मी लोकशाही बोलतेय मराठी निबंध 2023 |marathi Democracy essay

मि लोकशाही बोलतेय मराठी निबंध आज आपण लेखन विभागातील एक घटक पाहणार आहोत. ज्याचे नाव आहे मि लोकशाही बोलतेय घटक म्हणजे आत्मकथनात्मक निबंध होय.या आत्मकथनात्मक निबंधाचा विषय आहे. मी लोकशाही बोलतेय ! हा विषय निवडण्याचे कारण म्हणजे केंद्र असो वा राज्यमध्ये ज्या घडामोडी अलीकडे जे घडत आहेत त्या घडामोडी कुठेतरी लोकशाहीला बाधा देणाऱ्या आहेत. यातून आपली लोकशाही कुठे तरी गैरमार्गाला जात आहे असे दिसत आहे, म्हणूनच हे सर्व चित्र पाहून लोकशाहीला काय वाटत असेल?या भूमिकेतून मी लोकशाही बोलतेय ! हा लोकशाही निबंध आज आपण Mi Lokshahi Boltey Marathi Esaay पाहणार आहोत.

मी लोकशाही बोलतेय !मराठी निबंध
मी लोकशाही बोलतेय मराठी निबंध
मि लोकशाही बोलतेय मराठी निबंध

मी लोकशाही बोलतेय! मराठी निबंध 2023

आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. शाळेत लवकर जाण्याची कटकट नाही. म्हणून सगळं कसं निवांत सुरू होते,पण अचानक मला आठवले की सरांनी आपल्याला एक निबंध लिहायला सांगितलाय.या विचारात असताना मी टीव्ही लावला. टीव्हीवरील बातम्या पाहिल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली बंडखोरी व त्यासंदर्भात बातम्या वाचून तर मला जसा काही वैताग आलाय.असं सर्व चित्र होतं. आणि मी रागांमध्ये टीव्ही बंद केला .व आपल्या लोकशाही विषयी विचार करू लागलो.

 मी विचार करताना मला अचानक आवाज आला. टीव्ही का बंद केला? मी विचारातच पडलो. माझ्या तर आजूबाजूला कोणीच नाही,मग माझ्याशी कोण बोलत आहे. इकडे तिकडे पाहिले तर मला एक अस्पष्ट अशी आकृती दिसू लागली. ती आकृती माझ्या समोर उभी होतीआता ती माझ्याशी बोलायला लागली. मला सांगत होती बाळा! घाबरू नको.मीच लोकशाही.आता तू टीव्ही बंद केला ना त्यामध्ये  जे दाखवले जात आहे,ना ते मला कदापि मान्य नाही. माझा जन्मच मुळी लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य या भूमिकेतून झालाय.आपल्या भारत देशाने तर माझा खूप आनंदाने स्वीकार केलाय.तुला माहिती आहे ना जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाचा गौरव केला जातो बरं! आणि याच भारत देशात अलीकडच्या काही दिवसांमध्ये लोकशाही आहे की नाही असं सर्व चित्र आहे.

 

मी आज माझ्याविषयी तुला संपूर्ण माहिती सांगणार आहे.तर माझा स्वीकार भारत देशामध्ये का केला गेला? तर कधी कोणावर अन्याय, अत्याचार होऊ नये. देशामध्ये समानता,मानवता,बंधुता,सहिष्णुता या मूल्यांची जपणूक व्हावी.म्हणून तर माझा स्वीकार केला गेला.आणि सुरुवातीचे काही दिवस झाले देखील तसेच. लोकशाहीने स्वीकारलेल्या राज्यघटनेने म्हणजे देश कसा चालवायचा ? या नियमानुसार सर्व कसं व्यवस्थित सुरु होते, पण आज जाईल तिकडे स्वार्थ आणि हो हा स्वार्थ लोकशाही देखील आला बरे! म्हणूनच ज्या विचारांच्या लोकांनी माझे समर्थन केलं. ज्या पक्षातून अमुक एक व्यक्ती उभा राहिला तो त्या विचारधारेने पुढे जाईल.आपली नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल. आपल्या देशाचे कल्याण करेल.म्हणून लोकांनी ज्या पुढार्‍यांना निवडून दिले अगदी तेच पुढारी आपला पक्ष सोडून दुसऱ्या कोणाशी तरी संधान साधत आहेत. .या सत्तेत मला काय मिळेल? यासाठी धडपडत आहेत. मी बोलले ना पूर्वी लोकशाहीमध्ये स्वार्थ नव्हता. ज्या लोकांना समाजकारण करायचे आहे. समाजसेवा करायची आहे. समाजाचे काहीतरी भले करायचे आहे. अशी माणसे स्वतःहून लोकशाहीमध्ये येत होती आणि इमानेइतबारे कारभार पाहत होती. पदावरून पायउतार झाल्यावर कधी त्यांच्या मनात स्वार्थ किंवा असूया आली नाही.

मि लोकशाही बोलतेय मराठी निबंध

आज कालचे राजकारणी  तू जर पाहिले एखाद-दुसरा पुढारी सोडा! तो स्वार्थाने आपला पक्ष सोडू शकतो.बंडखोरी करू शकतो.परंतु ज्या पक्षाच्या विरोधात आपण उभे होतो ते पक्षच आज शत्रू पक्षांशी मिलीभगत करून सरकार स्थापन करत आहेत. सत्तेत असलेले आपला पक्ष वाढावा म्हणून उमेदवार फोडत आहेत. इथे मला कोणत्याच पक्षाविषयी बोलायचं नाही बरं! नाहीतर तुम्ही म्हणाल मी लोकशाही तरी असे का बोलत आहे.आपल्या महाराष्ट्रा विषयी बोलते अस तर अजिबात बरं. मी लोकशाही आहे.माझा विश्वातील अनेक देशांनी स्वीकार केला आहे.आज सर्वत्रच असा स्वार्थाचा बाजार जर भरत राहिला तर मी नुसती नावालाच लोकशाही राहील. याचीच भीती आज मला सतावत आहे. मग गरीब लोकांच्या कल्याणासाठी ,देशात समानतेसाठी, निर्माण झालेली मी. माझे काम कसे करू शकेल? म्हणून मी खूप अगतिक झाली आहे. काय सांगू माझी व्यथा मी लोकशाही बोलत आहे.

 

 मी लोकशाही,

 

 लोकावीण मला अस्तित्व नाही,

 

 लोकांनी लोकांसाठी मला बनवले,

 

अवघ्या विश्वात सौख्य आणावे , म्हणून मी आले,

 

 सर्वांना न्याय देता देता मीच अन्यायी झाले,

 

लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाण नाही,

 

 लोकशाही म्हणजे काय ?

 

हे अनेकांना समजत नाही.

मि लोकशाही बोलतेय मराठी निबंध

 

 

 असा सगळा गोंधळ सगळीकडेच सुरू आहे. लोकशाहीचे अस्तित्व हे लोकांच्या मतदानावर अवलंबून असते. परंतु अलीकडे मतदान म्हटले की लोक खुशाल सुट्टी एन्जॉय करताना दिसतात किती चुकीच आहे. बरोबर ना बाळा ! म्हणूनच ज्याला समाजात काय तरी चांगले करायचे आहे. त्याला पडणारे मतदान या एंजॉय करणाऱ्यांमुळे कमी पडते आणि ज्याच्या हाती लोकशाही सांभाळण्याची कुवत नाही.जे स्वार्थी आहेत. अशा लोकांच्या हातात सहाजिकच जाते. कधी विचार केलाय का? की माझे एक मत लाखमोलाचे आहे. असा ज्या वेळी माणूस विचार करेल. त्यावेळी मला जरा चांगले दिवस येतील बरं.राज्यकारभार कसा सुरुआहे? मंत्री आपले काम नीट पाहत आहेत का? हे प्रश्न सामान्य माणसाला पडायला हवेत. मतदान ,राजकारण हा आपला विषयच नाही.असे जे म्हणतात ते चूक करत आहेत. अरे बाळा ! या लोकशाही मध्ये जनता ही मालक असते. आणि तुम्ही निवडून दिलेल्या पुढारी हा लोकशाहीचा सेवक असतो. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही.तोपर्यंत खरी लोकशाही आपल्याला कळलीच नाही. असेच म्हणावे लागेल.

 

मी हात जोडून आपणास विनंती करते आज जसे चित्र दिसत आहे. आज असे चित्र दिसत आहे ना याला कोणी नेता जबाबदार नाही, तर जबाबदार आहात तुम्ही. कारण का ? तर या लोकशाहीवर तुमचा विश्वासच नाही. लोकशाही काय असते? हे तुम्हाला समजलेच नाही.आणि ज्यावेळी तुम्ही सर्व समजून घ्याल. त्यावेळी एका मताची किंमत काय असते. हे तुम्हाला नक्की समजेल. तर आज मी जे काही तुझ्याशी बोलले ते इतराना समजावून सांग. आणि ती आकृती म्हणजे लोकशाही माझ्याशी बोलता बोलता गायब,झाली. 

लोकशाही बोलता-बोलता गायब झाली खरी; पण माझ्या मनामध्ये अनेक खलबते सुरू झाली.कुठेतरी वाटू लागले,आज लोकशाहीवरती हे दिवस आलेले आहेत या सगळ्याला कुठेतरी आपल्या भारत देशाचे नागरिक जबाबदार आहेत. मग यासाठी मी काय करू शकतो? मी तर आता दहावी मध्ये शिकत आहे. मी जरा विचार केला नि शाळेमध्ये गेलो .आता टीव्हीवर ज्या बातम्या बंडखोरीच्या दिसत आहेत यावर मित्रांशी बोलायला सुरुवात केली. मित्राना या चर्चा आवडली. आम्ही मित्र मंडलीनी ठरवले की,हे सगळं बदलायला हवं. हे चुकीचे आहे.कोण मित्र म्हणाला ? देशात दोनच पक्ष हवेत. कोण म्हणाले एका पक्षातून निवडून आल्यावर पुढची पाच वर्षे पक्ष सोडता यायला नको.एक ना अनेक अशा आपापली मते सर्वजण मांडू लागले. मग यावर अजून सखोल चर्चा व्हावी म्हणून आम्ही आमच्या वर्ग शिक्षकांकडे गेलो. वर्ग शिक्षकांना लोकशाहीच्या जाणीव जागृती बाबत माहिती सांगितल्यानंतर आमचे सर देखील खूपच खुश झाले.आणि त्यांनी ठरवले की मी लवकरच एका चर्चा सत्रासाठी मुख्याध्यापकांची परवानगी घेतो.

लोकशाहीच्या अस्तित्वासाठी,

 

मतदार राजा जागा हो,

 

देशाच्या विकासासाठी,

 

शंभर टक्के मतदानासाठी तत्पर हो,

 

मतदार राजा जागा हो!

अरे मतदार राजा जागा हो !

 

आणि लोकशाहीचा जागा हो. जागा हो.

 

या भूमिकेतून काही दिवसांमध्येच खूप मोठे चर्चासत्र आमच्या शाळेमध्ये भरवण्यात आले. या चर्चासत्राला आमच्या परिसरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थिती होती. लोकशाहीची ही व्यथा आगामी काळामध्ये आपण निवडणुकीच्या माध्यमातून शंभर टक्के मतदान कसे करता येईल? या दिशेने सगळी वाटचाल सुरू झाली.

मला हेच सांगायचे आहे की आपण जर मनावर घेतले तर काहीही करू शकतो. आज माझ्याशी लोकशाही बोलली. आणि तिची व्यथा सांगून गेली.तिची व्यथा आपणच दूर करू शकतो. याची देखील जाणीव झाली.जर जगातील सर्वात मोठी लोकशाही आपला भारत देश असेल. तर आपल्याला यापुढे विचारपूर्वक मतदान करावे लागेल. कारण या मतदानावरती लोकशाहीची यशस्विता अवलंबून आहे.

 

आत्मकथनात्मक निबंध लिहिताना ही काळजी घ्या

 

– ज्या घटकाविषयी विषयी आत्मकथन लिहायचे आहे ? तो घटक आपल्याशी बोलत आहे असे वर्णन करा

मि लोकशाही बोलतेय मराठी निबंध 2023

 

– आपल्याशी बोलत असलेला घटक निर्जिव असला तरी तो सजीव आहे अशी कल्पना करा.

– त्या निर्जीव घटकाला आनंद,दुःख,भय यासारख्या भावना आहेत अशी शब्दरचना करा.

 

– आणि सर्वात महत्त्वाचे निबंधाची भाषा ह सहज साधी सोपी ठेवा की जीवाचकांना गुंतवून ठेवेल.

 

– आत्मकथनात्मक निबंध लिहा विचार करायला लावणारा हवा

मि लोकशाही बोलतेय मराठी निबंध2023 

अशा पद्धतीने जर आपण आत्मकथनात्मक निबंधाची तयारी केली एसएससी बोर्ड परीक्षा मध्ये जे 8 गुण या घटकाला दिलेले आहेत.सहाजिकच तुम्हाला मराठी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. मी लोकशाही बोलतेय ! या सारखा जर निबंध आला तर नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतील.

सध्या देशातील घडामोडी पाहता बोर्डाच्या परीक्षेला मी लोकशाही बोलतोय! किंवा लोकशाहीचे महत्त्व या विषयावरती नक्कीच निबंध येऊ शकतोकिंवा येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून या निबंधाची छान तयारी करा.आपल्याकडे जर काही छान कोटेशन असतील तर ते कमेंट करा.आपण ते या निबंधामध्ये ॲड करूया आणि छान असा मी लोकशाही बोलतेय हा निबंध निबंध न राहता एक वेगळा विचार की जो प्रत्येक नागरिकाला,जो प्रत्येक भारतीयाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देईल. देशात खरी खरी लोकशाही काय असते? याचा प्रत्यय देईल.अलीकडे जो स्वार्थाचा बाजार चाललेला आहे. तो बाजार यापुढे दिसणार नाही.अशा वातावरणात लोकशाही फुलेल.खरोखरच ती लोकशाही ही खरी लोकशाही असेल.

 

आजच्या या मराठी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून मी लोकशाही बोलतेय ! हा निबंध आपल्याला कसा वाटला? नक्की कमेंट करा.

 

 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment