मराठीतील महत्वाच्या ऐतिहासिक म्हणी 2023 | Marathitil Mhttavchya Eitihasik Mhani

मराठी भाषेचा तथा मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करत असताना म्हणीना विशेष असे महत्त्व आहे. आज आपण आपल्या मराठी भाषेतील काही अशा ऐतिहासिक म्हणी अभ्यासणार आहोत की ज्या म्हणी मागे काहीतरी इतिहास दडला आहे.म्हणी आकाराला येताना त्यामागे काही एक इतिहास असतो अशी वेगळी मांडणी आपण पाहणार आहोत. ही आपल्याला नक्कीच आवडेल.

ऐतिहासिक म्हणी व त्यामागील इतिहास

                          ऐतिहासिक म्हणी व त्यामागील इतिहास

ऐतिहासिक म्हणी 

म्हणी म्हणजे काय ऐतिहासिक म्हणी अशी सविस्तर चर्चा पुढे येईलच ,परंतु त्या अगोदर म्हणी ह्या आपल्याला खूप काही सांगून जात असतात. दैनंदिन जीवनात देखील सहज बोलत असताना माणसाच्या तोंडून अनेक मनी बाहेर पडत असतात. जसे की अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजेच काय तर आपल्याला गरज असेल तर आपल्याला कोणापुढेही नतमस्तक व्हावे लागते ,कारण आपल्याला आपली गरज पूर्ण करावयाची असते. कितीतरी मोठा असेल या मनी केवळ अर्धा शब्दांमध्ये सांगतात म्हणून भाषेचे वैभव म्हणून म्हणी अतिशय महत्वाचे आहेत.

आजच्या या म्हणींमधील विशेष लेखात आपण काही मोजक्या ऐतिहासिक  व त्यामागील इतिहास अभ्यासणार आहोत. जेणेकरून आपल्याला अमुक म्हण आणि त्यामागील इतिहास समजेल चला तर मग सुरुवात करूया मनी म्हणजे काय इथपासून.

म्हणी म्हणजे काय ?

 म्हणी या भाषेचा अमूल्य ठेवा आहेत. प्रत्येक भाषेमध्ये म्हणी आढळतात याचे कारण प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. संस्कृती म्हटले की मानव जातीतील चालीरीती ,परंपरा, प्रथा ,वेशभूषा ,खाद्यपदार्थ ;अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो.म्हणीमध्ये जे सांगितलेले असते ते अतिशय मार्मिक असते. अतिशय कमी शब्दांमध्ये खोलवर अर्थ दडलेला असतो. वर्षानुवर्षांच्या वापरातून या म्हणी सिद्ध झालेल्या असतात. संस्कृती संक्रमणातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या म्हणी पोहोचतात परंतु त्यातील आशय हा जास्त परिणामकारक असतो. म्हणूनच या म्हणी टिकतात.

म्हणींची व्याख्या 

1. म्हणीना हिंदीत ‘ मुहावरे ‘ म्हणतात,तर इंग्रजीत ‘ Proverb ‘ असे म्हणतात.

2.म्हणी म्हणजेच ही जणू आपल्या मराठी भाषेतील ”  सुभाषिते “च आहेत.

या म्हणी लोकसाहित्यातील लोकगीते,पोवाडे,लावण्या,बखरी यांप्रमाणेच महत्त्वाच्या आहेत.

मराठीतील ऐतिहासिक म्हणी 

म्हणींच्या मागे जशी संस्कृती असते तसेच काही पुराण कथा संदर्भ किंवा ऐतिहासिक संदर्भही असतात.आज काही ऐतिहासिक म्हणींचा परिचय आपण करून घेणार आहोत.आपल्या मराठी भाषेला तर थोर परंपरा लाभलेली आहे. अगदी संत पंडितांपासून ते सामान्य माणसांपर्यंत म्हणीचा मोह सगळ्यांना झालेला दिसतो. म्हणी वापरण्याचा सोस का असेल बरे? या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की आपल्या मनातील भावना ठसठशीतपणे स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला पोहोचवणे किंवा आपला मुद्दा आग्रहाने मांडणे यासारखा उद्देश असू शकतो.

मराठीतील काही ऐतिहासिक म्हणी व त्यामागील इतिहास 

चला तर मग जाणून घेऊ या,अशा काही ऐतिहासिक म्हणी ज्या पाहिल्यांनातर आपल्याला म्हणी मागे दडलेला इतिहास समजेल. आपण काही मोजक्या ऐतिहासिक मराठी म्हणी पाहणार आहोत.

1) ‘ ध ‘ चा ‘ मा ‘ होणे : 

पुण्यातील पेशव्यांचा इतिहास पूर्ण भारतात सर्वज्ञात आहे. पहिल्या बाजीरावाचे दोन मुलगे होते.एक बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि दुसरा राघोबा/ रघुनाथराव पेशवे. नानासाहेबांना तीन मुले होती (थोरले )माधवराव, विश्वासराव आणि नारायणराव. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर गादीचा वारसदार आपल्याला बनवावे असे अटकेपार झेंडे लावलेल्या रघुनाथरावाची मनोमन इच्छा होती. परंतु तसे न होता थोरले माधवराव गादीवर बसवले गेले. दुर्दैवाने कर्तबगार माधवरावाचा मृत्यू झाला. विश्वासराव पानिपतच्या लढाईत मारला गेला. पुन्हा एकदा रघुनाथरावाची गादीवर बसण्याची लालसा जागृत झाली. अल्पवयीन नारायणराव हा खऱ्या अर्थाने वारसदार होता. अशावेळी नारायणरावला बाजूला केले तरच आपल्याला गादी भेटेल असे रघुनाथरावाला वाटले. म्हणून त्यांनी त्या संदर्भात आपले षडयंत्र चालू केले. अशा वेळेस रघुनाथरावांची पत्नी आनंदीबाई हिने एका पत्रात नारायणरावाला  ‘ धरा ‘ असा हुकूम करते. परंतु रघुनाथराव लिहिलेल्या मजकुरातील अक्षरे बदलतात. त्याने ‘ ध ‘ ऐवजी ‘मा ‘असे लिहितात. त्यामुळे त्या मजकुराची अंमलबजावणी करणाऱ्या गारद्यांना असे वाटते की नारायणरावाला धरण्याच्या ऐवजी मारायचे आहे आणि ते तसे करतात. बेकसूर नारायणराव नाहक मारला जातो. त्याला पकडायला आलेल्या सरदारांपासून बचाव करण्यासाठी तो आपल्या काकांना –  रघुनाथरावांना हाक मारतो. ” काका मला वाचवा ,काका मला वाचवा. ” हे सर्व काका घडवत आहे हे त्याला माहित नसते. शेवटी रघुनाथराव आपल्या पुतण्याला मारण्यात यशस्वी होतात. पुढील इतिहास आपणास ज्ञात आहेच …..

अशा पद्धतीने मराठ्यांच्या अवनतीला सुरुवात होते. हा इतिहास या म्हणीतून आपल्याला समजतो. या सगळ्या घटनांवरून ही म्हण आकारास आलेली दिसते.

२) “होता जिवा म्हणून वाचला शिवा ” :

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आणि देशाचेही भूषण !! शिवरायांनी स्वराज्य उभे केले ते आपल्या सवंगडी – मावळ्यांच्या साथीने.असाच  एक बहादूर मावळा होता ‘ जिवाजी महाले ‘.तो छत्रपतींचा अंगरक्षक होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी मुघल सरदार  अफझलखान आणि शिवराय यांची भेट होण्याचे निश्चित झाले. मनाने आधीच कुटील असलेल्या अफजलखानाने शिवरायांना जीवे मारण्याचा बेत आखला होता.याची थोडी कल्पना शिवरायांनाही होती.जेव्हा छ्त्रपती अफझलखानच्या छावणीत प्रवेश करतात,तेव्हा अफजलखानासोबत  बाजूला सय्यद बंडा हातात तलवार घेऊन उभा असतो. मावळा जिवा शिवरायांच्या पाठीशी असतो.या भेटीतच अफझलखान शिवरायांना गळाभेटीचे ढोंग करतो आणि त्यांचा गळा आपल्या काखेत दाबायला लागतो.शिवरायांचा जीव गुदमरायला लागला.अफजलखानचा डाव महाराजांनी ओळखला,त्यांनी वाघनख्या हातात घालून खानाचे पोट फाडले.खानाचा आवाज ऐकून बाहेर थांबलेला सय्यद बंडा तेथे आला.महाराजांवर तलवारीचा वार करणार तोच मर्द मावळा जिवा याने बंडाचा वार स्वतःवर झेलला. दांडपट्टयात तरबेज असणाऱ्या जिवा महालाने बंडाशी दोन हात करून महाराजांचे प्राण वाचविले.त्यामुळे शिवरायांनी जिवा महालाने कौतुक करताना म्हटले की ” होता जिवा म्हणून वाचला शिवा.”

३) ” आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे” व  ” गड आला पण सिंह गेला”

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते – ‘ कोंढाणा ‘…आणि स्थानिक परिसर आजही कोंढणपूर याच नावाने प्रसिद्ध आहे.तर या कोंढाण्याचे ‘ सिंहगड ‘  असे नामकरण कसे झाले,याची रोमहर्षक कहाणी आहे.

तानाजी मालुसरे नामक मराठ्यांचा शूर सेनापती होता.तो शिवरायांचा बालमित्रही होता.सिंहगड हा त्या काळच्या पुण्यातील कामकाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता. तो एक अभेद्य दुर्ग होता.असा दुर्ग स्वराज्यात असण्याचे महत्त्व शिवरायांच्या दूरदृष्टीने ओळखले होते.यातच उदयभान नावाचा एक रजपूत किल्लेदार तेथे होता.तानाजी मालुसरे हे आपला मुलगा रायबा याच्या लग्नाची बातमी घेऊन महारांजाकडे आले होते.गडाची ही बातमी समजताच   हा गड कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे ठरवले.आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून ते जाण्याची तयारी करू लागतात.यावर अडविले असता तानाजी काढलेले उद्गार अंगावर रोमांच उभे करतात….” आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायाबाचे!”  काय तो दृढ निश्चय ! आणि काय ती स्वराज्यावरील निष्ठा! तानाजीच्या या भीष्म प्रतिज्ञेने अवघा दरबार हादरला.स्वराज्याचे नवीन स्फुरण प्रत्येकाला चढले. हा किल्ला तानाजी एका घोरपडीवरून मावळ्यांसह रातोरात चढून गेले असे म्हटले जाते.उदयभान आणि तानाजी यांच्यात तुंबळ युद्ध झाले.तानाजीची ढाल उदयभानाने तोडली तरी ते आपली डोक्याचे पागोटे आणि हाताची ढाल  करून लढले..या घनघोर लढाईत तानाजी  मालुसरे धारातीर्थी पडले. गड ताब्यात आला.स्वराज्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.पण छत्रपतींचे डोळे पाणावले.या पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले…” गड आला पण सिंह गेला…..” गड काबीज केला गेला,पण  लाख मोलाचा, सिंहासारखा मावळा गमावला गेल्याची चुटपुट  महाराजांना लागली.आपल्या शूर मावळ्याची  आठवण म्हणून महाराजांनी गडाचे नाव कोंढाणा बदलून ‘ सिंहगड ‘ केले आणि तानाजीला आदरांजली वाहिली.

आपण काही मोजक्या ऐतिहासिक  मराठी म्हणींच्या साह्याने या ऐतिहासिक म्हणी कोणकोणत्या प्रसंगातून कशा आकारास आल्या. याचा एक परिचय करून दिला. आपण आपला सेल स्टडी करत असताना याच पद्धतीने आपणांसमोर काही म्हणी आल्या तर त्या मागील कोणता इतिहास आहे?हे ऐतिहासिक म्हणींच्या  बाबतीमध्ये करू शकता म्हणजेच काय तर म्हनी आपल्या संस्कृतीचे दर्शन देखील घडवत असतात आपल्याला आपल्याला इतिहास सांगत असतात काही म्हणी तरी त्रिवार सांगत असतात तर काही म्हणी हे आपल्याला बोध देखील देत असतात असे म्हणींचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात.

आजचा आजचा हा भाषा समृद्धी वाढवणारा ऐतिहासिक म्हणी  व त्यामागील इतिहास. हा लेख आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment