guru pournima marathi nibandh 2023

व्यक्तीच्या जीवनात गुरुचे स्थान हे अतिशय अढळ आहे.व्यक्तीच्या जीवनात गुरूला महत्त्व आहे. गुरुमुळेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण गुरुपौर्णिमा निबंध मराठी पाहणार आहोत. चला तर मग या निबंधाला सुरुवात करूया.

गुरुपौर्णिमा मराठी निबंध | guru poornima essay in marathi | guru poornima marathi nibandh

आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते काही जण या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा देखील म्हणतात. ज्या व्यास ऋषींनी हा महाभारतासारख्या महाकाव्याची रचना केली त्यांना देखील या दिवशी वंदन केले जाते.
अकेले हिंदुस्तानात आतापर्यंत जेवढे गुरु झाले परंतु महाकवी व्यास यांच्या इतके श्रेष्ठत्व कोणालाच प्राप्त झाले नाही म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास मुनी यांना अगदी मनोभावे पाठवले जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना इतके महत्व दिले आहे की गुरु हे आपल्याला देवा समान आहेत. आपल्या गुरूंनी आपल्याला ज्या सदविद्या दिल्या जो जीवन जगण्याचा कानमंत्र दिला त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरु पौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना आवर्जून भेटतात शुभेच्छा देतात.

आपल्या भारत देशामध्ये महाभारत रामायण काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आलेले आहे. तिच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्ती होते विद्याप्राप्ती होते आणि त्या विद्येच्या बळावरच आपण आपला विकास साधत असतो. आपली प्रगती करत असतो अशा गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. अलीकडच्या काळात तर शाळा महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. एकप्रकारे आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला तर भारतामध्ये गुरु शिष्यांच्या अनेक प्रसिद्ध जोड्या आपल्याला सांगता येतील जसे की जनक याज्ञवल्यक, शुक्राचार्य जनक, विश्वामित्र राम लक्ष्मण, द्रोणाचार्य अर्जुन अशा कितीतरी जोड्या आपल्याला गुरु शिष्य परंपरेतील सांगता येतील.

गुरु आपल्या शिष्याला करीत असलेल्या मार्गदर्शनामुळे शिष्याची प्रगती होत असते शिष्याने भविष्यामध्ये कोणत्या मार्गावर चालावे? साठी गुरु कायमच उद्देश करत असतात. गुरु पेक्षा या जगामध्ये काही श्रेष्ठ नाही अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती आहे.

गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंची उपासना करण्याचा दिवस म्हणूनच उशी प्रत्यक्ष आपल्या गुरुची प्रार्थना करत असतो. एखाद्या गुरूकडून आपल्याला जर ज्ञान प्राप्ती करून घ्यायचे असेल तर आपल्याला विनम्र होऊन ग्रुप कडे जावे लागते गुरूकडून ती विद्या धारण करावी लागते आणि मगच गुरु आपल्याला गुरु मंत्र देत असतो विद्या देत असतो असेही गुरुकुल परंपरा भारतामध्ये फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि आज देखील गुरुपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.

इकडच्या काळामध्ये मोबाईल इंटरनेट यांच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञान मिळवताना दिसत आहेत असे असले ,तरी ज्ञानदान करणारे गुरु यांचे महत्व कधीच कमी होणार नाही. गुरु म्हणजे वयाने के व श्रेष्ठ असतात तेच गुरु असे म्हणणे योग्य नाही तर जे जे आपल्याला सदगुणांची शिकवण देतात मग ते वयाने लहान असो की मोठे याला फारसे महत्व नाही. जो कोणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आदर्श मार्ग दाखवतो त्यांचा समावेश गुरुस्थानी होतो.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्याच्या मुखामध्ये एकच शब्द असतो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु |
गुरुर्देवो महेश्वरा ||
गुरु साक्षात परब्रम्ह |
तस्मै श्री गुरवे नमः ||

आपल्या जीवनात गुरूकडून ज्ञान घ्यायचे असेल तर आपल्याला नेहमी विनम्र असावे लागते याच्याविषयीचा एक दाखला द्यायचा झाले तर जर आपल्याला गुरुरुपी ज्ञानातील ज्ञानाची घागर भरायचे असेल तर ज्या पद्धतीने आपण नदीतील पाणी भरण्यासाठी आपल्याला खाली वाकावे लागते नम्र व्हावे लागते आणि मगच आपण नदीमध्ये असणारे पाणी आपल्या घागरीमध्ये भरू शकतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला गुरुकडून विद्या ग्रहण करायचे असेल तर आपल्याला गुरुचरणी नतमस्तक व्हावे लागेल आणि गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्याला विद्या ग्रहण करावी लागेल. अशी ही गुरुपौर्णिमा असते.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना मनोमन वंदन केले जाते यासाठी वेगवेगळ्या प्रार्थना देखील म्हटल्या जातात यातून आपल्या गुरूंचे स्मरण केले जाते. गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची आठवण म्हणून आपल्या गुरूंना ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टींचे दान करण्याची देखील एक परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेले आहे की जेणेकरून आपल्या गुरूंना ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी आपण दानरूपाने इतरांना देऊन आनंदी करावे ही यामागील भूमिका आहे.

आपल्या घरातील आई वडील मोठा भाऊ हे देखील आपल्यासाठी गुरु समान असू शकतात कारण कधी आपण जर चुकत असलो तर ते आपल्याला रागावतात आपल्यावरती चिडतात परंतु त्यामागील त्यांचा हेतू हा एकच असतो की आपल्या मुलाचे कल्याण व्हावे थोडक्यात काय तर आपल्या भल्यासाठी जे जे प्रयत्न करत असतात ते आपले गुरु असतात हे मात्र नक्की.

शेवटी गुरूंविषयी असे म्हणावे वाटते,

गुरु म्हणजे वाटाड्या
गुरु म्हणजे मार्गदर्शक
गुरु म्हणजे सोबती
गुरु म्हणजे आधारस्तंभ
गुरु म्हणजे उत्तम संस्कार
करणारे व्यासपीठ
गुरु म्हणजे व्यक्तीच्या जीवनाला
कलाटली देणारा महामानव

अशा या गुरूंची थोरवी आपण गावी तेवढी थोडीच आहे. अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेचा निबंध लिहू शकता.

 

गुरुपर्णिमा मराठी निबंध 2 | guru poornima marathi essay 2

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु |
गुरुर्देवो महेश्वरा ||
गुरु साक्षात परब्रम्ह |
तस्मै श्री गुरवे नमः ||

असा ज्या गुरूंचा महिमा वर्णन केला जातो त्या गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व शिष्य मंडळी आपल्या गुरूंना आवर्जून भेटतात. बऱ्याचदा आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु आपल्यासमोर नसतात अशावेळी शिष्य त्यांना मनोमन आठवतात आणि त्यांची मनोभावे पूजा करतात. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंसाठी प्रार्थना देखील केल्या जातात.

गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर असा दिवस की ज्या दिवशी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणे. आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला सर्वच पातळीवर मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांविषयी अर्थात गुरुंविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. फार वर्षापासून हा गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.भारतामध्ये दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष असे महत्त्व आहे.

महाभारतासारखे महाकाव्यरचणाऱ्या महर्षी व्यासांचा जन्मदिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा सण होय.म्हणूनच या दिवशी महर्षी व्यास यांना वंदन केले जाते. असे म्हटले जाते की या जगामध्ये कितीही गुरु होऊन गेले तरी महर्षी व्यासांसारखा गुरु होणे नाही. कारण त्यांच्याजवळ जे ज्ञान होते ते आघात ज्ञान होते म्हणूनच त्यांनी महाभारतासारख्या महाकाव्याची निर्मिती केली वेद उपनिषदे यांचे लेखन केले.

आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण चुकीच्या मार्गावर चालल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आपला कान पकडला किंवा आपण आपले मार्गक्रमण करत असताना ते नीट पद्धतीने करत नसू अशावेळी ज्यांनी ज्यांनी आपल्याला सुचित केले सूचना दिल्या अशा सर्वांनाच आपण आपले गुरु मानले पाहिजे. त्या ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रगतीमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांनाच आपण गुरु म्हणून संबोधले पाहिजे.

आपण चुकत असू तर आपल्याला आपल्या घरातील आई वडील आपल्यावरती रागावतात कधीकधी आपला मोठा भाऊ आपल्या वरती रागवतो आपली मैत्रीण देखील आपल्या वरती रागावते आणि आपल्याला योग्य त्या मार्गावर चालण्यासाठी सूचना करत असते याचाच अर्थ ते देखील आपल्याला गुरुस्थानी आहेत.

 

गुरुपोर्णिमा निबंध मराठी 3 | guru pournima essay in marathi | guru pournima marathi nibandh

 

गुरुपौर्णिमा दहा ओळी मराठी निबंध guru pournima  ten line essay in marathi 

1.गुरुपौर्णिमा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

2. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूला मनोभावे वंदन करत असतात.

3.आपल्या गुरूच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

4. आपल्या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला आपण उत्तम माणूस म्हणून घडावे यासाठी मार्गदर्शन केले त्या सर्वांना गुरु मानले पाहिजे.

5. शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक जसे आपले गुरु आहेत त्याच पद्धतीने वेळप्रसंगी आपल्यावरती रागावणारे आई वडील देखील आपल्यासाठी गुरुच आहेत

6. अलीकडे शाळा महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमा हा साजरा केला जातो.

7.गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेतील विद्यार्थी आवर्जून आपल्या शिक्षकांना वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात.

8. महर्षी व्यास की ज्यांनी महाभारतासारख्या महाकाव्याची निर्मिती केली त्यांचा जन्मदिन याच दिवशी झाला.

9. आपल्या जीवनातील गुरुचे महत्व समजून घेण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

10. ज्याने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला त्यांच्याविषयी नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

अशा पद्धतीने आज आपण गुरुपौर्णिमा निबंध पाहत असताना आपल्याला गुरुपौर्णिमेचे 3 उत्कृष्ट निबंध दिलेले आहेत. ते निबंध आपल्याला नक्कीच गुरुपौर्णिमा या विषयावरती निबंध लिहीत असताना भाषण देत असताना उपयोगी पडतील.

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment