गुरूचे महत्त्व निबंध मराठी | 2023 Importance of Guru Essay Marathi

गुरूचे महत्त्व निबंध मराठी 2023 | Importance of Guru Essay Marathi

व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी गुरुचे महत्व निबंध मराठी घेऊन आलो आहोत. या निबंधामुळे आपल्याला गुरूचा महिमा किती महान असतो. तसेच जीवनात गुरु का गरजेचे असतात? याचे देखील महत्व समजेल.आपल्या गुरूंचा गौरव म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.  

गुरु  म्हणजे काय?

गुरुचे महत्व जाणून घेण्या अगोदर गुरु म्हणजे काय ? हे अगोदर समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. गुरु म्हणजे मार्गदर्शक. आपण जर चुकीच्या मार्गाने जात असू तर त्यावेळी आपल्याला योग्य मार्गावर जाण्यासाठी जे कोणी प्रोत्साहित करत असतील त्या सर्वांचा समावेश आपल्याला गुरु म्हणून करावा लागेल.
आणि अगदी आपण एखादी चूक केली तर आपल्यावर रागावणारे आई वडील असतील किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर मस्ती केली तर आपल्याला शिक्षा करणारे शाळेतील शिक्षक असतील. आपण चुकीचे वागलो तर आपल्यावर चिडणारे आपले मित्र असतील. एवढेच नव्हे तर एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी जे जे आपल्याला मदत करतात त्या सर्वांनाच गुरु म्हणावे लागेल. एका व्यापक करताना निसर्ग देखील आपला गुरुच आहे तो कसा ते एका उदाहरणातून समजून घेऊ.समजा आपण खूप नकारात्मक झालेलो आहोत आणि अशावेळी आपण एका झाडाखाली बसलेलो असताना एक मुंगी झाडावर चढताना शेकडो वेळा खाली पडते परंतु तिथीचे प्रयत्न सोडत नाही यातून आपल्या असे लक्षात येते की, ती मुंगी आता यशस्वी झालेले आहे या ठिकाणी निसर्गातील एक छोटासा जीव मुंगी आपल्याला अपयश आल्यावर अपयशाला घाबरून जायचे नाही असं संदेश देतो. आपल्याला ती मुंगी देखील गुरु समान आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चला तर मग काही मुद्द्यांच्या आधारे आपल्या जीवनामध्ये गुरूंचे महत्त्व समजावून घेऊया.

गुरूंचे महत्त्व निबंध मराठी मांडणी 

आपल्याला समजावे यासाठी आम्ही मुद्दे दिलेले आहेत आपण मात्र Importance of Guru Essay Marathiलिहीत असताना छोटे छोटे पॅराग्राफ बनवावेत.

1.मार्गदर्शक

व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु हा केवळ उपदेश करणारा नसतो, तर त्या ठिकाणी एक मार्गदर्शक म्हणून गुरु आपली भूमिका बजावत असतो. आपल्या शिष्याची प्रगती होण्यासाठी गुरु त्याला मार्गदर्शन करत असतो. या ठिकाणी केवळ उपदेश करणे अपेक्षित नाही तर मार्ग दाखवणे अपेक्षित आहे आणि म्हणूनच व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु हा अतिशय महत्वाचा आहे.

2. सर्वांगीण विकासासाठी मदत

व्यक्तीच्या केवळ बाह्य रूपाला किंमत नसते तर व्यक्ती ही अंतर बाह्य परिपूर्ण असली पाहिजे. थोडक्यात त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक अशा सर्व पातळीवर जर व्यक्तीचा विकास झाला तर त्या व्यक्तीला एक आदर्श व्यक्ती म्हणून गणले जाईल आणि हीच भूमिका गुरु व्यक्तीच्या जीवनामध्ये करत असतात. गुरु व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायमच कटिबद्ध असतात.

3. आत्मविश्वासात भर

क्षेत्र कोणतेही असो, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला कामगिरी करायची आहे.त्या क्षेत्रात कामगिरी करत असताना आपल्या मध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते आणि तो आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गुरु करत असतात.
एखाद्या विद्यार्थ्याला भाषण द्यायचे आहे ,परंतु भाषण देत असताना तो विद्यार्थी जर घाबरत असेल अशावेळी त्याचे गुरु त्याला मदत करत असतात आणि साहजिकच त्यामुळे त्याच्यामध्ये भाषण देण्याची अर्थात वक्तृत्व कलेची गोडी वाढतेम्हणजेच काय तर गुरु शिष्याच्या आत्मविश्वासामध्ये वाढ करतात म्हणून त्यांना अनन्यसाधारणा असे महत्त्व आहे.

4. ज्ञानाची देवाण-घेवाण

अपार कष्ट घेऊन गुरूंनी विद्या प्राप्त केलेली असते, परंतु ती विद्या इतरांकडे हस्तांतरित व्हावी? तिची देवाण-घेवाण व्हावी ? यासाठी महत्त्वाची भूमिका गुरु पार पाडत असतात
गुरुजवळ असलेले ज्ञान जर त्यांनी इतरांना दिले नाही , तर ते ज्ञान लोप पावेल, म्हणूनच व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरू अतिशय महत्वाचे आहेत.

5. बारकावे समजण्यासाठी

कोणत्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर नवख्या व्यक्तीला त्या क्षेत्रातील बारकावे अजिबातच माहीत नसतात आणि ते बारकावे माहीत करून देण्याचे काम गुरु करत असतात.

6.आत्मिक उन्नती

व्यक्ती प्रगल्भ बनायचे असेल तर त्या व्यक्तीची आत्मिक उन्नती होणे तेवढेच गरजेचे असते. व्यक्तीला आत्मिक उन्नती करण्यासाठी गुरुच मदत करत असतात.

7.सुखी जीवनाचा मूलमंत्र कळण्यासाठी

आजच्या कलियुगामध्ये सुख म्हणजे नेमके काय? अनेकांना समजत नाही अशावेळी ऐहिक सुखामध्येच अनेक जण गुरफटून जात असतात.त्या लोकांना सुखी जीवनाचा मूलमंत्र काय आहे ?जीवनात खरे सुख आहे? हे समजावून सांगण्याचे काम गुरु करत असतात.

8.आत्मभान

आपल्या शिष्यासमोर कोणतीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मभान असणे किती गरजेचे आहे? त्याची जाणीव गुरु करून देत असतात. कदा शिष्य खूपच ओवर स्मार्ट म्हणत असेल अशावेळी त्या शिष्याला रागवून त्याच्याकडून उचित कार्य करून घेण्याचे काम सुरू करत असतात.

9.बारकावे समजण्यासाठी

कोणत्या क्षेत्रामध्ये आपण गेल्यानंतर, ते क्षेत्र जर आपल्यासाठी नवीन असेल आणि त्यातील बारकावे जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी असणाऱ्या अनुभवी व्यक्तीची मदत होत असते.थोडक्यात ती अनुभव व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी गुरु समानच असते म्हणून कोणत्या क्षेत्रांमध्ये बारकावे समजून घेण्यासाठी आपल्याला गुरु मदत करत असतात.

10.विवेकी मनाची घडन

अमुक परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झाल्यानंतर आपण नेमके काय करावे ? याची जाणीव म्हणजे विवेकी मन तयार करणे होय. आपल्या शिष्याचे मन विवेकी करण्याचे काम गुरु वेगवेगळ्या उपदेशातून करत असतात. भविष्यामध्ये आपल्या शिष्या समोर कोणते पर्याय उभे राहिले तरी त्यातील योग्य तो पर्याय कसा निवडावा याची शिकवण गुरु त्याला देत असतात.

गुरूचे महत्त्व पहा See the importance of Guru 

गुरूचे महत्त्व निबंध मराठी सार 

आजच्या या लेखातून आपल्या लक्षात आले असेल की ,आपल्या जीवनात गुरु किती महत्वाचे आहेत. आज तंत्रज्ञान वापरुन मुले शिकत असली तरी गुरूचे स्थान कधीच कमी होणार नाही हे नक्की.

थोडक्यात व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु असणे अतिशय गरजेचे आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण गुरुचे महत्व हा मराठी निबंध पहिला. तो आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करा. जर आपल्याकडे या संदर्भात आणखी काही नवीन माहिती असेल तर आम्हाला ती कमेंट करा आम्ही आमच्या या निबंधामध्ये ती माहिती आवर्जून ऍड करू. भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! गुरुगुरू

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment