मी फळा बोलतोय मराठी निबंध |mi phala boltoy esaay in marathi 2023

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय जीवनात आपण निबंध लेखन करत असतो. या निबंध लेखनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे निबंध लिहायला शिकलेलो आहोत .आज आपण आत्मकथन हा निबंध बघणार आहोत आत्मकथन ;म्हणजेच विचारलेल्या विषयावर तो बोलतोय हे सांगणे म्हणजे आत्मकथा किंवा मनोगत असेही म्हटले जाते; तर आपण आज फळ्याचे आत्मकथन पाहणार आहोत .मी फळा बोलतोय मराठी निबंध (mi phala boltoy essay in marathi) या शीर्षकावर निबंध लिहा.autobiography of a blackboard in marathi essay लिहित असताना तो घटक आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करावी लागते.

आमचा खेळण्याचा तास असल्यामुळे मी वर्गात एकटाच बसलो होतो; कारण की पावसात भिजल्यामुळे ताप आलेला होता आणि म्हणून मला खेळण्याची उत्सुकता नसल्यामुळे मी एकटाच वर्गात बसून राहिलो होतो. सरांनी दिलेले काही मराठीचे निबंध लेखन लिहीत असतानाच मला अचानक आवाज आला “ए बाळा ! म्हणून मला हाक कोणीतरी हाक मारली मी इकडे तिकडे पाहिले पण कोणीच दिसत नसल्याने पुन्हा मला आवाज आला “अरे बाळा!” मला ओळखले नाही ;मी थोडासा घाबरलोच इकडे तिकडे पाहिले आणि एका कोपऱ्यात उभा असलेला जुना फळा मला दिसला आणि तोच मला बोलू लागला .

autobiography of a blackboard in marathi essay

बाळा ! मला एका चांगल्या फर्निचरच्या दुकानांमध्ये चांगल्या टिकाऊ लाकडाच्या फळ्या तयार करून त्यावर रंगीबेरंगी असे नक्षीकाम करून आणि त्यावर काळा कलर देऊन मला एक चांगला फळा बनवले .

मी खूप आनंदी होतो मला एका कुठेतरी शाळेत जावं लागेल आणि माझ्या वर अक्षर उमटून मी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करणार म्हणून मी खूप आनंदित होतो .या उत्सुकतेमुळेच असेल माझी इच्छा पूर्ण झाली .मी तुमच्या शाळेत येऊन दाखल झालो. मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी माझे चांगल्या रीतीने स्वागत केले.

भिंतीला अडकवून मला एक खडूने त्याच्यावर स्वागत सुविचार लिहून केले .मी खूप आनंदी होतो , पहिल्यांदाच तुमच्या वर्गात आलो होतो .तुमचे फळ्याकडे पाहून उत्सुकतेचे चेहरे पाहून मला खूप आनंद झाला होता. तुम्हीही माझ्याकडे नवीन फळा म्हणून खूप आनंदाने बघू लागला होता .

मला वैताग यायचा तो गणिताच्या तासाला गणिताचा तासाला मला उसंतच भेटत नव्हता .

मी फळा बोलतोय मराठी निबंध

प्रत्येक शिक्षकाचा जसजसा तास होऊ लागला तस तसे मीही सगळ्या विषयाचा अभ्यास करू लागलो .कोणत्या विषयाचा तास होणार कोणता विषय बोअर होणार .कोणता विषय माझ्यावर चांगल्या रीतीने लिहून तुम्हाला ज्ञान भेटणार हेही मला सगळंच वेळापत्रकाप्रमाणे माहीत असायचे. कधीकधी खूप कंटाळा येतो ,भाषेचे शिक्षक तर माझा केवळ विषयाचे नाव आणि धड्याचे नाव लिहिण्यासाठीच उपयोग करत होते .नंतर मात्र एकही शब्द लिहीत नसायचे .मला त्यावेळेस खूप राग यायचा काहीतरी लिहावंसं वाटायचं .मराठीच्या धड्यामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी मी ऐकून बसायचो.

मला वाटायचं कधीतरी हे शिक्षक माझ्यावर हे शब्द लिहितील संतांचा अभंग, बालकवितां सारख्या कविता ,पोवाडे असे कितीतरी माझ्यावर लिहावे असे मला वाटत होते ;पण कसले काय मी नुसता बघतच राहायचो. तुम्हीही मात्र बोअर होऊन जायचा .

एक गणित झालं की ,लगेच दुसरे ,ते ही झाली की तिसरे, माझ्यावर खडू जोरजोरात आपटून आपटून वेदना होतात .का तेही पाहत नव्हते.

मी फळा बोलतोय मराठी निबंध

काही झालं तरी आपले रडगाणे मांडायचे नाही आपण व्यवस्थित राहिलो तर मुलांनाही चांगल्या पद्धतीने शिकता येईल म्हणून मीच आपला दणकटपणा दाखवत राहिलो.. मुलेही मला दुपारच्या वेळी खडू घेऊन माझ्यावर काही ना काही लिहीत असायचे .एखाद्या शिक्षकाचे नाव लिहायचे तर कधी एखाद्या मुलाचे नाव लिहून त्याच्यापुढे काहीतरी चित्र विचित्र असे चित्र काढून त्याला रागवायला भाग पाडले जात होते . तोही रागावून माझ्याकडे येऊन त्याच्याबद्दल काहीतरी देत होता असे .

mi phala boltoy esaay in marathi middle point

जोपर्यंत तुम्ही शाळेत असायचा त्यावेळेस मला हे चांगलं आनंदाने जायचं कसा दिवस जात होता. तेच कळत नव्हतं तर जसजशी संध्याकाळ झाली की ;तुमचा घरी जाण्याचा उत्साह दांडगा असायचा ;पण मला मात्र तुम्हाला सोडून एकटे राहावे लागणार यामुळे दुःख व्हायचे. रात्रभर मी एकटाच राहायचो कधी सकाळ होते कधी तुमची भेट होते त्यामुळे मी वाट पाहत राहायचो .

रविवारी तर सगळा दिवस माझा निरागसमध्येच जात असायचा. बाहेरच्या गाड्यांचा हॉर्न वाजवल्यामुळे कानावर पडत होता. पण तरीही मला तुम्ही आठवत असायचा .शिक्षक आठवत असायचे .

वर्गातील गोंधळ आठवायचा कोणी कोणाला कशा पद्धतीने चिडवत असायचे हेही समजायचे. तुम्ही शिक्षकांचा मार खाताना मला दुःख व्हायचे. असं वाटायचं की तुम्ही काही चूक नसताना विनाकारण मार खात असायचा . ज्याची चूक असताना तो मात्र गुपचूप शांतपणे बसायचा मात्र खोड्या न करता तुम्हाला मार बसायचा . मला असं वाटायचं की शिक्षकाला सांगावं की याची चूक आहे ,त्याने काहीच केलं नाही हे सगळं मला बघून थोडसं आनंद पण वाटायचा आणि दुःखही वाटत होते .पण एक गोष्ट मला खूप चांगली वाटते की तुमच्यामध्ये या सगळ्या वर्गात ज्ञान देण्याचे काम जे माझ्याकडून तुम्हाला भेटत होते शिकण्याचा जे काम आहे ते उत्कृष्टपणे माझ्यावर लिहून तुम्हीही चांगला गीता गिरवत राहिला .

मी एक चांगला तुमचा मित्र बनलो होतो .हे तुम्हाला कळत नव्हते ,पण मला मात्र तुमची खूप सवय लागली होती. हळूहळू माझ्या अंगाचे छिलके निघत गेले ,माझ्यावर अक्षरही उमटत नसायचे,म्हणून शिक्षक माझ्यावर वैतागायचे. बदलायचा आहे आता चांगला घेऊन येऊ आणि तुम्हालाही त्याचा आनंद वाटायचा पण मी मनोमन रडत बसायचो.

अरे! मी जुना झालो म्हणून काय झालं माझ्यावर अजून एक कलर दिला की मी चांगला होईल हे मला सांगता येत नव्हतं ,तुमचे शिक्षकही समजत नव्हते.तुमच्या सरांचे बोलणे ऐकून मला मात्र वाईट वाटायचे आणि तसे झालेही .

एक दिवस नवीन फळा आला आणि मला लगेच सकाळच्या पहिल्या तासाच्या आत काढून एका बाजूला ठेवले होते . मी नवीन फळ्याकडे पाहत एकटाच राहिलो. तुमची किलबिल तुमचा उत्साह ,तसाच राहिला पण कोणी तुम्हाला ज्ञान दिले आहे, माझ्यावर तुम्ही शिकला आहात शिक्षकांनी माझ्यावर छडी आपटून खडूचे फटके जोरात जोरात देऊन कशाही रेषाओरबडत होते. माझ्यावर कितीतरी आघात केले तरी मी ते सहन करत होतो. नवीन फळा आला की मला सगळे विसरले.

खरं सांगू ! हे जगच असा आहे काम झालं की हो बाजूला म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले. एका कोपऱ्यात मी गेले महिनाभर पडून आहे. माझ्यावर वर्गातील धूळ बसू लागली आहे .माझ्यावर लिहिलेला सुविचार अजून तसाच आहे; पण ह्या सुविचाराकडे कोणाचेच लक्ष जात नाही .जुना आहे म्हणून माझ्याच बाजूला मुलांनी कागदाचे गोळे टाकलेले हे तसेच पडून आहेत; पण कोणीही माझ्यापासून हे कागदाचे गोळे उचलत नाहीत .

वर्गात असतानाच जो गोंगाट होता तो आता मला ऐकायला कमी कमी येऊ लागले आहे. कारण माझ्या वर तेवढी धूळ बसली आहे ,की मला सुद्धा ह्या जगाचा लवकरच निरोप घ्यावा लागतो की काय अशीच अवस्था झाली आहे ,पण मला असंही अजून वाटते की माझ्यामध्ये अजूनही उत्साह चैतन्य आहे फक्त मला यातून बाहेर काढणे गरजेचे आहे .माझ्यावर अजूनही नक्षीकाम रंगकाम आणि थोडासा बदल केला तर मी अजूनही पहिल्यासारखाच ताजेतवाना राहून तुम्हाला ज्ञान देण्याचे काम करेल ;पण असं कोणी करत नाही म्हणून मला येथून बाहेर काढून कमीत कमी माझा उपयोग खालच्या पायरीच्या ठिकाणी स्वागतासाठी उभा करा .

माझी एवढीच विनंती आहे, मला अशा अडगळीत ठेवून कुठेतरी भंगारात देण्यापेक्षा माझा उपयोग गेटवर सगळ्यांना पाहण्यासाठी आणि स्वागतासाठी केला तर मग खूप आनंदी होईल आणि तुम्हाला येता जाता दररोज पाहील.अशी माझी इच्छा आहे .

तेवढ्यात अचानक शाळेची बेल झाली आणि मला फळ्याचे खूप वाईट वाटले आणि मी ते मुलं येण्याच्या अगोदरच फळा स्वच्छ केला आणि त्यावर सुंदर अक्षरांमध्ये शाळेचे नाव लिहून सुस्वागतम असे लिहून खाली गेटवर दोन मित्रांनी ठेवला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला .

आता आपण देखील फळ्याचे मनोगत /आत्मकथन हा निबंध छान लिहू शकता.

आमचे इतर अप्रतिम लेख

मी मुख्यमंत्री झालो तर ……

मी लोकशाही बोलते ……..

माझा आवडता ऋतु पावसाळा

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment