बोलतो मराठी पाठाचे सार व स्वाध्याय | Bolto Marathi Pathache Sar V Swadhyay

Contents hide
1 बोलतो मराठी पाठाचे सार व स्वाध्याय | Bolto Marathi Pathache Sar V Swadhyay
1.2 बोलतो मराठी पाठाचा सार

बोलतो मराठी पाठाचे सार व स्वाध्याय | Bolto Marathi Pathache Sar V Swadhyay

नमस्कार ! विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण इयत्ता दहावीच्या कुमारभारती म्हणजेच मराठी विषयातील पाठ दोन / पाठ दुसरा बोलतो मराठी या पाठाचे थोडक्यात सार व स्वाध्याय पाहणार आहोत.

बोलतो मराठी पाठ सार स्वाध्याय 

आज आपण पाहतो की बरेच विद्यार्थी मराठी आपली मातृभाषा असून देखील मराठी विषयांमध्ये कमी होताना दिसत आहेत युवा काही विद्यार्थी या विषयांमध्ये नापास होताना दिसत आहेत म्हणूनच मराठी सेल्फ स्टडी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि 100 पैकी 100 गुण या एखाद्याने आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न विविध लेखांच्या माध्यमातून केला जाणार आहे म्हणून आवर्जून आमचे सर्व लेख तुम्ही वाचावेत ही विनंती. 

बोलतो मराठी पाठाचे सार व स्वाध्याय
बोलतो मराठी पाठाचे सार व स्वाध्याय

 

 

बोलतो मराठी पाठाचा सार   

बोलतो मराठी हा पाठ मराठी विषयाच्या प्राध्यापिका तसेच भाषातज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती नीलिमा गुंडी यांचा आहे.या पाठच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले आहे. 

बोलतो मराठी या पाठाच्या निमित्ताने आपली मराठी भाषा कशी समृद्ध आहे.हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आणि विनोदी शैलीमध्ये हा पाठ वाचकांपुढे ठेवलेला आहे. विनोदी शैली मध्ये हा पाठ मांडत असतानाच एखाद्या भाषेची जाण असणे किती गरजेचे आहे. हे देखील लेखिका वारंवार अधोरेखित करत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मराठी भाषेमध्ये एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो.ही एक मराठी भाषेची खासीयत आहे. मराठीतील वाक्प्रचार ही मराठी भाषेची स्वतःची अशी खास शैली आहे. जर समजा आपण एखाद्या क्रियापद वापरत असताना चुकीचे क्रियापद वापरले गेले तर कशा पद्धतीने अर्थाची गफलत होटे हे देखील लेखिका उदहरणांच्या माध्यमातून सांगतात.

 सर्वात शेवटी नि महत्वाचे म्हणजे आपण आपल्या मराठी भाषेचे महत्त्व आपण  स्वतः जप्त असताना  असताना उगीचच इतर भाषांमधील शब्द आपल्या वापरात  आणू नयेत. यापुढे जाऊन नीलिमा गुंडी म्हणतात ज्या शब्दांना पर्यायच नाही असे शब्द वापरणे योग्य आहे याला माझा विरोध नाही.परंतु गरज नसताना इंग्रजी शब्दांचा हव्यास त्यांना मान्य नाही. त्याच बरोबर व्युत्पती कोशामुळे शब्दांचा अर्थ कशा पद्धतीने आपल्याला समजत जातात हे देखील या पाठा मधून सांगितले आहे.

अशाप्रकारे बोलतो मराठी हा पाठ म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी आवड निर्माण करणे, भाषेची जाण वाढवणे या दृष्टिकोनातून bolto marathi हा पाठ अभ्यासक्रमात देण्यात आलेला आहे.

बोलतो मराठी स्वाध्याय पाठ सार 

प्रश्न किंवा कृतींची उत्तरे देत असताना पुस्तकातील प्रश्न क्रमांक टाकलेले आहेत परंतु पुस्तकामध्ये दिल्या गेलेल्या आकृत्या इथे दिल्या गेलेल्या नाहीत तरी विद्यार्थ्यांनी आकृत्या आपल्या वहीमध्ये काढून ठेवायच्या आहेत. चला तर मग बोलतो मराठी या स्वाध्याय मराठी संस्थेच्या माध्यमातून सुरुवात करुया

 

प्रश्न1. बोलतो मराठी आकृती वरील प्रश्न 

अ. भाषेचा वापर करत असताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी उपाय 

– शब्दकोश वापरला पाहिजे.

– क्रियापदाचा वापर करत असताना ना मला योग्य तो प्रत्यय लावणे

आ. मराठी भाषेची श्रीमंती marathi bhashechi shrimanti 

– मराठी दंगाचे शब्दप्रयोग

– एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा भिन्न अर्थ 

प्रश्न 2. शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा 

उत्तर 1. भाषा वापरताना होणाऱ्या चुका कळतात

        2. शब्दांचे मूळ समजते

        3. शब्द कायमस्वरूपी लक्षात राहतो

         4. शब्दांचा साठा वाढण्यास मदत होते

         5. भाषेतील गमती जमती समजतात

प्रश्न 3. चौकटी पूर्ण करा 

1. मराठी भाषेची खास शैली  –  वाक्प्रचार

2. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा – नदीसारखी प्रवाही/ हवा/ आई

3. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन – शब्दकोश

 

प्रश्न 4. गटात न बसणारा शब्द ओळखा.

1. ऐट,डौल, रुबाब,चैन –   चैन

2.कपाळ,हस्त, ललाट,भाल  – हस्त

3. विनोद नवल आश्चर्य विस्मय   – विनोद

4. संपत्ती ,संपदा,कांता, दौलत   –  कांता 

5. प्रज्ञा ,नामांकित ,प्रसिद्ध ,प्रख्यात   – कांता

 

प्रश्न 5. खाली दिलेल्या अनेक वचने नामांचे एक वतीने रूप घेऊन प्रत्येकी एक वाक्य बनवा. 

1.रस्ते – रस्ता 

माझ्या घराकडे जाणारा रस्ता छोटा आहे.

2. वेळा – वेळ

आता माझी अभ्यास करण्याची वेळ झाली होती.

3. भिंती  –   भिंत

आमच्या घराची भिंत मजबूत आहे.

4. विहीर   – विहीर

आमच्या मळ्यातील विहीर खूप खोल आहे

5. घड्याळे   –  घड्याळ

6. माणसे  –  माणूस 

आजकाल सज्जन माणूस कुठे दिसत नाही.

प्रश्न 6. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 

1. पसरवलेली खोटी बातमी   – अफवा

2.ज्याला मरण नाही असा तो –   अमर

3. समाजाची सेवा करणारा  –    समाजसेवक 

4. संपादन करणारा – संपादक
 
 

प्रश्न 7.बोलतो मराठी स्वमत प्रश्न 

 

1.गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या नीलिमा गुंडी यांच मत उदाहरण देऊन  थोडक्यात लिहा. 

बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका डॉक्टर नेहमी आणि या पाठांमध्ये त्यांनी आपल्या मराठी भाषे ची श्रीमंती आपल्या पुढे विनोदी शैली मध्ये वर्णन केलेले आहे आपण कधी कधी इतर किंवा परकीय भाषांमध्ये शब्द वापरतो त्याबाबत लेखिका नीलिमा गुंडी काय म्हणतात ते थोडक्यात पाहूया.

लेखिका नीलिमा गुंडी यांच्या मते आपण आपली भाषा बोलत असताना कधी कधी परकीय भाषांमधील देखील शब्दप्रयोग वापरतो उदाहरणार्थ केक या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द शोधत बसण्यापेक्षा केक शब्द वापरणे योग्य आहे परंतु कधीकधी मराठी भाषेतील शब्द असताना देखील उगीच परकीय भाषेचा अभ्यास म्हणून शब्द वापरणे लेखिकेला मान्य नाही जसे की थँक्स हा शब्द वापरण्याऐवजी आपण मराठी भाषेतील उत्कृष्ट असा धन्यवाद शब्द वापरायला हवा बरेचदा आपण पाहतो की अनेक व्यक्ती भाषा बोलत असताना मराठी हिंदी इंग्रजी अशी कॉकटेल भाषा वापरतात परंतु लेखिकेच्या मते गरज असेल किंवा एखाद्या शब्दाला आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये जर समानार्थी शब्द मिळत नसेल तरच इंग्रजी शब्दांचा वापर करावा इथे कुठेही लेखिका परकीय भाषेतील शब्दांवर आक्षेप घेताना दिसत नाही परंतु विनाकारण परकीय भाषेतील शब्द वापरण्याचा अट्टहास मात्र सोडावा अशीच भूमिका त्यांची दिसते

अशाप्रकारे गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नयेत असे मला वाटते कारण आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेतच आपल्याला अस्खलित बोलता यावे आणि त्या भाषेचा आपल्याला स्वाभिमान अभिमान असायला हवा आणि तोच वाढण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमांमध्ये नीलिमा गुंडी यांचा बोलतो मराठी पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे असे मला वाटते.

2.लेखिका नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा

बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडे आहेत आणि त्यांनी आपल्या बोलतो मराठी या पाठांमध्ये मराठी भाषेचा सन्मान किंवा मराठी भाषेमध्ये असणाऱ्या जमेच्या बाजू अगदी विनोदाच्या शैलीमध्ये मांडलेले आहेत

मराठी भाषेचा सन्मान किंवा गौरव करत असताना मराठी भाषा ही श्रीमंत भाषा आहे असे लेखिका सांगतात मराठी भाषेमध्ये विविध ढंगांचे शब्दप्रयोग वापरले जातात हे देखील मराठी भाषेचे वैभवच आहे कधीकधी एका शब्दाचे भिन्न अर्थ निघतात यातून देखील भाषेला एक वेगळीच नजाकत मिळालेले आहे असे आपल्याला दिसते उदाहरण द्यायचे झाले तर माननीय क्रियापदाला उड्या मारणे माशा मारणे गप्पा मारणे टिचक्या मारणे यात मारणे हे आपण जरी समान असले तरी प्रत्येक ठिकाणी या शब्दाचा अर्थ हा वेगळा आहे त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये विविध प्रकारचे वाक्प्रचार मनी अलंकार यांचादेखील उपयोग केला जातो यामुळे मराठी भाषेला एक वेगळेच स्थान प्राप्त झाले आहे

लेखिका नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचा सन्मान संपूर्ण पाठभर केलेला आहे आणि यातून आपल्या मातृभाषेविषयी प्रेम जागृत करण्याचे काम त्याचबरोबर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे अप्रत्यक्षरीत्या काम केलेले आहे म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषा आवर्जून वापरायला हवी तरच आपल्याला नीलिमा गुंडी यांचा भावार्थ आपल्या मनापर्यंत पोचलेला आहे असे म्हणावे लागेल

प्रश्न 8 पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काही अति महत्त्वाचे प्रश्न

1. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गाण्याचे गायक – सुरेश भट

2. भाषेवर प्रेम करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात

1. आपल्या भाषेतील सन्मानाच्या बाबी जाणून घ्याव्यात

2. आणि आपण जी भाषा बोलतो त्या भाषेचा आपल्याला स्वाभिमान हवा

अशाप्रकारे बोलतो मराठी इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील किंवा कुमारभारती पुस्तकातील बोलतो मराठी या पाठाचा सार त्याचबरोबर स्वाध्याय आणि प्रश्नांची उत्तरे येत असताना मराठी सेल्फ स्टडी च्या माध्यमातून समृद्ध अशी भाषा रचना युवा भाषेतील बारकावे कशा पद्धतीने जाणून घ्यावे ते सांगण्याचा प्रयत्न केला उतरली तर त्याला सोबत प्रश्नांची उत्तरे ही नमूद केलले विद्यार्थ्यांनी लफडे करत असताना ती स्वतःच्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचे वाचन देखील मन लावून करावे जेणेकरून बोलतो मराठी या पाठावरील प्रश्नांची उत्तरे सोडवत असताना किंवा स्वाध्याय येत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment