कारगिल विजय दिवस निबंध 2023 |kargil vijay divas history in marathi

कारगिल विजय दिवस निबंध विद्यार्थी मित्रानो 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान जे युद्ध झाले होते ते युध्द २६ जुलै रोजी 1999 मध्ये भारताने जिंकले होते .

२६ जुलै हा आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्य पराक्रम आणि बलिदानाचा दिवस आहे.हया दिवशी आपल्या शौर्य पराक्रमासाठी भारतीय सैन्याचा आदर सन्मान केला जातो .

कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व जवानांना अभिवादन केले जाते.त्यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असते.

कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या शौर्य पराक्रमाची आठवण करून देणारा विशेष दिवस आहे.तसेच आपल्या देशासाठी शहीद झालेल्या जवानां विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आपल्या देशातील शुर पराक्रमी सेनिकांचा गौरव करण्याचा हा दिवस असतो.

हाच तो दिवस जेव्हा भारताने आपल्या विजयाचा ध्वज1999 मध्ये कारगिल येथे फडकावला होता.म्हणुन ह्या दिवसाला कारगिल विजय दिवस असे म्हटले जाते.

कारगिल विजय दिवस निबंध2023

राष्ट्रीय महामार्ग अणि श्रीनगर ह्या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे.कारगिलचे युदध ह्याच रस्त्यामुळे घडुन आले होते.

इसवी सन १९९९ मध्ये पाकिस्तान च्या सैन्याने भारताच्या रिकाम्या चौक्यांवर ताबा प्राप्त केला होता.मग भारतीय सैन्याने ह्या पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावण्यासाठी एक आॅपरेशन राबविले.

ह्या मोहीमेचे तसेच आॅपरेशनचे नाव आॅपरेशन विजय असे ठेवण्यात आले होते.भारतीय वायुसेना कडुन देखील आॅपरेशन सफेद सागरचा आरंभ करण्यात आला.

भारतीय वायुसेनेने आपल्या आॅपरेशन सफेद सागरदवारे पायदळ सैन्याची ने आण करण्याची एक महत्वाची जबाबदारी पार पाडली.

भारतीय नौदलाने देखील पाकिस्तानी बंदरांना लक्ष्य करीत त्यात येत असलेल्या जहाजांची कोंडी केली.

भारताने १९९९ सालच्या जुलै महिन्यातील दुसरया आठवड्या मध्ये अनेक महत्वाच्या लढाया केल्या अणि पाकिस्तानी सैन्याने ताबा प्राप्त केलेल्या अनेक चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या.

कारगिल विजय दिवस निबंध

ह्या युदधा दरम्यान ५२७ सैनिक हे लढता लढता देशासाठी शहीद झाले अणि काही सैनिक गंभीर जखमी देखील झाले.तब्बल साठ दिवस हे युदध चालले होते.सुमारे दोन लाख भारतीय सैनिक ह्या युद्धात सहभागी झाले होते.

कारगिल विजय दिवस हा भारत देशासाठी कारगिल युद्धात लढता लढता शहीद झालेल्या शुर पराक्रमी शौर्यवान भारतीय सैनिकांच्या आठवणीत दरवर्षी २६ जूलै रोजी साजरा केला जातो.

१९९९ मध्ये भारत अणि पाकिस्तान मध्ये झालेल्या ह्या युद्धात आपल्या भारताने विजय प्राप्त करत विजयाचा ध्वज फडकावला होता.अणि ह्याच दिवशी पाकिस्तानी घुसखोरांनी ताब्यात घेतलेल्या चौक्या देखील आपल्या भारताने पुन्हा प्राप्त करण्यात यश प्राप्त केले.

तब्बल साठ दिवस चाललेले हे भीषण युदध २६ जुलै रोजी संपले ज्यात भारताने विजय प्राप्त केला.भारताचे हे आॅपरेशन विजय यशस्वीपणे पार पडले.

म्हणुन‌ २६ जुलै हा दिवस भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा शौर्याचा विशेष दिवस म्हणजे कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

kargil vijay divas history in marathi

कारगिल युदध हे ३ मे १९९९ रोजी सुरू झाले होते अणि हे युदध २६ जुलै १९९९ रोजी संपुष्टात आले होते.हे आपल्या भारत देशातील सैन्याने केलेले पहिले युदध होते जे दोन महिन्यांपर्यंत चालले होते.

ह्या युदधाची सुरूवात ३ मे १९९९ मध्ये झाली होती जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी करत भारतीय चौक्यांवर ताबा घेतला होता.

कारगिल हे इतक्या उंचीवर आहे जिथे श्वास घ्यायला देखील त्रास होतो अणि तिथे थंडी इतकी असते तेथील तापमान मायनस ४८ डिग्री सेल्सिअस इतके असते.अशा परिस्थितीत देखील भारतीय शुर पराक्रमी सैनिकांनी ६० दिवस हे युदध लढले.

भारतीय सैन्याच्या हयाच शौर्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो आपल्या पराक्रमी शौर्यवान सैनिक यांची आठवण काढली जाते

कारगिर विजय दिवस ह्या दिवशी आपल्या देशातील सर्व शहीद झालेल्या जवानांचे स्मरण केले जाते.पंतप्रधानांच्या हस्ते ह्या सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात असते.

ह्या दिवशी भारत देशाचे पंतप्रधान इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती स्थळास भेट देत देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतात.

ह्या दिवशी भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा करण्यासाठी संपुर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारचे विजय महोत्सव कार्यक्रम आयोजित केले जातात.

भारतीय सैन्याचे देशाविषयी असलेले प्रेम, देशासाठी काहीही करण्याची तयारी असणारे शारीरिक अणि मानसिक सामर्थ्य, अणि शौर्य हे अत्यंत उल्लेखनीय आहे.

भारतातील सर्व नागरीकांनी देखील देशासाठी शहीद झालेल्या ह्या शुर पराक्रमी भारतीय सैन्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून देशासाठी देशाच्या हितासाठी कार्य करण्याची भावना मनात ठेवायला हवी.

आपल्या देशाच्या सैनिकांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानाचे त्यांच्या त्यागाबदददल जाणीव ठेवत आपण सर्व देशवासीयांनी त्यांच्या विषयी मनात कृतज्ञतेची भावना बाळगणे आवश्यक आहे.

आमचे इतर निबंध

आत्मकथन मी एक पूरग्रस्त बोलत आहे

मी मुख्यमंत्री झालो तर 

मी लोकशाही बोलतेय 

माझा आवडता ऋतू पावसाळा

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment