महापुर एक गंभीर समस्या निबंध मराठी 2023 । Mahapoor nibandh

Mahapoor nibandh आपल्या दैनंदिन जीवनात आपणास कुठे ना कुठे एखादी दुर्घटना घडली असे वर्तमानपत्रात वाचायला किंवा टीव्ही वरील न्युज चॅनलवर ऐकायला मिळत असते.

कधी कधी आपणास ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला देखील मिळत असतात.

भुकंप,अवकाळी पाऊस,सुनामी,अवर्षण ह्या काही अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत ज्यात महापुर ही एक अशी नैसर्गिक आपत्ती आहे जी आपणास पावसाळ्यात अनुभवायला मिळते.

Mahapoor nibandh

Mahapoor nibandh

पावसाळ्यात अनेक दिवस सतत मुसळधार पाऊस चालल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण होते अणि नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन नदी पात्र गच्च भरल्याने नद्या नाले दुथडी भरून वाहायला लागतात.

Table of Contents

अशा परिस्थितीत नदीकाठी जेवढयाही मानवी वस्त्या गावे, तसेच घरे आहेत अशा ठिकाणी हे पाणी शिरते.पाऊस थांबला नाही तर हे पावसाचे पाणी ह्या नदीकाठच्या गावखेडयात घुसुन अनेक गावे पाण्याखाली जातात.ज्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तींना खुप मोठी आर्थिक अणि जिवित हानी होते.

ह्या महापुरात अनेक लोकांची मातीची घरे कोसळतात कमकुवत झोपड्या पाण्यात वाहुन जातात.यात कित्येक लोकांचा संसार भांडे कुंडी कपडे लत्ते देखील वाहुन जातात.

लोकांना जीव वाचवण्यासाठी आपली घरे संसार सोडुन पळावे लागते.हया महापुरात अनेक लोकांची घराची छते, भिंती दरवाजे तसेच पुर्ण घर देखील वाहुन जाते.

महापुरात आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेल्या लोकांना कित्येक दिवस महापुरा पासुन बचावासाठी अन्न पाण्याविना सुरक्षित स्थळी लपुन राहावे लागते.

कधी कधी ह्या महापुरात अनेक पुरूष स्त्रिया वृदध व्यक्ती,लहान मुले,गाय बैल म्हशी बकरी इत्यादी मुक जनावरे देखील वाहुन जातात अणि मृत्यूमुखी पडत असतात.

विकास कार्यामुळे शहरातील रस्त्यांचे क्राॅकिटीकरण करण्यात येत असते.त्यामुळे पावसाळ्यात शहरी भागात पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने पूरस्थिती निर्माण होत असते.

शहरातील रस्ते पाण्याखाली जातात रस्त्याच्या काठी असलेले वृक्ष कोसळतात ज्यामुळे वाहतुकीची देखील कोंडी होऊन सर्व शहरातील जनजीवन विस्कळित होते.

रस्ते जलमय झाल्याने महामार्गावर असलेली वाहतुक कित्येक तास ठप्प होत असते.त्यामुळे वाहन चालकांना कित्येक तास एकाच ठिकाणी अडकुन राहावे लागते.लोकांना रहदारी जा ये करता येत नाही.

पावसाच्या पाण्यात अनेकांची दुचाकी आणि चारचाकी वाहने पावसाच्या पाण्यात बुडुन वाहुन जातात.

अनेक चारचाकी वाहने पुरामुळे पाण्यात अडकुन पडतात.

पावसामुळे आलेल्या महापुरात शहरी भागातील व्यापारी दुकानदार यांची देखील फार धावपळ होत असते.पुरामुळे दुकानातील सामग्रीचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी व्यापारी लोकांना सामानाची आवराआवर करावी लागते.

अशा पुरग्रस्त परिस्थिती मध्ये आपल्या दुकानातील महागड्या वस्तुंचे नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी दुकानदार यांना आपल्या वस्तु दुकानातुन उचलून त्वरीत एखाद्या सुरक्षित स्थळी हलवाव्या लागतात.

महापुराच्या परिस्थिती मध्ये गावा खेड्यातील विजेचे खांब तसेच वृक्ष कोलमडून पडत असतात.ज्यामुळे अनेक दिवस खेड्यातील लोक अंधारात काढत असतात.

महापुरामुळे शेतकरी बांधवांचे पिकांचे अन्नधान्याचे अणि जनावरांचे नुकसान होते.महापुरात शेतात घुसलेल्या पाण्यामुळे पिकांची नासाडी होते.अनेक शेतीस उपयोगी जनावरे गाय बैल इत्यादी जनावरे पावसाच्या पाण्यात वाहुन जातात.

अशा पुरग्रस्त लोकांना अनेक जण माणुसकी म्हणून मदतीचा हात देत असतात.अशा पुरग्रस्त लोकांना अन्नधान्य,कपडे तसेच इतर आवश्यक वस्तु पुरवत असतात.

सरकार देखील अशा पुरग्रस्त लोकांना आर्थिक साहाय्य प्रदान करत असते.अनेक स्वयंसेवी संस्था देखील पुरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत असतात.

मग हळूहळू पावसाचे पाणी कमी होऊन गावांमध्ये साचलेले पाणी कमी होऊ लागत असते.पण कचरा माती पाण्याचा गाळ घरात अणि घराच्या बाहेर सर्वत्र पसरलेला असल्याने अणि घरातील सर्व सामान रस्त्यावर पडलेले असते.

सर्व वस्तुंची संसारोपयोगी वस्तुंची इतकी नासाडी झालेली असते की ह्या सर्वांची स्वच्छता करणे देखील शक्य होत नाही.

पुरजन्य परिस्थिती असलेल्या क्षेत्रात घाणीचे साम्राज्य वाढु लागते.हया घाणीच्या दूर्गधी मुळे अनेक लोकांना त्रास होतो.
डेंग्यू,मलेरिया इत्यादी सारखे साथीचे रोग पसरायला सुरुवात होते.

साथीच्या ह्या आजारांवर नियंत्रण प्राप्त करणे खुप अवघड असते.

अशा भागात वेळ असताच आपणास साफसफाई स्वच्छता करणे गरजेचे असते.पुरा मध्ये ज्या लोकांची घरे वाहुन जातात त्यांना शासनाकडून थोडीफार आर्थिक मदत दिली जाते पण त्यांना पुन्हा नव्याने आपले घर बांधावी लागते.

ह्या बांधकामासाठी आपणास खर्च करावा लागतो पुरात वाहून गेलेल्या वस्तु संसारोपयोगी वस्तु पुन्हा विकत घ्याव्या लागतात.

पण पुरात पाण्यात वाहुन गेल्याने एखाद्या कुटुंबातील कर्ता कमविता व्यक्तीचा जीव गेला तर तो आपण पुन्हा आणु शकत नाही.अशा पुरात मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना शासन आर्थिक साहाय्य प्रदान करते पण ती मदत पुरेशी नसते.

म्हणुन पुर महापुरात आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला आपणास गमवावे लागु नये यासाठी आपण आधीपासून काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

नदीपात्रात साचलेला गाळ आपण साफ करायला हवा.नदीजोड प्रकल्पाचा अवलंब करायला हवा.शहर तसेच गावाचा विकास करत असताना योग्य नियोजन करायला हवे.

हवामान खात्याने पुराची पुर्वसुचना दिल्यानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपल्या अमुल्य वस्तू सामग्रीला आपण सुरक्षित स्थळी हलवायला हवे.

राज्यातील जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी क्षेत्रात हवामान खात्याकडून पुराच्या संकटाच्या संभावनेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट जारी केले जातात.

हे अलर्ट कोणत्या ठिकाणी पावसाची किती शक्यता आहे हे दर्शवण्यासाठी वापरले जातात.

उदा,रेड अलर्ट,आॅरेज अलर्ट,येलो अलर्ट, ग्रीन

हवामान खराब होण्याची शक्यता असल्यास हवामान खात्याकडून लोकांना सतर्क राहण्यासाठी येलो अलर्ट हा जारी केला जातो.

हवामान खुपच खराब झाल्यावर नागरीकांना अधिक सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आॅरेज अलर्ट जारी करण्यात येत असतो.

भयंकर वादळ वारयासह पाऊस पडुन पुर येण्याची दाट शक्यता असलेल्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात येतो.ग्रीन अलर्ट म्हणजे कुठलाही धोका नाही.

पुराचा धोका संभवत असलेल्या नद्यांवर शासनाने मोठी अणि मजबुत धरणे बांधायला हवे.जेणेकरून नदीकाठी राहत असलेल्या गाव खेड्यातील लोक ह्या पुराचे शिकार होणार नाहीत.

नदीकाठी राहत असलेल्या गावा खेड्यातील लोकांनी कच्ची मातीची घरे न बांधता पक्की घरे बांधायला हवी याने महापुरात त्यांची घरे कोसळणार नाहीत.अशा लोकांना पक्की घरे बांधायला शासनाने आर्थिक मदत करायला हवी.

पुर आल्यावर लोकांनी उंच ठिकाणी थांबायला हवे.

ज्या भागात गावात पुर येण्याची शक्यता आहे अशा लोकांनी पुर येण्याच्या अगोदर आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू जीवनावश्यक वस्तू जवळ घेऊन ठेवायला हव्यात.

पुरापासुन बचावासाठी सरकारने वेळोवेळी आवश्यक ती पाऊले उचलून उपाययोजना करायला हव्यात.पुररेषेची आखनी करून याबाबत जनजागृती करायला हवी.

नदी नाल्यातील पात्र साफ करायला हवे त्यातील साचलेला गाळ काढायला हवा लगतची सर्व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात यावी.

पुरात घरातील मौल्यवान वस्तू वाहुन जाऊ नये म्हणून त्या उंचावर ठेवायला हव्यात.

पुर हे एक असे नैसर्गिक संकट आहे ज्याला प्रत्यक्ष अनुभवलेल्या व्यक्तीलाच याच्या तीव्रता अणि भीषणतेचा अंदाज असतो.

पुर ही अतिवृष्टी मुळे उदभवणारी परिस्थिती आहे ज्यात अतिवृष्टीमुळे नदी नाल्यातील पाण्याची पातळी वाढत असते आणि नदीच्या आसपासचा परिसर जलमय होऊन पुर स्थिती निर्माण होत असते.

पावसाळ्यात नदीला अचानक पूर आल्याने कित्येक शेतकरयांनी अनेक वर्षीची मेहनत करून पिकवलेले धान्य पिक सर्व काही एका क्षणात नासधुस उद्ध्वस्त होऊन जाते.

नदीकाठी असलेल्या खेड्यात गावात तर याचा अत्यंत भयंकर उद्रेक आपणास पाहायला मिळतो.हया भयंकर महापुरात कित्येक लोकांची घरे संसारोपयोगी वस्तु वाहून जातात.

काही जणांना तर आपल्या कुटुंबातील तसेच जवळच्या व्यक्तीला देखील गमवावे लागते.महापुरात घरे वाहून गेलेल्या लोकांना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सरकारी छावनी मध्ये निवारयासाठी थांबावे लागते.

अनेक पुरग्रस्त लोकांना हेलिकॉप्टर तसेच जहाजाच्या मदतीने जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य कपडे औषध इत्यादी पोहोचवले जाते.

आमचे इतर लेख

मी लोकशाही बोलतेय 

माझा आवडता ऋतू पावसाळा

कारगिल विजय दिवस मराठी निबंध

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment