आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय सार प्रश्न | Aaji Kutumbacah Aagal Swadhyay Sar Prashn

आपल्याला बोर्ड परीक्षेत 16 गुणांसाठी  पुस्तकातील 2 para येत असतात. याची छान तयारी करण्यासाठी आपण या धड्याखालील स्वाध्याय नीट सोडवले पाहिजेत. म्हणूनच आजच्या लेखात आपण आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय,सार व स्वमत  याचा अभ्यास करणार  आहोत. 

आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय सार व प्रश्न
आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय सार व प्रश्न

 

Contents hide
1 आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय सार आणि प्रश्न उत्तरे

आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय सार आणि प्रश्न उत्तरे 

मराठी सेल्फ स्टडी या व्यासपीठावरून आपण विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीची म्हणजेच एखाद्या घटकाचा अभ्यास कसा करायचा? एखादा वाचलेला भाग कसा लक्षात ठेवायचा? किंवा स्वतः स्वतःच्या अभ्यासाचे कसे नियोजन करायचे?या सर्वांचा विचार मराठी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून करत आहोत. तर आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील म्हणजेच कुमारभारती या पुस्तकातील तिसरा धडा किंवा तिसरा पाठ आजी कुटुंबाचा आगळ आज  अभ्यासणार आहोत.तो अभ्यासत असताना आपण आजी कुटुंबाचा आगळ यावरील स्वाध्याय म्हणजेच या पाठाखालील प्रश्नोत्तरे आणि अलीकडे नव्याने प्रश्नोत्तरे आणि स्वाध्याय हा शब्द जाऊन एक नवा शब्दप्रयोग वापरला जातो तो म्हणजे कृती. म्हणजेच काय तर आज आपण आजच्या लेखातून आजी कुटुंबाच आगळ कृती, स्वाध्याय, प्रश्नोत्तरे किंवा आजी कुटुंबाचा आगळ यामधील स्वमत या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. हे सगळे शब्द ऐकायला जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा अर्थ हा मात्र एकच आहे.हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या.चला तर मग आजी कुटुंबाच आगळ या पाठावरील कृती पाहण्या अगोदर आपण या पाठाचा सारांश किंवा नेमके सार आहे ते पाहूया.

 आजी कुटुंबाच आगळ सार सारांश 

आजी कुटुंबाच आगळ हा पाठ महेंद्र कदम यांच्या आगळ् या कादंबरीतून घेण्यात आलेला आहे. या पाठाच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला एका आजीचे  व्यक्तिमत्व रेखाटलेले आहे. आजीबरोबर  खेडेगावातील जीवन आणि एकत्र कुटुंब पद्धती कशा पद्धतीने फायद्याची होती? हेच सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. लेखकाने वर्णन केलेली आजी आपल्या घरामध्ये भेदभाव होऊ नये यासाठी कायम लक्ष असते. घरामध्ये असलेल्या सुनांमध्ये वादावादी होऊ नये, यासाठी देखील आजी लक्ष देऊन असते.त्याचबरोबर सर्व सुनांना सर्व कामे आलेच पाहिजेत यासाठी देखील तिचा आग्रह आहे. आणि घरातील नातवंडे यांच्यावरती चांगले संस्कार करण्याचे काम त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी त्यांना कायम खाऊ पिऊ घालणारी आजी.लेखकाने या पाठाच्या माध्यमातून वर्णन केलेले आहे.
या पाठाच्या माध्यमातून अलीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे आणि कुठेतरी हीच खंत किंवा ही परिस्थिती बदलली पाहिजे.म्हणूनच एक मुलांवर छान संस्कार व्हावा यासाठी हा पाठ निवडण्यात आला आहे. घरातील वयोवृद्ध लोकांचे महत्त्व ,अप्रत्यक्षरीत्या समजावण्याचा प्रयत्न आजीच्या उदाहरणातून लेखक महेंद्र कदम यांनी अतिशय समर्पक शब्दांमध्ये केलेला आहे. ज्या पद्धतीने आगळ म्हणजे वाड्याचे संरक्षण करणारे भले मोठे लाकूड अगदी त्याच पद्धतीने आजी देखील आपल्या कुटुंबाचे सुरक्षा कवच आहे म्हणून या पाठाला दिलेल्या आजी कुटुंबाच आगळ हे शीर्षक देखील अतिशय समर्पक आहे.तर विद्यार्थ्यांनी आजी कुटुंबाच आगळ हा सारांश किंवा सार लक्षात ठेवल्यास या पाठावर आलेले प्रश्न उत्तरे तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता आजी कुटुंबाच आगळ यावरील प्रश्न देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता.आणि यालाच सेल्फ स्टडी म्हणायचे आहे.
 
 

आजी कुटुंबाच आगळ कृती 

पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये कोणताही पाठ असो की कविता  दिल्यानंतर त्याखाली प्रश्न उत्तरे असायची परंतु आता विद्यार्थ्यांच्या आकलनाला विचारांना चालना मिळावी यासाठी कृतीयुक्त प्रश्नांचा समावेश केलेला आहे. या प्रश्नांना त्यांना कृती हा शब्द वापरला आहे. म्हणूनच आजी कुटुंबाच आगळ प्रश्नोत्तरे किंवा आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय असे शब्द न येता या नव्या प्रणालीमध्ये आजी कुटुंबाच आगळ कृती किंवा आजी कुटुंबाचा आगळ स्वमत प्रश्न अशी प्रश्नांची रचना झालेले आपल्याला दिसते. या रचने मागे एकच उदेश आहे तो असा  की विद्यार्थ्यांना सर्व घटकाचे आकलन व्हावे

आजी कुटुंबाच आगळ पाठातील कृती / प्रश्नोत्तरे स्वाध्याय 

 

1. आजी कुटुंबाच आगळ पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा

( विद्यार्थ्यांनी आकृत्या आपल्या वहीमध्ये काढाव्यात आहेत इथे फक्त प्रश्न आणि उत्तरे असे स्वरूप आहे हे लक्षात घ्यावे)

अ आजी कुटुंबाचा आगळ पाठात आलेली बैठक खेळ

उत्तर  *चुळचुळ मुंगळा

         *चिंचोके

         *गजगे

          *खापराच्या भिंगऱ्या

          *जिबल्या

 

आ. आजी कुटुंबाच आगळ या  पाठातील मैदानी खेळ 

उत्तर    *गोट्या 

           * विटी दांडू

           * सूर पारंब्या

           *भोवरे

          *कूरीचा  डाव

 

 

2. खालील शब्दांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा

1. आजीचे दिसणे 

आजी कुटुंबाच आगळ या पाठामध्ये लेखक महेंद्र कदम यांनी एका आजीचे चित्र रेखाटलेले आहे.  हे चित्र रेखाटत असताना ती आजी दिसायला कशी होती? याबाबत लेखक सांगतात की आजीची उंची ही साडेपाच फूट होती. आजी ही रंगाने गोरी होती परंतु वयस्कर झाल्यामुळे तिच्या त्वचेचा रंग जरा काळपट झाला होता.आजीचे  इतके होऊन देखील आजीचे दात हे शाबूत होते. डोक्यामध्ये एकही केस काळा नव्हता याचा अर्थ आजीच्या डोक्याचे केस हे सर्व पांढरे झाले होते.वयस्कर माणसं कमरेमध्ये वागतात किंवा वाकत चालत असतात. परंतु ही आजी अजूनही ताट कण्याने चालत होती. 

आजी ही दिसण्याच्या बाबतीत टापटीप होती तिला सवाचतेची आवड होती.महेंद्र कदम यांनी आजीच्या दिसण्याविषयी केलेले वर्णन अप्रतिम आहे.

आजीचे राहणीमान 

लेखक महेंद्र कदम यांनी आजी कुटुंबाच आगळ या पाठातून जी आजी वाचकांपुढे वर्णन केलेले आहे. 

  आजीचे राहणीमान हे खेडेगावातील इतर स्त्रियांप्रमाणेच नसून जरा वेगळे आहे. आजी ही इरकली लुगडे नेसणारी आहे. साड्यांचा विचार केला तर साड्यांचे प्रकारातील इरकली लुगड म्हणजे सदी  हा प्रकार  थोडा महागडाच असतो यातून आजीच्या आवडीनिवडी कळतात. यावरून आजीला रुबाबदार ,टापटीप राहिला आवडत होते. आजी हिरव्या आणि लाल रंगाच्या साड्या म्हणजे इरकली लूकडी ती वापरत असे . पती हयात नसल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी तिच्यावर तीच आहे. आपल्या कपाळावरचा गोंधळ दिसू नये म्हणून ती कपाळाला बुक्का लावते. 

या पाठातील आजीचे राहणीमान हे खेडेगावात असून ,जास्त वय असून आजी हौशी स्वभावाची आहे म्हणजेच आजीचे राहणीमान हे अतिशय चांगल्या दर्जाचे आहे.

3. आजीची शिस्त  

महेंद्र कदम यांनी आपल्या आजी कुटुंबाच आगळ या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर एक आजीचे  पात्र रेखाटले आहे.

 आजी अतिशय शिस्तीला महत्त्व देणारी आहे. आजीची शिस्तही अतिशय कडक  शिस्त आहे. घरामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही असा आजीचा स्वभाव आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सुनांना घरातील सर्व कामे आले पाहिजेत अशी भूमिका आजी घेताना दिसते. ती आपल्या सुनांना रोटेशन प्रमाणे म्हणजेच आलटून-पालटून कामे करण्याची संधी देते. जेणेकरून भेदभाव पण होणार नाही आणि सर्वांना सर्व कामा आली पाहिजेत. हे देखील यामागे आजीचे नियोजन दिसते. नातवंडांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये यासाठी कपिली गायीचे दूध पिण्यासाठी मुलांना गोट्यात जावे लागे.कारण का तर घरात दूध आल्यानंतर सुना स्वतःच्या मुलाला जास्त आणि जावेच्या मुलाला कमी देऊ शकतात थोडक्यात काय तर आजी ही अतिशय कदक शिस्तीची होती.  वेळप्रसंगी मुलांनी देखील एखादे काम केले नाही तर त्यांच्यावर देखील आजी रागावताना दिसते. सुनेने भाकरी करपवली तरी रागावते म्हणजे केवळ फक्त ती सुनानाच बोलते असे नाही तर संपूर्ण परिवाराला शिस्त लागली पाहिजे अशी आजीची भूमिका आहे

अशाप्रकारे आजीचा शिस्तप्रिय स्वभाव महेंद्र कदम यांनी अतिशय सुंदर रेखाटलेला आहे. 

 

3 योग्य जोड्या जुळवा.

(अ ब गट असे न देता उत्तरे दिली आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे या जोड्या विरुद्धार्थी शब्दाच्या शब्दाच्या आहेत हे समजून घ्या)

1. आळस               उत्साह

2. आदर            अनादर

3. आस्था           अनास्था

4. आपुलकी         दुरावा

अशा पद्धतीने आजी कुटुंबाच आगळ प्रश्नोत्तरामध्ये परीक्षेमध्ये अशा जोड्या देखील येऊ शकतात. 

 

4. वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित ( म्हणजेच अंडरलाईन करणे ) करा. 

1. सहल जात असताना शिस्तभंग नको व्हावा  याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

2. दोन व्यक्ती मधील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणेअयोग्यच.

3. कधी कधी कारण नस ताना  हुकमत गाजव णाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उ तरतात. 

 

5. विशेषणांचा वापर करून विधाने पूर्ण करून दिलेले आहेत.

1. समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.

2. खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजेश्रीचा आनंद द्विगुणीत झाला.

3. विजय अजय पेक्षा अधिक चपळ आहे. 

4 रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात.

5. मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.

6. राजू कबड्डी छान खेळत होता परंतु त्याचा पाया अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

 

6. शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहा.

या प्रश्नात समानार्थ न लिहिता या शब्दाचे कोणते वेगळे दोन अर्थ होतात हे लिहिणे अपेक्षित आहे. 

      1. वर – नवरा ,वरची दिशा

2. ग्रह – समज ,तारा

                         3. काठ  –  किनारा ,लुगड्याची किनार

 

7. आजी कुटुंबाच आगळ स्वमत प्रश्न 

स्वमत  प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. स्वमत प्रश्नाची तयारी जर आपण दररोज केली तर आपल्याल हा भाग अतिशय सोपा जाऊ शकतो. 

1. आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं याचा जो तुम्हाला समजला असेल तो अर्थ लिहा.

लेखक महेंद्र कदम यांनी आजी कुटुंबाच आगळ या पाठामधून खेडेगावातील जीवन रेखाटलेले आहे. ते रेखाटत असताना लेखकाने एका आजीविषयी माहिती  सांगितलेले आहे. 

आमची डाळ म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं याचा अर्थ असा की दुपारच्या वेळी आजीच्या ढाळजेत  मध्ये गल्ली मधल्या बायका जमायच्या.त्या एकत्र मिळून एकमेकींची कामे करायच्या.कामे करत असताना गावांमध्ये घडणाऱ्या घटना किंवा काही गुप्त खबरी असतील त्या  एकमेकीना सांगायच्या. बोलता बोलता जी काही रहस्य सांगितले गेली. त्यावर आजी आणि त्या इतर स्त्रिया चर्चा करायच्या व समजले की अमुक  ही बातमी तंतोतंत खरी आहे. तर ती बातमी गावामध्ये इतरांना सांगितले जायची. एक प्रकारे एखाद्या वर्तमानपत्राचा प्रमुख म्हणजे संपादक त्याच्या पत्रकारांनी आणलेल्या बातम्या सरळ सरळ न छापता  त्या संदर्भात थोडीशी चौकशी विचारपूस किंवा शहानिशा करूनच त्या बातम्या छापत असतो. अगदी त्याच पद्धतीने डाळजेमध्ये ज्या काही गोष्टींवर चर्चा होत होती त्या गोष्टी कितपत खरे आहेत हा विचार करूनच त्या बातम्या पुढे पसरत होत्या.

पूर्वीच्या काळी टेलिफोन मोबाईल यांची सुविधा नव्हती तर कशा पद्धतीने खेडेगावातील बातम्या एकमेकांपर्यंत जात असतील तर अशा चर्चेच्या रूपाने ते इतरांना कळत असायच्या म्हणूनच आमची रास म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं यामधून शहानिशा केल्याशिवाय बातम्या जात नव्हत्या हे लेखकाला ते सांगायचे आहे.

 

2 . तुलना किंवा साम्य लिहा.   आगळ वाड्याचे कवच आजी कुटुंबाच 

म्हणजेच काय तर आगळ आणि आजी यामधील साम्य किंवा दोघांची तुलना करा. 

लेखक महेंद्र कदम यांनी आजी कुटुंबाच आगळ या पाठांमध्ये लेखकाने आजी आणि आगळ यांची तुलना केलेली आहे.किंवा त्या दोघांमध्ये  काही गोष्टींमध्ये त्यांना साम्य दिसत आहे. 

आगळ ही खूप मोठ्या वजनाची आहे. ही आगळ रात्रीच्या वेळी ,दुपारच्या वेळी वाड्याचे संरक्षण करत असते.एकदा जर का वाड्याच्या  दरवाजाच्या आतल्या बाजूने आगळ म्हणजेच मोठे लाकूड म्हणजेच अडथळा लावला तर वाड्याचे संपूर्ण संरक्षण या आगळीमुळे होत असते. रात्रीच्या वेळी चोऱ्या माऱ्या होण्याची शक्यता असते आणि त्याला अटकाव ही आगळ घालण्याचे काम करत होती. 

एक प्रकारे आगळ ही कुटुंबाचे संरक्षण करत होती अगदी त्याच पद्धतीने आजी देखील आपल्या कुटुंबाचा संरक्षणच करत होती. म्हणूनच ती डोळ्यात तेल घालून आपल्या सुनांकडे लक्ष देत होती. आपल्या नातवंडांनी गोठ्यातच दूध प्यावे असा आग्रह धरत होती. आपल्या सुनांना सर्व कामे आले पाहिजेत म्हणून त्यांचा रोटेशन प्रमाणे वेळापत्रक बनवत होती. आणि घरातील करती पुरुष मंडळी जरी कुठे चुकली तर त्यांना देखील रागावण्याचे काम आजी करत होती करत होती 

थोडक्यात काय तर ज्या पद्धतीने आगळ वाड्याचे  संरक्षण करत होती त्या पद्धतीनेच कुटुंब एकत्र राहिला पाहिजे कोणत्या प्रकारचा भेदभाव होता कामा नये यासाठी त्या कुटुंबाचे संरक्षण कवच ही आजी होती. आगळ ज्या पद्धतीने वाड्याचे संरक्षण करत होती. त्या पद्धतीने आजी देखील आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होती. असे साम्य आगळ व आजीत आहे. 

 

3. एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे/ म्हणजेच एकत्र कुटुंब पद्धती बाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. 

आजी कुटुंबाच आगळ या पाठाच्या निमित्ताने महेंद्र कदम यांनी खेडेगावातील जीवन चित्रण अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे या पाठांमध्ये आजीने आपला परिवार एकत्र रहावा टिकावा  यासाठी कायमच आग्रह धरलेला आहे. 

एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कामांची विभागणी केली जाते घरातील व्यक्ती एकमेकांवरती लक्ष देत असल्यामुळे साहजिकच वागण्या बोलण्यामध्ये नम्रता येते. सहनशीलता ,सहकार्य या गुणांचा विकास देखील एकत्र कुटुंब पद्धतीमुळे होतो.एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील कारभारी हा एकच असल्यामुळे सर्व व्यवहारांमध्ये सुसूत्रता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुटुंबाची प्रगती अतिशय वेगाने होते परंतु असे असले तरी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये स्वातंत्र्यावर काही एक गदा येण्याचे काम हे होताना दिसते अलीकडे मात्र अशी एक एकत्र कुटुंब पद्धती दिसत नाही.त्या लहान मुलांना आजीचे प्रेम मिळत नाही.व्यक्ती विभक्त कुटुंब पद्धतीचे समर्थन करताना दिसत आहे तरी या पाठामधून  एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व सांगितले आहे. 

अशा पद्धतीने आज आजी कुटुंबाच आगळ स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे नि आता नव्या पद्धतीनुसार आजी कुटुंबाच आगळ वरील कृती व आजी कुटुंबाच आगळ स्वमत प्रश्न पहिले आहेत. दहावी मराठी धडा तिसरा यावरील प्रश्नोत्तरे तुम्ही आता चांगल्या पद्धतीने सोईवू शकता. आजी कुटुंबाच आगळ हा पाठ समजून घेण्यासाठी त्याचा सारांश देखील वाचून काढा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयांसाह . धन्यवाद !  

 

 

 

 

 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment