऊस मला खूप खूप आवडतो. पावसाळयात येणाऱ्या थोडया फार अडचणी सोडल्या तर पावसाहा ऋतु मला खुप खुप आवडतो. पावसाळयातील या सुखद आवडणी कायम मनात घर करुन जातात. अश्या या सुखद आठवणी ठेवूण पाऊसनिघून जातो. आण मग आम्ही पुढच्या वर्षी येणाऱ्या पावसाची वाट पाहत बसतो.  

 वर्णनात्मक निबंध लिहिताना ही काळजी घ्या 

 1. ज्याचे वर्णन करणार आहोत ते वर्णन हुबेहूब करा. 

    उदा. पहिला पाऊस 

 2. भाषाशैली साधी सहज व सोपी ठेवा . 

 3. 3 ते 4 परीचेद निबंध लिहा. 

 4. वर्णन डोळ्यापुढे उभे राहील अशी शबदफेक करा. 

 यासाठी वर दिलेला माझा आवडता ऋतु पावसाळा हा निबंध नीट वाचा त्याचा सेल्फ स्टडी करा नि याच पद्धतीने तुम्ही इतर वर्णनात्मक निबंध देखील छानपणे लिहू शकता.माझा आवडता ऋतु हा निबंध आपल्याला कसा वाटला ते कमेन्ट करा. धन्यवाद!

 

 

                                                   

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment