महात्मा फुले संपूर्ण मराठी माहिती निबंध 2023 Mahatma Phule Essay In Marathi

आजच्या लेखात आपण महात्मा फुले संपूर्ण मराठी माहिती म्हणजेच  mahatma fule all information in marathi & essay  पाहणार आहोत.या लेखात महात्मा फुले यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला आहे की जो नक्कीच आपल्याला आवडेल.चला तर मग सुरुवात करूया…..त्यांच्या जीवन परिचया पासून

महात्मा फुले संपूर्ण मराठी माहिती
महात्मा फुले संपूर्ण मराठी माहिती निबंध 

 

महात्मा फुले मराठी माहिती व निबंध 

महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले होय. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी साताऱ्यामध्ये झाला. आणि त्यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुण्यात झाले.’महात्मा’ ही पदवी किंवा बिरूद मिळवणारे अखिल भारतातील ते पहिले थोर व्यक्तिमत्व होय.11 मे १८८८ रोजी मांडवी कोळीवाडा (मुंबई) येथे तळागाळातील लोकांच्या साक्षीने त्यांना महात्मा म्हणून संबोधिले गेले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फुलांविषयी ‘फुले हे हिंदुस्थानचे वॉशिंग्टन आहेत’असे गौरवोद्गार काढले.फुले यांची महानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगताना  महात्मा फुल्यांना ‘ गुरू  ‘ मानत.महात्मा फुल्यांनी स्त्री,शूद्र, कष्टकरी, शेतकरी, मजूर, कामगार, इतर मागासवर्ग अशा सर्व शोषित व पीडित लोकांसाठी समाज उद्धाराचे कार्य केले ते केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारताचे राष्ट्रीय नेते म्हणजेच पुढारी होते असे म्हटले तरी वावगे वाटू नये इतके महान महात्मा फुले होते.महात्मा फुले मराठी संपूर्ण माहितीत त्यांच्या इतर पैलूंवर देखील आपण आज प्रकाश टाकणार आहोत.

 महात्मा फुलेंची शिकवण 

महात्मा फुले यांची माहिती पाहताना नजरेस येते ती त्यांच्या अंगी असणारी मानवता मग ही मानवता त्यांच्याकडे आली कशी ?त्यामागे कोणाचे विचार आहेत तर  महात्मा फुले यांना मानवतावादाचे बाळकडू लहानपणीच मिळाले. ते स्कॉटिश मिशन शाळेत असताना ‘मानव सर्वत्र समान असतो’ हे तत्त्व ते शिकले.आणि संपूर्ण जीवनभर त्यांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तसेच ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळाले.थोडक्यात या सर्वांमुळे महात्मा फुले घडले.

महात्मा फुलेंवर कोणाचा प्रभाव होता 

थॉमस पेन आणि डेईस्ट विचार- थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राइट्स ऑफ मॅन’ {Rights of Man ‘} या ग्रंथाचा महात्मा फुले यांच्या  मनावर खोलवर प्रभाव पडला. त्यातूनच त्यांची विचारसरणी (धार्मिक) घडत गेली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, तेथील गुलामगिरी, स्त्री स्वातंत्र्य, फ्रेंच राज्यक्रांती इत्यादी तत्कालीन घटनांचा प्रभावही त्यांच्यावर होता. पण थॉमस पेनच्या डेईस्ट विचारामुळे त्यांना ख्रिस्ती धर्मातील काही अयोग्य गोष्टीही समजल्या. जसे, त्यातील पोथीनिष्ठा, कर्मकांड, चमत्कार इत्यादी अयोग्य प्रथांना ख्रिस्ती धर्मातही विरोध होत होता. त्यामुळे फुले आणि त्यांचे काही मित्र यांनी सरसकट ख्रिस्ती धर्मांतराऐवजी सर्व धर्मातील चांगली तत्त्वे एकत्र करून नवीन बुद्धीवादी, विवेकवादी विचारसरणी स्वीकारायचे ठरविले. त्यातून ‘ सार्वजनिक सत्यधर्म’,’ सत्यशोधक समाज’ यांसारख्या विचारांची- संस्थांची पायाभरणी झाली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला .चांगले त्या सर्वांचा स्वीकार या भूमिकेतून ही विचारधारा काम करत होती परंतु त्याकाळच्या तकलादू व्यवयस्थेवर टीका करत असल्याने महात्मा फुले यांना प्रचंड त्रास देखील सहन करावा लागला.

वेदांना नकार देणारे फुले  वेदांकडे परत चला’ या विचारावर फुल्यांचा विश्वास कधीच नव्हता. त्यांच्या मते, “आर्य भारतात परदेशी आहेत.” तरीही फुल्यांनी (१८७५) स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ‘ पुणे ‘ येथील मिरवणुकीस संरक्षण दिले होते. कारण सर्व  कर्मठ ब्राह्मण वर्गाकडून स्वामी दयानंद यांना विरोध होता.यातून समाजातील कर्मठता फुले याना बिलकुल मंजूर न्हवती हे लकढत घ्यायला हवे.अगदी तुम्ही कुठेही न वाचलेल्या घटना आज आम्ही महात्मा फुले मराठी माहिती यातून उघडून दाखवणार आहोत.

महात्मा फुले  यांचा  मित्र परिवार 

 सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे –  हे तीन  फुल्यांचे   खूप जवळचे मित्र होते. हे तिघेही ब्राह्मण समाजातील असले तरीही त्यांनी आयुष्यभर फुल्यांना त्यांच्या समाजकार्यात बहुमोल साथ दिली. फुले हे आयुष्यभर ‘ ब्राह्मणेतर ‘ म्हणजेच अस्पृश्य वर्गासाठी कार्य करत राहिले, परंतु त्यांचे मित्र ब्राह्मण असून देखील ते फुल्यांबरोबरच होते. यावरून फुल्यांचा ‘ ब्राह्मण’ व्यक्तीला विरोध नव्हता तर ब्राह्मण्यविरुद्ध त्यांचा लढा होता.पुढे फुल्यांनी  ‘  यशवंत ‘ नावाच्या मुलाला दत्तक घेतले होते तोही एका ब्राह्मण विधवेचा मुलगा होता. म्हणूनच महात्मा ही उपाधी देखील फुले यांना कमीच आहे.महात्मा फुले यांचा माणसाला विरोध कधीच न्हवता,तर माणसातील वाईट विचारांना त्यांचा विरोध होता हे नक्की आज mahatma fule marathi information च्या माध्यमातून मला देखील फुले नव्याने समजत आहेत.मोठी माणसे मोठी का होतात यासाठी महात्मा फुले यांचे धनंजय किर यांनी लिहिलेले फुले यांचे आत्मचरित्र हे पुस्तक जरूर वाचा ,अजून कितीतरी गोष्टी फुलेंबाबत आहेत एका लेखात मांडणे अशक्य आहे.

महात्मा फुले यांचे वस्ताद / गुरू 

लहानपणी जोतीराव लहुजी साळवे या गुरूकडून मल्लविद्या, दांडपट्टा यांसारखे शारीरिक कसरतीचे खेळ,व्यायाम शिकले, याचा त्यांना पुढील आयुष्यात फायदा झाला. लहुजी साळवे हेदेखील फुल्यांच्या कार्यात सदैव वडिलांप्रमाणे बरोबरच होते.

महात्मा फुले यांचे लेखन पुस्तके 

महात्मा फुले केवळ समाज सुधारक न्हवते तर भाषेची जाण असलेले एक व्यासंगी,सामाजिक भान असलेले लेखक देखील होते.त्यांनी अनेक पुस्तके म्हणजेच ग्रंथ लिहिले. महात्मा फुले यांच्या काही ठराविक पुस्तकांची नावे आपणास देत आहोत वेळ मिळाल्यास  नक्की वाचा.

१) छत्रपती शिवाजी राजे भोसले पोवाडा (१८६९)

२) ‘ शेतकऱ्याचा आसूड’ (१८८३)

३)’ तृतीय रत्न ‘( नाटक) (१८५५)

४)’ सार्वजनिक सत्यधर्म – [ सत्यमेव जयते ,- बीजसूत्र] ‘(शेवटचा ग्रंथ) (१८९१)

५)’ गुलामगिरी ‘( १८७३)

६) ‘ ब्राह्मणांचे कसब’ (१८६५)

.७) अस्पृश्यांची कैफियत’ (अप्रकाशित)

वरील पुस्तकातून शेतकरी ,कष्टकरी लोकांचे दुःख ते मांडत आहेत.त्याचबरोबर इथल्या समाज व्यवस्थेवर आसूड ते शेतकऱ्यांचा आसूड मधून ओढत आहेत.

फुले यांचे संस्थात्मक कार्य / स्थापन केलेल्या संस्था 

 महात्मा फुले यांनी अनेकसंस्था स्थापन केल्या  व या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्ञानी बनवण्याचे काम केले.चला तर मग आज महात्मा फुले संपूर्ण माहीती पाहताना त्यांची संस्थात्मक कामगिरी पाहूया.

1.सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले 

महात्मा फुले यांनी ४ सप्टेंबर,१८७३  मध्ये  ‘ सत्यशोधक समाजा ‘ ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून जन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी या समाजाची स्थापना केली. तळागाळातील शूद्र,अतिशूद्र, अस्पृश्य यांसारख्या शोषितांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव त्यांनी करून दिली.जातीभेद, चातुर्वर्ण्य व्यवस्था, कर्मकांड, चालीरीती यांना कडाडून विरोध दर्शविला.  फुले वेद,ग्रंथप्रामाण्य यांना मानत नव्हते. ” वेद हे अपौरुषेय आहेत,” म्हणजेच वेद हे कोणत्याही व्यक्तीने लिहिलेले नसून ते ईश्वरनिर्मित आहेत,असे मानले जाई.परंतु हेच सत्यशोधक समाज हे  मान्य करत नाही.हीच सत्यशोधक समाजाची  भूमिका होती. सदसद्विवेबुद्धीला जे पटेल- दिसेल, तेच स्वीकारायचे अन्यथा नाही; हे तत्त्व या समाजाने जिवापाड जपले.¶डॉ. विश्राम रामजी घोले, हरी रावजी चिपळूणकर, नारायण मेघाजी लोखंडे, नारायण कडलक हे सत्यशोधक समाजाचे सुरुवातीचे सक्रिय कार्यकर्ते होते. या संस्थेचे कार्य फुल्यांच्या नंतरही समाजात टिकून राहिले. याचा प्रभाव शाहू महाराज, भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर यांच्यावरही दिसून येतो.

सत्यशोधक समाजाचा फुले यांच्यावरील प्रभाव  

सत्यशोधक समाजाच्या मुशीतूनच पुढे ‘ दलित ‘ चळवळ उभी राहिली. डॉ. आंबेडकरांनी यातून प्रेरणा घेऊन इतिहास घडवला. ‘ ब्राह्मणेतर ‘ या नंतरच्या काळातील  चळवळ (शाहू महाराज, जेधे – जवळकर)ही सुद्धा सत्यशोधक समाजातून निर्माण झालेली दिसते.

सत्यशोधक समाजाची वृत्तपत्रातून समाज जागृती

वृत्तपत्र/ नियत – अनियतकालिक यांच्या माध्यमातून  (सत्यशोधकीय नियतकालिके म्हणून ही वृत्तपत्रे प्रसिद्ध आहेत.)त्यामध्ये 

१) दीनबंधू  

 दिंबंधु नियत कालिकाचे कृष्णराव भालेकर (संपादक) सत्यशोधक चळवळीचे हे मुखपत्र होते.

२) दिनमित्र-(१८८८) 

 गणपतराव पाटील-मुकुंदराव पाटील. राघव भूषण, जागृती, हंटर, ब्राह्मणेतर यांसारखी नियतकालिके महाराष्ट्रात चालू झाली, सत्यशोधक समाजाची तत्त्वे/ विचार यातून प्रकट होतात.

3. ‘ सत्सार ‘(१८८५) 

म्हणजेच (Essence of Truth) सारखे महत्त्वपूर्ण नियतकालिक फुल्यांनी चालविले. पं.रमाबाई,ताराबाई शिंदे यांसारख्या स्त्रियांचे विचार सनातन विचाराच्या लोकांना पटत नसत,त्यांचा समाचार,किंवा त्यांच्या टीकेला उत्तर फुले या सत्सार मधून देत.

महात्मा फुले स्त्री सुधारणा  विषयक कार्य 

 -समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे  ‘स्त्री ‘ . प्राचीन काळापासून तिचे शोषणच होत आलेले आहे. याविरुद्ध फुले आणि सावित्रीबाई यांनी बंड केले. फुल्यांनी केवळ दलित किंवा शूद्र यांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या केल्या नाहीत तर स्त्रियांच्या मुक्तीचे नवे मार्ग दाखवून दिले. महात्मा फुलेंनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांस बरोबरीचे स्थान दिले, त्यांना शिकविले. हे दांपत्य एकत्रपणे समाजकार्यासाठी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी स्त्रियांना वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीतून खऱ्या अर्थाने मुक्त केले. स्त्री शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाहाला उघड उघड पाठिंबा दिला. बालविवाहाचा तीव्र निषेध केला. केशवपन बंद करण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला. ताराबाई शिंदे (स्त्री – पुरुष तुलना –  १८८४), मुक्ता साळवे  यांसारख्या स्त्रिया यातूनच घडत गेल्या.

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य 

 महात्मा फुल्यांनी स्वतः आपली पत्नी सावित्रीबाई यांस शिक्षित केले. पुढे मिस फरार या अमेरिकन मिशनच्या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन त्यांनी १८४८ बुधवार पेठेतील भिडे वाडा (पुणे) येथे कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी शाळा चालू केली. मुली किंवा स्त्रियांसाठी चालू केलेली ही भारतातील पहिली महिला शाळा होती आणि सावित्रीबाई या पहिल्या महिला शिक्षिका! १८५० रोजी त्यांनी दलितांसाठी शाळा काढली. या शाळांमध्ये वाचन, गणित, व्याकरणाची मूलतत्त्वे शिकविली जात. सदाशिव गोविंद हाटे, सखाराम परांजपे, गोवंडे या त्यांच्या मित्रांनी शाळेसाठी आर्थिक सहाय्यही केले होते.अशा प्रकारे शोषित,स्त्री,दलित सर्व प्रकारच्या थरातील लोकांसाठी त्यांनी शिक्षणाचा मार्ग खुला केला,कारण शिक्षण हेच त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा एकमेव साधन असल्याची जाणीव त्यांना झाली होती.

महात्मा फुले यांनी शिक्षणाची गंगा सर्वांच्या घरोघरी जावी यासाठी अथक प्रयत्न केले.पुण्यातील भिडे वाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली.तसेच दलित वर्गागील मुलांसाठी देखील त्यांनी शाळा काढल्या.त्याकाळात प्रचंड विरोध पत्करून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम स्वतः शिक्षित करून मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.आज सर्व क्षेत्रात महिला दिसत आहेत याचे सगळे श्रेय महात्मा फुले यांच्या उच्च कोटीतील विचारांमुळे हे विसरून चालणार नाही.

आमची आजची महात्मा फुले संपूर्ण मराठी माहिती आपणास कशी वाटली ही नक्की कळवा .आवल्याकडे अतिरिक्त माहिती असल्यास कमेंट करा ती आपण आपल्या लेखात add करूया व महात्मा फुले यांच्या कार्याला त्रिवार वंदन करूया.मराठी सेल्फ स्टडी डॉट कॉम च्या माध्यमातून आम्ही आपणास कशा पद्धतीने एखादी गोष्ट शिकायची याविषयी सांगत आहोत.अगदी याच पद्धतींने आपण इतर विचारवंत ,खेळाडू यांच्या विषयी ज्या पद्धतीने आम्ही mahatma fule marathi information तयार केली तशी तुंम्ही देखील करू शकता.

आमची ही महात्मा फुले संपूर्ण मराठी माहिती नक्कीच इतरांना देखील पाठवाल या विश्वासासह आज इथेच थांबुया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !

 

FAQ | काही प्रश्न

 1.महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली?

 सत्यशोधक समाज

2.महात्मा फुले यांच्या नावाने कोणती योजना आहे?

महात्मा फुले जन आरोग्य  योजना 

3.महात्मा फुले यांनी कोणते ग्रंथ लिहिले?

महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड,गुलामगिरी ग्रंथ लिहिले.

महात्मा फुले यांच्या मूळ गावाचे नाव सांगा?

सातारा जिल्ह्यातील कटगून

5.ज्योतिबा फुले  यांना महात्मा  पदवी कोणी दिली?

मुंबईच्या जनतेने 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment