माझी आई निबंध 2023|maazi aai essay in marathi

माझी आई निबंध

maazi aai essay in marathi माझ्या आईचे नाव प्रतिभा आहे.माझे माझ्या आईवर खुप प्रेम आहे.माझी आई एक घरगृहिणी आहे.माझ्या आईचा स्वभाव खुप प्रेमळ आणि मायाळु आहे.

माझी आई रोज सकाळी आमच्या सर्वांच्या आधी झोपेतुन उठते अंगण झाडते.देवपुजा करते अणि मग सर्व झाडझुड साफसफाई करून झाल्यावर घरातील सर्व व्यक्तींसाठी चहा नाश्ता देखील करते.

मग शाळेत जाण्यासाठी आम्हाला तयार करते अणि आमचा तिघांचा डबा तयार करते, शाळेच्या दप्तरात डबा ठेवून पायी शाळेत सोडायला येते.

माझी आई खुप सामंजस अणि मनमिळावू स्वभावाची आहे.माझी आई आम्हा सर्वांची खुप काळजी घेते.

माझी आई आमच्यासाठी रोज आमच्या आवडीचा छान छान स्वयंपाक बनवते आणि आम्हा तिघे भावांना शाळेत सोडायला देखील येते.माझी आई रोज आमचा अभ्यास देखील घेते.रोज स्वता बसुन माझा शाळेतील गृहपाठ करून घेते.

maazi aai essay in marathi

कधी मी आजारी पडलो तर माझा गोळ्या औषधांच्या खर्च करते रात्रभर जागी राहुन माझ्या उशाशी बसून राहते अणि माझी काळजी घेते.

maazi aai essay in marathi

मी जर जेवलो नाही तर ती देखील उपाशी झोपुन जाते मी जेवल्यानंतरच माझी आई रोज जेवण करते.वडिलांनी रागावल्यावर मायेने जवळ घेत मला आधार देते.

माझी आई माझी एक चांगली मैत्रीण तसेच गुरू देखील आहे.ती माझ्यावर अणि माझ्या इतर भावंडांवर देखील चांगले संस्कार करते.मला अणि त्यांना रोज चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते.

माझी आई एकवेळ स्वताच्या आवडीनिवडीचा विचार करत नाही पण घरातील सर्व व्यक्तींच्या आवडी निवडीची विशेष काळजी घेते.आम्हा सगळया़ंना खुप जीव लावते.

माझी आई कितीही आजारी पडली तरी देखील अंथरूणाला झोपुन न राहता आजारपणात सुदधा घरातील सर्व काम आवरते.घरातील आपली सर्व कर्तव्य जबाबदारी पार पाडत असते.

आम्ही आई खुप स्वचछ्ताप्रिय आहे तिला घरात पसारा घातलेले कचरा केलेले अजिबात आवडत नाही.म्हणुन ती आमचे घर नेहमी स्वच्छ अणि टापटीप ठेवते.

आज आमच्या आईमुळेच आम्हा तिघे भावंडांना स्वच्छतेचे नीटनेटके पणाचे महत्त्व समजले.

असे म्हणतात की परमेश्वर एकाच वेळी सगळ्या ठिकाणी आपणा सर्वांची काळजी घेण्यासाठी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आपणा सर्वांची काळजी घेण्यासाठी घराघरात आईची निर्मिती केली.म्हणुनच आईला परमेश्वराचे दुसरे रुप मानले जाते.

माझ्या आईने मला अणि माझ्या भावांना नेहमी खरे बोलावे, आपल्यापेक्षा मोठयांचा आदर सन्मान करावा त्यांना उलटुन बोलु नये,नेहमी इतरांची मदत करायला हवी हया तीन चांगल्या सवयी लावल्या आहेत.

माझी आई रोज मला अणि माझ्या दोघे भावंडांना रामायण महाभारत भगवद्गीता वाचुन दाखवते त्याविषयी सांगते.त्यातुन आपणास मिळत असणारा बोध आम्हाला स्पष्टपणे समजावून सांगते.

काय चांगले काय वाईट आहे हे समजावुन सांगते.आपण इतरांशी कसे वागायला हवे कसे बोलायला हवे कशा पद्धतीने जीवन जगायला हवे याविषयी आम्हाला नेहमी समजावून सांगत असते.

आम्ही कधी चुकून वागलो तर आम्हाला रागावते देखील पण तिच्या त्या रागावण्यात देखील तिच्या मनात आमच्या विषयी असलेले प्रेम अणि काळजी असते.

मी माझ्या मनातील सर्व गोष्टी माझ्या आईला सांगत असतो.मी स्वताला खुप नशिबवान समजतो की मला एवढी प्रेमळ आणि मायाळु आई मिळाली आहे.

माझी आई नेहमी गरजवंत अणि गरीब लोकांची मदत करते.मला खुप अभिमान आहे की मला एवढी प्रेमळ आणि मायाळु आई मिळाली आहे.

माझी आई माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.माझी प्रेरणा आहे तिच्यामुळेच आज आमचे घर उभे आहे.

माझ्या आई विषयी बोलावे तितके कमी आहे.आज माझ्यासाठी सगळ्यात जास्त ह्या जगात कोणी काही केले आहे तर ती माझी आई आहे.

कुटुंबाच्या सुखात आपले सुख मानणारी,आम्हाला नेहमी समजुन घेणारी,आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणारी, एकट्याने घरातील आम्हा सर्वांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडणारी व्यक्ती म्हणजे माझी आई.

रोज सुर्य उगवण्यापासुन सुर्यास्त होईपर्यंत माझी आई घरातील काम आवरण्यात सतत व्यस्त असते.माझी आई रोज सकाळी उठून अंघोळ करून सगळ्यात पहिले अंगण झाडते.मग देवपुजा करून झाली की आमच्या सर्वांसाठी चहा नाश्ता बनवते.

रोज सकाळी लवकर उठून वडिलांना आॅफिस मध्ये जाण्यासाठी त्यांचा टिफिन तयार करते.आम्हा सर्वांची शाळेत जाण्यासाठी दप्तर भरणे आमचे वहया पुस्तक जेवणाचा डबा दप्तरात ठेवणे आम्हाला शाळेचे कपडे घालून रेडी करून शाळेत सोडायला येते.

आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत आपल्या आईचा खुप मोलाचा वाटा असतो.आईच आहे जी आपणास लहानपणी हात धरून चालायला शिकवते आपणास लहानाचे मोठे करते.आपल्यावर चांगले संस्कार करते.

आपले संगोपन करून आपल्या स्वताच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपल्याला सक्षम बनवते.आपल्या आईने आपल्यावर केलेले चांगले संस्कार अणि दिलेली चांगली शिकवण हेच आपल्याला भविष्यात आपले जीवन घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

माणुस कितीही मोठा झाला तरी आपल्या आईसाठी तिचे लहानगे बाळच असतो.मुले आईशी कशीही वागली तरी आई त्यांची काळजी करणे कधीच सोडत नसते.कधीही आपल्याला तिच्यापासून दूर करत नाही.

आईसारखे दैवत ह्या संपुर्ण दुनिया मध्ये नाही म्हणतात ते एकदम खरेच आहे.

आई म्हणजे वासराची गाय,लंगडयाचा पाय अणि दुधावरची साय.

आजच्या ह्या धावपळीच्या जीवनात सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण सतत मोबाईल मध्ये गुंतलेलो असतो ज्यामुळे आपण आपल्या आईशी संवाद साधू शकत नाही.

आज आपण आपल्या रोजच्या कामामध्ये करीअर मध्ये इतके गुंतलेलो आहे की आपल्याला आपल्या आईसोबत बोलायला वेळ नसतो.

फक्त मदर्स डे ला आईसोबत फोटो अपलोड करून आईविषयी प्रेम व्यक्त होत नसते आईसाठी फक्त एक दिवस नाहीये आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा आईसाठी असायला हवा.

कारण आपल्याला आज हे जग पाहायला मिळते आहे ते आपल्या आईमुळेच.तिनेच आपल्याला हे जग दाखवले आहे.

आपण प्रत्येकाने आपल्या कामातून वेळ काढून आपल्या आईशी दोन शब्द प्रेमाचे आपुलकीचे बोलायला हवे तिच्या आवडी निवडीचा विचार करायला हवा.तिने बनवलेल्या स्वयंपाकाचे पदार्थांचे कौतुक करायला हवे

हेच आपल्या आईसाठी आपल्या कडुन मिळालेले खुप मोठे गिफ्ट आहे.

आपण म्हणतो की आई कुठे काय करते ती तर घरातच असते ती नोकरी करून पैसा कमवत नाही

पण एक आई आपल्या जीवनात जे काही करते जी जबाबदारी कर्तव्ये पार पाडते ती मोठमोठ्या कंपनीचे सीईओ देखील पार पाडु शकत नाही.खरच आई हे एक खुप मोठे व्यासपीठ आहे.ज्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.

म्हणुन स्वामी विवेकानंद म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे एकदमच खरे आहे.

आई म्हणजे आपल्याला जीवनात मार्ग दाखवणारा आपला पहिला गुरू.

आई म्हणजे मागितले ते देणारा एक कल्पतरू.

आई म्हणजे मांगल्याचे सार

आई म्हणजे अमृताची धार

आई हा एक दोन अक्षराचा छोटासा शब्द असला तरी संपुर्ण विश्वाची ताकद ह्या दोन शब्दात सामावलेली आहे.

आमचे इतर लेख

आत्मकथन मी एक पूरग्रस्त बोलत आहे

मी मुख्यमंत्री झालो तर 

मी लोकशाही बोलतेय 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment