मी सर्कशीतील हत्ती बोलतोय 2023। Cricus elephant autobiography

मी सर्कशीतील हत्ती बोलतोय

Cricus elephant autobiography  आमच्या गावात सर्कस आली होती. आमचे मित्र सर्कस बघायला गेलो होतो सर्कस बघण्यासाठी एक तास होता ;म्हणून आम्ही सर्कशीचे तंबू जेथे आहेत त्याकडे फेरफटका मारायला निघालो आणि मला ठेच लागली आणि सगळे मुलं पुढे निघून गेली .. मी हळूहळू त्यांच्या पाठी चाललो होतो मला अचानक आवाज आला आणि मी बाजूल  आवाजाच्या दिशेने पाहिले आणि हत्ती मला दिसला . मला बोलवत आहे हे पाहून मी हत्तीकडे गेलो.. एक वृद्ध हत्ती पाहून मलाही वाईट वाटले तो बोलू लागला. 

Cricus elephant autobiography

Cricus elephant autobiography

 मी हत्ती आहे जंगलात माझा जन्म एका तळ्याकाठी झाला ..निसर्गरम्य परिस,र हिरवळ, पाणवठा,निळेभोर आकाश  आजूबाजूला गवतांचे,, लव्हाळे तळ्याकडे ससे, हरीण  पक्षी मोठमोठे झाडे असं सगळं दृश्य विलभनीय होते .. मी खूप आनंदाने बागडू लागलो . माझा परिवार खूप मोठा होता.

सगळे एकत्र राहत होतो करतात राहत होतो कोणतेही संकट आलं तरीही आम्ही त्याच्यावर मात करत होतो किंवा आम्ही एकजूट दाखवून आमचे लहान गोपाळांचे संरक्षण करण्यासाठी आमचे मोठ मोठे दादा आमचे संरक्षण करत होते.. मी खूप गोंडस दिसत होतो .सगळेजण माझे लाड कौतुक करायचे आणि मला शिकवत होते; की ;” जंगलामध्ये सर्व बाजूने आपल्याला त्रास आहे तसाच माणसांचाही जास्त त्रास आहे. एक वेळ हिंस्त्र पशुने हल्ला करून आपला  फडशा पाडला तरी आम्हाला काही वाटत नाही; पण या माणसांच्या प्रवृत्ती पुढे आम्ही सुद्धा गुडघे टेकवले आहेत. माणसाचे पोट भरण्यासाठी आमच्यासारख्या बाळ गोपाळांचा वापर कशा पद्धतीने करतात हे खूप भयंकर आहे ” असे मला शिकवत होते. 

 तरीही कोठून कशा पद्धतीने काय होईल ते सांगता येत नाही जसं माणसांचे मध्ये नियती कधी कोणाला कधी काही होईल हे सांगता येत नाही, तसंच माझ्या बाबतीतही असेच झाले

आम्ही सगळेजनण गवत  खाऊन निवांत गप्पाटप्पा  करत होतो . सावलीमध्ये बसले असतानाच अचानक फटाक्यांचा आवाज आला; आम्ही दचकलो काय करावे कळेना कुठे जावे, पळावे समजत नव्हते.. आम्ही मात्र आमच्या मोठ्यांच्याच  पाठीमागे हळूहळू जाऊ लागलो .  माझा  वेग कमी कमी होत गेला आणि मी पाठीमागेच भरकटत राहिलो.  रस्ता कुठे कसा आहे  दिसत नव्हता सगळीकडे जंगलमय असं वातावरण आणि गवताळ असा प्रदेश असल्याने त्या ठिकाणी सगळे भावंडे  निघून गेले होते. 

 मी एकटाच पाठीमागे राहिलो होतो. सगळीकडे हिरवळ आहे त्या बाजूला जाऊन आपल्याला आपल्या भावंडाचा शोध घेता येईल म्हणून मी दुसऱ्या  दुसऱ्या दिशेने जाताना  अचानक गवताच्या कमरे एवढ्या गवतातून पळत असतानाच मी खड्ड्यात पडलो.  खड्डा खूप मोठा होता मला समजत नव्हते की;  या ठिकाणी कधीही खड्डा खोदला नव्हता किंवा दिसला नव्हता तरीही हा खड्डा कसा अचानक आला हे समजत नव्हते.  मी त्या खड्ड्यातून बाहेर पडायला गेलो तर काहीच करता येत नव्हते आणि मला मात्र माणसांनी फसवले असे वाटू लागले.  मी जोरजोरात ओरडू लागलो, किंकाळ्या फोडू लागलो.  तिकडून  माझ्या भावंडाच्या किंकाळ्या येऊ लागल्या पण प्रत्यक्ष मात्र माझ्याजवळ कोणीच येण्याचे धाडस करू शकत नव्हते ;कारण की त्यांना माहीत झाले असावे की; मी माणसांच्या जाळ्यात सापडलो आहे आणि तसेच दहा-पंधरा माणसे माझ्या भोवती उभे राहिले . 

 या खड्ड्यातून कसे बाहेर काढायचे आणि मला घेऊन जायचे याची कुजबुज चालू होती.  माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले मी माणसांच्या तावडीत सापडलो  याची  मला भीती वाटू लागली.  मी खूप त्रागा  करण्याचा प्रयत्न केला, सुटून जाण्याचा प्रयत्न केला. असे वाटले  सोंडेने एकेकाला चिरडून टाकावे,फेकून द्यावे; पण माणसे माझ्याजवळ न येता लांबूनच साखळ्यांनी, दोऱ्याने मोठमोठ्या रस्सीने  माझे पाय, सोंड बांधले आणि मला  एका मोठ्या ट्रकमध्ये बसवून जबरदस्तीने  घेऊन जाऊ लागले . 

मला कोणत्या गावी आलोय हे सुद्धा माहित नाही की रस्ता कोणता कुठे जातो हे सुद्धा माहित नाही,मी  एवढा प्रचंड प्राणी एवढी ताकद असूनही माणसाने मला मात्र फसवून मला घेऊन चालले माझ्याकडे आता दुसरा काहीच पर्याय नव्हता मी एका सर्कसच्या  ठिकाणी येऊन पोहोचलो.  त्या ठिकाणी सुद्धा अनेक प्राणी माझ्यासारखे येऊन दाखल झाले होते.. एकमेकांच्या डोळ्याकडे पाहत होतो पण अश्रू  सुद्धा येत नव्हते; कारण की आपण या माणसांच्या तावडीत सापडलो आहे हे कळत होते. 

 चार-पाच दिवस मी अन्नाचा कण खाल्ला नाही. शेवटी परिस्थिती कितीही गंभीर असली तरी  पोटासाठी काहीतरी खावेच लागते आणि मी खाऊ लागलो . मला चार-पाच लोक येऊन चाबकाचे फटके देऊन पळवू लागले.  पाहिजे तसे कृती करू लागले.  बॅट बॉल माझ्याकडे आणून बॅट घेऊन तो चेंडू उंच दिशेने भिरकावण्यात मलाही आनंद वाटू लागला ;पण कधी कधी नियम चुकला की चाबकाचा फटका बसलाच म्हणून समजायचे .  मी हे आवडीने खेळत होतो.  माझ्यावर रंगीबेरंगी कपडे ठेवून मला नाच गाणे शिकवू लागले, म्युझिक चालू केले की मला आनंदाने डो लायला सांगायचे ,जर डोललो नाही  तर चाबकाने किंवा वेगळ्या पद्धतीची शिक्षा करत होते. 

 मी सर्कसमध्ये काम करायला गेलो की; लोक माझ्यावर खूप आनंदाने किंचाळायचे ओरडायचे.. तसतसे  मला काम करायला खूप आनंद वाटायचा.. माझ्या सोंडेमध्ये मध्ये काही जण आनंदाने खाऊ ठेवत होते; काही जण पैसे ठेवत होते, काही जे जे काही पदार्थ खायला आणले असतील ते ठेवत होते; पण मला खाण्याची परवानगी नव्हती.मी सोंड  वरच्या मार्गाकडे करून त्यांना देत होतो . 

 हा माझा नित्याचा क्रम होता.. काही वर्षे चांगले होते , हळूहळू माझेहि  काम कमी कमी होऊ लागले.  माझा उत्साह कमी होऊ लागला.  हे मालकांनी पाहिलं आणि माझ्याऐवजी दुसरा नवीन हत्ती घेऊन तो काम करू लागला.  मी एवढे दिवस खूप मेहनत, कष्ट घेतले ..माझ्याकडे आता दुर्लक्ष झाले. माझा साखळीने  बांधलेला पाय दुखत होता .  त्याला वेदना होत आहेत कोणाला सांगू.  माझे भावंडे असते तर सोंडेने त्याला थोडासा दाबायला सांगितले असते, त्याने झटकिपट बरा केला असता, किंवा झाडपाला हल्ला असतात तरी माझे ते जखम बरी झाली  असते. 

 आज मला चालता येत नाही आणि मला आहे जंगलात ही सोडत नाहीत.. आज इथेच मला मरण आले आहे मी जंगलातला प्रचंड बलाढ्य प्राणी असूनही माझी ही अवस्था अशी झाली आहे; म्हणून माझे हे दुःख कोणाला सांगू  कोण ऐकणार आहेत आणि  लोक ह्या मुख्य प्राण्यांना असे डांबून ठेवून माझ्यावर असे प्राणघातक असे अत्याचार करून माझ्याकडून काम करून आणि आज माझी अशी जीर्ण  हालत बघून  माझी मलाही वाईट वाटत आहे.  मला यातून बाहेर पडावे  वाटते.  कुठेतरी निघून जावं वाटतं,पण माझे पाय साखळीने बांधले आहेत मी काही करू शकत नाही;  पण मनाला सवय लागून गेली आहे.

 या सगळ्या गोष्टी घडत असताना  माझे भावंडे काय करत असतील, जंगल काय असते हे सगळं विसरून गेलो आहे . मला ह्याच माणसांच्या जंगलात राहावे लागत आहे आणि माझे कधी मरण येईल याचीही मी वाट आतुरतेने  पाहत आहे ..पुढचा जन्म मला माणसांच्या दुनियेत नको तर जंगलातच कमी आयुष्य लाभले तरीही जंगलातच मरण येऊ दे !असं मला  मनोमन वाटत आहे. 

 तेवढ्यात माझ्या मित्राचा आवाज आला आणि अरे काय रे ह्या  म्हाताऱ्या हत्तीजवळ बसला आहे ,अरे तिकडे सर्कस चालू होऊन दहा मिनिट झाली  आहेत आणि तू  ह्या हत्तीलाच गोंजारत  बसला आहे.. असे म्हणून मला त्याने ओढून नेले .मी सर्कस बघत असताना मला हत्ती विषयच विचार डोक्यात घोळत राहिले आणि सर्कस बघून झाल्यावरही मला तोच हत्ती  डोळ्यासमोर येऊ लागल.

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment