कोरोना एक महामारी निबंध मराठी 2023| corona ek mahamari essay in marathi 2023 latest

संपूर्ण जगाला एका भयभीत वातावरणात नेण्याचे काम जर कोणी केले असेल तर तो आहे कोरोना व्हायरस. या सृष्टी वरील अखिल मानव जात आता नाश पावते की काय इतकी भीती ज्या व्हायरसने निर्माण केली तो व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस होय. आज आपल्याला कोरोना म्हटल्यानंतर तितकीशी भीती वाटत नाही, परंतु एक काळ असा होता की,माणसाचे संपूर्ण जगण्याच्या आशा या व्हायरसने घालवल्या होत्या. तो व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. आजच्या लेखामध्ये आपण संपूर्ण जगाला ज्या कोरोना व्हायरसच्या भीतीने हैराण केले एका भीतीच्या वातावरणात ढकलले त्या आजाराविषयी विद्यार्थ्याना माहिती असणे गरजेचे आहे.

कोरोना एक संकट निबंध   निबंधाची मांडणी 
1 प्रस्तावना 
2 कोरोना म्हणजे काय 
3 कोरोनाची  लक्षणे 
4 कोरोना होऊ नये यासाठी खबरदारी 

थोडक्यात काय तर दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेला कोरोना एक महामारी हा निबंध विचारला जाऊ शकतो.म्हणूनच आज आपण कोरोना एक महामारी निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत. (corona ek mahamari essay in marathi) हा निबंध वैचारिक स्वरूपाचा निबंध असल्यामुळे या निबंधाची मांडणी करत असताना आपल्याला अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करावी लागेल. चला तर मग आपल्या निबंधाला सुरुवात करूया.

Contents hide

कोरोना एक महामारी निबंध मराठी  2023 | corona ek mahamari essay in marathi 2023 

कोणत्याही निबंधाला सुरुवात करत असताना सुरुवातीला आपण प्रस्तावना करणे गरजेचे आहे.ती प्रस्तावना आपला निबंधाचा नेमका विषय काय असणार आहे? याविषयी माहिती देणारीअसावी.आपल्या निबंधाची तोंड ओळख करून देणारी असावी.आज आपण corona ek mahamari esaay in marathi लिहित असताना त्याची प्रस्तावना खालीलप्रमाणे करून निबंधाला सुरुवात करू शकता.

कोरोना एक महामारी निबंध प्रस्तावना corona ek mahamari essay in marathi inro 

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.या आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला जागतिक महामारी पसरवणारा वायरस असे घोषित केले. या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये आपले थैमान घातले आणि माणसाच्या जीवनामध्ये एक अस्थिरता आणण्याचे काम केले.

कोरोना म्हणजे काय?

कोरोना हा एक विषाणू असून तो विषाणू संसर्गजन्य आहे. एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला की त्या व्यक्तीपासून अनेकांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना हा विषाणू सर्वप्रथम चीनमधील वुहान शहरांमध्ये आढळून आला. त्यानंतर तो इतका झपाट्याने वाढला की त्याने अवघ्या जगाला अगदी काही महिन्यांमध्येच विळखा घातला. हा विषाणू सुरुवातीला नाकातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे या विषाणूचा संसर्ग आपल्या शरीरामध्ये झाल्यानंतर सुरुवातीला दिसतात.मात्र पुढे आजाराने जर उग्र स्वरूप धारण केले तर मात्र व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचबरोबर शरीरात अनेक गुंतागुंत वाढते बऱ्याचदा व्यक्ती दगावली देखील जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराची काही लक्षणे सांगितले आहेत ती लक्षणे आपण पाहूया.

कोरोना विषाणूची लक्षणे

कोरोना विषाणू अर्थात व्हायरसचा संसर्ग आपल्याला झालेला आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर खालीलपैकी काही लक्षणे आपल्याला जर झाले असतील तर आपण म्हणू शकतो की आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

1.सर्दी, ताप,खोकला

ज्या व्यक्तीला साधारणपणे सर्दी त्याचबरोबर त्याच्या जोडीला ताप आणि खोकला येत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झालेला आहे.

2. धाप लागणे

ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्या व्यक्तीला जर सर्दी ताप आणि खोकला याचबरोबर चालत असताना धाप लागत असेल तर ,आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला कोरोना प्राथमिक अवस्थेमध्ये झालेला आहे.

3. अशक्तपणा

व्यक्ती आजारी नसताना देखील जर तिला सर्दी,ताप, खोकला एका आठवड्यापेक्षा जास्त असेल आणि आपल्या शरीरामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात विकनेस जाणवणे हे देखील कोरोनाचे एक लक्षण आहे.

4. घसा खवखवणे

वरील लक्षणाच्या जोडीला जर त्या व्यक्तीचा घसा दुखत असेल. घशामध्ये सूज आलेली असेल किंवा घसा खवखव करणे हे देखील कोरोनाचे लक्षण आहे.

5. अंगदुखी

ज्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झालेला आहे त्या व्यक्तीला वरीलपैकी काही लक्षणे जाणवत असतील आणि आपले स्नायू व अंगदुखी यासारख्या समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

6.गंध संवेदना जाणे

व्यक्तीला आपल्या नाकाने कोणत्याही प्रकारचा गंध येत नसेल,तर समजून जावे की त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे.

7. तोंड बेचव होणे

सर्दी, ताप ,खोकला, अंगदुखी यांच्या जोडीला तोंड बेचव होणे हे देखील एक लक्षण आहे.

8.ताप न उतरणे

आपल्याला जर साधा ताप आला असेल ,तर तो आपण गोळ्या औषधे घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये कमी होतो. परंतु जर आपल्याला कोरोना संसर्ग झाला असेल तो ताप मात्र लवकर कमी होत नाही.

कोरोना झाला हे कसे ओळखावे ?

  • सर्दी
  • ताप
  • खोकला
  • अंगदुखी
  • घशातील खवखव
  • अशक्तपणा

ही सर्व लक्षणे कमी अधिक प्रमाणात असतील तर समजावे कोर झाला आहे.

कोरोना कसा पसरतो

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आहे, त्यामुळे हा विषाणू व्यक्ती खोकत असताना त्याचबरोबर शिंकत असताना जे तुषार कण बाहेर उडतात त्या कानांमधून अर्थात हवेतून हा व्हायरस पसरत असतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे ,त्या व्यक्तीने वापरलेले कपडे किंवा वस्तू यावरती जर ते कण पडलेले असतील आणि निरोगी व्यक्तीच्या नाकाजवळ किंवा हाताला ते तुषार कण लागले आणि त्या व्यक्तीकडून नाकाकडे हात गेला तर मात्र निरोगी व्यक्तीला देखील हा संसर्ग होऊ शकतो.हा कोरोणा संसर्ग होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेता येईल ते आपण पाहूया.

कोरोना वायरस पासून वाचण्यासाठी उपाययोजना

1. सुरक्षित अंतर

जन माणसांमध्ये वावरत असताना आपण जर सुरक्षित अंतर ठेवले तर मात्र एखाद्या व्यक्तीला जी आपल्या संपर्कात आलेली आहे आणि तिला कोरोना संसर्ग झालेला आहे परंतु आपण तिच्या जवळच गेलो नाही तर आपला नक्कीच या संसर्गजन्य आजारापासून बचाव होतो. साधारणपणेकिमान 3 फुटांचे अंतर ठेवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

2. सॅनिटायझर चा वापर

आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळी साबणाने हात धुणे शक्य नाही. मग अशावेळी आपण काय करू शकतो तर कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर किंवा आपल्या तोंडाजवळ हात नेण्या अगोदर सॅनिटायझरने आपल्या हाताचे निर्जंतुकीकरण करून घेतले तर नक्कीच आपला या कोरोना पासून बचाव होऊ शकतो.

3. वारंवार हात धुणे

आपल्याला जर शक्य असेल तर आपण वारंवार हाताला साबण लावून आपल्या हात स्वच्छ धुतले पाहिजेत.

4. मास्कचा वापर

कोरोना हा विषाणू जर नाकातून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थामुळे पसरत असेल तर अशावेळी आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी मास्कचा वापर केला पाहिजे. परंतु मास्क चेहऱ्यावरून काढत असताना त्याचबरोबर लावत असताना देखील स्वच्छतेच्या सगळ्या खबरदारी आपण घेतल्या पाहिजेत.

5. फळे पालेभाज्या धुवून घेणे

आपण आपल्या घरामध्ये ज्या वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळे आणतो त्यांना अनेक व्यक्तींचा हात लागलेला असतो यावर उपाय म्हणून आपण फळे आणि पालेभाज्या घरी आल्यानंतर त्या स्वच्छ धुऊन घेतल्या पाहिजेत त्यांचे निर्जंतुकीकरण करून घेतले पाहिजे.

6. शिजवलेले मांस खाणे

अर्धवट शिजलेल्या माणसांमध्ये हा विषाणू जिवंत राहू शकतो. म्हणून माणूस मटण असो की मांस कोणताही अन्नपदार्थ या काळामध्ये तो जास्त प्रमाणात शिजवून घेतला पाहिजे.

7. परिसराची स्वच्छता

आपण ज्या परिसरामध्ये राहतो किंवा घरामध्ये राहतो अशा वायरसचा प्रसार रोखण्यासाठी कायम आपल्या परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या आजाराविरुद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती चांगले ठेवणे अतिशय गरजेचे आहे चला तर मग कोरोना पासून वाचण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील का ते आपण पाहूया.

कोरोना काळात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाययोजना

1. प्रोटीन युक्त आहार

आपल्याला जर आपली इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर ,आपण जास्तीत जास्त प्रोटीन रिक्त आहार घेतला पाहिजे म्हणून त्या कोरोना महामारीच्या संसर्ग काळामध्ये आपल्या आहारामध्ये दूध, मांस,अंडी यांचे प्रमाण वाढवले पाहिजे.

2. सकस आहार

कोणत्याही आजाराविरुद्ध लढत असताना किंवा आपल्याला आजार होऊ नये यासाठी, आपण सकस आहार घेतला पाहिजे. म्हणूनच कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी प्रोटीन युक्त आहाराबरोबर हिरव्या पालेभाज्या यांचे देखील सेवन आपण केले पाहिजे.

3. विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन

विटामिन सी अर्थात क जीवनसत्व आपले प्रतिकारशक्ती वाढवत असतात म्हणूनच या काळामध्ये लिंबू संत्री यासारख्या फळांचे सेवन आपण केले पाहिजे त्याचबरोबर जर आपल्या शरीरामध्ये विटामिन सी चे प्रमाण कमी झाले असेल तर मेडिकल मधून आपण विटामिन सी च्या गोळ्या आणून ठेवल्या पाहिजेत आणि त्या वरचेवर खाल्ल्या पाहिजेत.पण अती प्रमाणात देखील खाऊ नयेत.

4. व्यायाम करणे

या काळामध्ये आपण श्वासाचे व्यायाम करून आपल्या फुफ्फुसांमध्ये ताकद आणली पाहिजे. आपण जर अशी ताकद आणली तर जर आपल्याला थोडाफार कोणाचा संसर्ग झाला तर आपण त्याविरुद्ध लढू शकतो.
अशाप्रकारे आपण आपले प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरच आपण या कोरोना महामारीला हरवू शकतो.

कोरोना महामारीचे परिणाम

1. मृत्यू दारात वाढ

कोरोना महामारीचा सर्वात भयंकर परिणाम म्हणजे या विषयांमुळे संपूर्ण जगामध्ये मृत्यू दरामध्ये मोठी वाढ झाली. आणि माणसाचा जीवनावरचा विश्वास उडाला. इतकी जीवित हानी झाली की संबंधित यंत्रणेला प्रेतांची विल्हेवाट लावताना देखील अडचणी येऊ लागल्या. यावरून ही महामारी किती भयानक होते ते आपल्या लक्षात येते.

2. अकारण भीती

‘कोरोना झाला म्हणजे आपला मृत्यू होणारच’ इतके भीतीदायक वातावरण या महामारीमुळे झाले होते.

3. बेरोजगारीचे प्रमाण वाढले

कोरोना काळामध्ये सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या. लोकांना घरात बसून राहण्याखेरीज पर्याय नव्हता साहजिकच अनेक लोकांचा रोजगार गेला आणि बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.

4. मानसिक असंतुलन

सतत कोरोना वायरस ची भीती आणि घरामध्ये बंदिस्तराने यामुळे लोकांचे मानसिक संतुलन ढासळले या आजाराच्या भीतीमुळे अनेकांचा जीव गमावला गेला. दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यानंतर अनेक रुग्णांनी केवळ भीतीपोटी आपला जीव गमावला.

5. पायाभूत सुविधांवर ताण

ही मामारी जागतिक स्वरूपाचे असल्यामुळे लोकांना पायाभूत सुविधा पुरवण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आल्या काही भागांमध्ये तर लोकांना रोजगार नसल्यामुळे अन्नधान्याचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत होते मजूर वर्गाला याचा खूप मोठा फटका बसला.

6. आरोग्य सुविधांच्या नावाखाली लूट

बऱ्याच व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यामुळे दवाखान्यामध्ये भरती व्हावे लागले परंतु त्या ठिकाणी काही औषधांचा काळाबाजार झाला त्याचबरोबर उपचारासाठी वापरले जाणारे कीड याच्या देखील भरमसाठ किमती लावल्या गेल्या थोडक्यात आरोग्य सुविधांच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांची खूप मोठी लूट या ठिकाणी झाली.

7. देशाच्या आर्थिक विकासात घट

कोरोना महामारी सामना करत असताना , देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड तानाला लोकांना पायाभूत सुविधा आणि आरोग्याच्या सुविधा देत असताना अनेक राष्ट्रांच्या तिजोरी रिकाम्या झाल्या.corona ek mahamari esaay in marathi यावर्षी बोर्ड परीक्षेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशाप्रकारे आर्थिक मानसिक अशा सर्वच प्रकारचा नाहक त्रास या महामार्गमुळे अवघ्या जगाला सहन करावा लागला.या जागतिक महामारीने माणसाला आरोग्याच्या चांगल्या सवयी लावल्या हे मात्र नक्की.आमचा हा . corona ek mahamari esaay in marathi कसा वाटला हे नक्की कळवा.

FAQ

1. कोरोना विषाणूला जागतिक महामारी कोणी घोषित केले?

WHO (जागतिक आरोग्य संघटना )

2. कोरोनाचा पहिला रुग्ण कोठे आढळला ?

चीनमधील वुहान शहरात

3. कोरोनाला कोणत्या नावाने ओळखले जाते?

कोविड 19

आमचे इतर निबंध 

मी मुख्यमंत्री झालो तर 

मी लोकशाही बोलतेय 

माझा आवडता ऋतू पावसाळा 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment